डोळयात काही विकार नसताना आणि नंबर चष्मा देऊन दुरूस्त केला तरी डोळयाची नजर कमी होणे म्हणजेच 'आळशी डोळा'.
आळशी डोळा हा विकार बालपणीच होतो. लहान मुलांमध्ये दृष्टी तयार होण्याची प्रक्रिया नऊ वर्षापर्यंत होते. जेवढे वय लहान तेवढाच हा विकार होण्याचा संभव जास्त असतो.
जेव्हा दोन डोळयांमधील चष्म्याच्या नंबरमध्ये तफावत असते तेव्हा जास्त नंबर असलेल्या डोळयाकडून अस्पष्ट प्रतिमा मेंदूकडे पाठविली जाते. तिरळेपणामध्ये एकाच वस्तूच्या दोन वेगवेगळया प्रतिमा दोन्ही डोळयांकडून मेंदूस पाठविल्या जातात.
त्यामधील तिरळा असलेल्या डोळयाकडून येणारी प्रतिमा ही आपोआपच दुर्लक्षित होते व तिरळा असणारा डोळा आळशी होतो. ही अस्पष्ट प्रतिमा मेंदू दुर्लक्षित करतो त्यामुळे त्या डोळयाची दृष्टी कमी होते व डोळा आळशी बनतो.
त्वरित उपचार न केल्यास हा रोग, कायमचा जडतो व नंतर कोणतीही उपाययोजना करून दृष्टी परत मिळवता येत नाही. या विकारावर उपचाराचे चांगले परिणाम मिळण्यासाठी रुग्णाचा व रुग्णाच्या नातेवाईकांचा योग्य प्रतिसाद आवश्यक असतो.
लवकर निदान झाल्यास व लवकर उपचार केल्यास हा विकार बरा होऊ शकतो.
आळशी डोळा या विकारावरील सर्वात महत्त्वाचा उपचार म्हणजे रुग्णाकडून त्याच्या आळशी डोळयाकडूनच काम करून घेणे आवश्यक असते. चांगली दृष्टी परत मिळविण्यासाठी सामान्य (काम करणारा) डोळा पट्टी लावून झाकणे (पॅचींग) व आळशी डोळयाकडून काम करून घेणे.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 8/26/2020
महिलांमध्ये त्वचेवर गांधी उठण्याची तक्रार मोठ्या प...
रक्त सगळीकडे पोहोचायचे तर रक्तप्रवाहामध्ये काही दा...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
तोंडामध्ये आकडे असलेल्या परजीवी कृमीला ‘अंकुशकृमी...