दुषित पाणी पिण्यामुळे अतिसार होत असतो.
अतिसार म्हणजे काय ?
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी शौचास होणे याला अतिसार म्हणतात. त्यामुळे शरीरातील पाणी कमी होते व त्यामुळे त्वचा कोरडी पडते. यावर वेळीच उपचार केले नाहीत तर मृत्यूही येऊ शकतो.
लक्षणे
- एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ जुलाब
- जास्त तहान लागणे.
- डोळे खोल जाणे.
- जीभ व तोंड कोरडे पडणे.
- अर्भकामध्ये टाळू खोल जाणे.
- लघवी थोडी गडद रंगाची होणे किंवा लघवी न होणे.
- गुंगल्यासारखे किंवा चिडखोर होणे.
- कातडीस चिमटा काढल्यास अतिशय हळूहळू पूर्ववत होणे.
अतिसारावर उपाय व पथ्य
- अतिसार झालेल्या व्यक्तीस रोजच्यापेक्षा जास्त पातळ पदार्थ दयावे. उदा. तांदळाची पेज, सरबत, लस्सी, फिका चहा
- दिवसातून पाच पेक्षा जास्त वेळा पचनास हलके अन्न दयावे.
- जलसंजीवनी दयावी.
वयाप्रमाणे जलसंजीवनी किती दयावी ते खाली दिले आहे.
- तीन महिने - १/२ लिटर
- सहा महिने ते एक वर्ष - १/२ लिटर
- एक वर्ष ते पाच वर्ष - ३/४ लिटर
- दोन वर्ष ते पाच वर्ष - १ लिटर
- पाच वर्ष ते पंधरा - २ लिटर
- पंधरा वर्षाचे वर - २ ते ३ लिटर
स्त्रोत : सुरक्षित पिण्याचे पाणी, माहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिका, वॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्ट
अंतिम सुधारित : 6/17/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.