चीन
चीन : चीनचे प्रजासत्ताक अथवा ‘चुंग-ह्वा-जन्-मिन्-कुंग-हो-क्वॉ ’. आशिया खंडातील सर्वांत मोठा व प्राचीन देश. क्षेत्रफळ (तैवान सोडून) सु. ९५,६१,००० (१९६७) चौ. किमी.; लोकसंख्या ७८,६०,५८,००० (१९७२ संयुक्त राष्ट्रे अंदाज). चीनचा पूर्वपश्चिम विस्तार सु. ७३° पू. ते १३५° पू. सु. ४,८०० किमी. व दक्षिणोत्तर विस्तार सु. १८° २०′ उ. ते ५३° ५२′ उ. सु. ४,००० किमी. आहे.