आजीबाईचा बटवा - लहान मुलांमधील पोटदुखी
लहान मुलांमधील पोटदुखीसाठी उपाय
- जुलाब होत असतील तर १ ग्लास स्वच्छ पाण्यात १ चमचा साखर आणि आणि चिमुटभर मीठ घालून हे पाणी सतत मुलांना पाजावे.
- अपचन झाले असेल तर थोडया पुदिन्याच्या पानांचा रस काढून १ चमचा रस, तेवढेच मध आणि चिमुटभर काळे मीठ घालून दिवसातून ३ ते ४ वेळा चाटायला दया.
- पोटात कळा येत असतील तर १ चमचा आल्याचा रस, १ चमचा मध आणि चिमुटभर मीठ घालून हे ३-४ वेळा चाटायला दया.
- लहान बाळाचे पोट दुखत असेल आणि विव्हळून रडत असेल तर आईने ओवा खाऊन बाळाच्या पोटावर फुंकर मारावी किंवा कापडात ओवा घालून त्याची पोटली तव्यावर गरम करून पोट शेकावे.
- पोटात जंत झाले असतील तर वावडिंग उकळवून पाणी दयावे किंवा वावडिंगाची पूड व गुळ एकत्र करून त्याच्या छोटया आकाराच्या गोळ्या करून दिवसातून ३ वेळा दयाव्यात. जंत पडून जातात.
- जिरे व सैंधव मीठ समप्रमाणात एकत्र करून त्यात ते भिजेपर्यंत लिंबाचा रस घालून ७ दिवस काचेच्या बाटलीत भिजत ठेवावे. हे मिश्रण नंतर उन्हात वाळवून बाटलीत भरून ठेवावे. पोटदुखी, गासेससाठी हे उत्तम औषध आहे.
स्त्रोत : चिमणचारा, संपदा ट्रस्ट
अंतिम सुधारित : 8/31/2020
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.