महावीर वाणीलक्ष्मीसेन ग्रंथालयात अनेक प्राचीन ग्रंथ आहेत. 400 ताडपत्रीवर, तर 410 कागदावर लिहिलेले हस्तलिखित ग्रंथ आहेत. हे हस्तलिखित ग्रंथ प्राकृत, संस्कृत, अपभ्रंश, तमिळ आणि ढुढारी कन्नड भाषेत असून अप्रकाशित आहेत. तसेच जैन विद्या आणि संस्कृती आदी विषयांवरील मराठी, हिंदी, कन्नड, इंग्रजी आदी भाषांतील पाच हजार छापिल ग्रंथ या ग्रंथालयात आहेत. हे ग्रंथ संशोधकांना अभ्यासासाठी उपयुक्त आहेत.
विद्यमान महास्वामी यांचे शिक्षण एमएपर्यंत (प्राकृत अर्धमागधी) झाले असून, ते पीएच.डी.चे शोध प्रबंध तयार करत आहेत. ते स्वत: बहुभाषी असून तमिळ, कन्नड, मराठी, हिंदी, संस्कृत, अर्धमागधी भाषांमधून संशोधन लेखन करू शकतात. त्यांनी लक्ष्मीसेन मठातील ग्रंथालयाची व्यवस्था अतिशय चांगल्यारीतीने ठेवली असून, देशी व परदेशी अभ्यासकांनी या समृद्ध ग्रंथालयाचा आपल्या संशोधनकार्यात उपयोग करून घ्यावा, अशी त्यांची प्रबळ इच्छा आहे.
लेखन : ज्ञानदीप
माहिती स्रोत :
अंतिम सुधारित : 1/30/2020
एक प्राचीन राज्य. हे वायव्य ग्रीसमध्ये वसलेले असून...
महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियम, १९६७ ची अं...
सीरिया येथील युफेरटेस् या नदीकाठी वसलेल्या शहराचे ...
ग्रंथालय हे सामाजिक जीवनाचा अविभाज्य घटक होय. त्या...