बुबुळाचा दाह होऊन जखमझाल्यामुळे कायमचा दृष्टीदोष येऊ शकतो. फूल मोठे व मध्यभागी असल्यास प्रकाशकिरण शिरू शकत नसल्याने डोळा निकामी होतो.
या दोषामुळे भारतात लाखो मुलांचे डोळे अधू झालेले आहेत.
'
अ' जीवनसत्त्वाचा अभाव : 'अ' जीवनसत्त्वाच्या अभावामुळे बुबुळावर जखमा तयार होऊन पुढे फूल पडते. कुपोषणामुळे डोळयांच्या आतही (नेत्रपटल) नुकसान होते. हे टाळण्यासाठी दर सहा महिन्यांनी सहा वर्षापर्यंत मुलांना 'अ' जीवनसत्त्वाचा डोस द्यावा.
'अ' जीवनसत्त्व असलेले पदार्थ आपल्या आहारात असावेत. रातांधळेपणा हीच या आजाराची सुरुवात असते हे लक्षात ठेवा.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्यविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
तोंडामध्ये आकडे असलेल्या परजीवी कृमीला ‘अंकुशकृमी...
रक्त सगळीकडे पोहोचायचे तर रक्तप्रवाहामध्ये काही दा...
महिलांमध्ये त्वचेवर गांधी उठण्याची तक्रार मोठ्या प...