दरवर्षी अतिसारामुळे म्हणजेच जलशुष्कता व कुपोषणाद्वारे 10 लक्ष मुले मृत्युमुखी पडतात. मरणार्यांमध्ये मोठ्या माणसांच्या तुलनेमध्ये मुलांचे प्रमाण अधिक आहे कारण त्यांच्या शरीरातील पाणी लवकर संपते. अतिसार झालेल्या 200 मुलांपैकी एका मुलाचा त्यामुळे मृत्यू होतो.
अतिसाराचे जंतू माणसाच्या पोटात जातात व त्यांचे मुख्य उगमस्थान असते मानवी विष्ठा. मानवी विष्ठेची योग्य रीतीने विल्हेवाट न लावल्याने, एकंदर गलिच्छपणा व आरोग्याच्या चांगल्या सवयी नसल्यामुळे, पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध नसल्यामुळे किंवा बाळांना स्तनपान न करवल्याने अतिसाराचा प्रसार वेगाने होतो. फक्त आईचे दूधच पिणार्या मुलांना फार क्वचित अतिसाराचा त्रास होतो.
कुटुंबे व समाजाने, शासकीय व अशासकीय संस्थांच्या (NGOs) मदतीने, एकत्रपणे काम केल्यास अतिसारास कारणीभूत ठरणार्या स्थितीमध्ये बदल घडवता येईल.
1.मुलांच्या शरीरातील पाणी संपल्यामुळे अतिसार होऊन मुले मरतात. त्यामुळे अतिसाराची सुरूवात आढळल्याबरोबर नेहमीच्या अन्नपाण्यासोबत जास्तीचे पातळ पदार्थ देणे आवश्यक आहे.
2.मुलास एका तासामध्ये बरेचदा पातळ शौचास झाल्यास किंवा विष्ठेमध्ये रक्त आढळल्यास त्याच्या जिवाला धोका आहे असे समजा व तातडीने कुशल आरोग्यसेवकाची मदत घ्या.
3.स्तनपान करविल्याने अतिसाराचे गांभीर्य व तीव्रता कमी होते.
4.अतिसार झालेल्या मुलाने नियमित जेवणे गरजेचे असते. अतिसारामधून बरे होणार्या मुलाने पुढील किमान दोन आठवडे एक जास्तीचे जेवण घ्यावे.
5.गंभीर अतिसारामुळे मुलास जलशुष्कता उर्फ डीहायड्रेशन झाले असल्यास फक्त तज्ञ आरोग्यसेवकाने शिफारस केलेले औषध किंवा जलसंजीवनी म्हणजेच ओरल रीहायड्रेशन सॉल्ट्स चा वापर करा. अतिसारावरील इतर औषधांचा अशा वेळी साधारणतः परिणाम होत नाही आणि त्यांमुळे मुलास धोका पोहोचू शकतो.
6.अतिसार टाळण्यासाठी विष्ठा शौचालयामध्येच करणे किंवा जमिनीत पुरणे गरजेचे आहे.
7.आरोग्याच्या चांगल्या सवयींमुळेदेखील अतिसारापासून संरक्षण मिळते. संडासास जाऊन आल्यानंतर तसेच एरवीदेखील अन्नास स्पर्श करण्यापूर्वी व मुलांना जेवण देण्याआधी हात साबणाने किंवा राखेने स्वच्छ धुवा.
मुलास दिवसातून तीन किंवा अधिक वेळा पातळ शौचास झाल्यास त्याला अतिसाराची लागण झाली आहे असे समजा. ह्या पातळ शौचाचे प्रमाण जेवढे अधिक तेवढा अतिसार गंभीर असतो.
काही लोकांची अशी समजूत असते की पाणी इ. प्यायल्यामुळे अतिसाराचे प्रमाण वाढते. ही समजूत चुकीची आहे. अतिसार झालेल्या मुलास ते थांबेपर्यंत जास्ती वेळा पातळ पदार्थ देणे गरजेचे असते. अतिसारामध्ये वाहून गेलेल्या पातळ पदार्थांची भरपाई करण्यासाठी जास्तीचे पाणी पिणे आवश्यक असते.
अतिसार झालेल्या मुलास खालील पातळ पदार्थ द्या -
जलशुष्कता टाळण्यासाठी बाळांना जास्तीतजास्त स्तनपान करवा आणि इतर मुलांना, पातळ शौचास झाल्यानंतर लगेचच, खालील प्रमाणात पातळ पदार्थ द्या -
स्वच्छ कप वापरा. बाटलीने कधी ही पाजू नका.बाटली पूर्णपणे स्वच्छ करणे अवघड असते व अशा अस्वच्छ बाटलीद्वारे अतिसार होऊ शकतो.
मुलाला उलटी झाल्यास, 10 मिनिटे थांबून पुन्हा पातळ पदार्थ देणे चालू करा. एका वेळी जास्त देऊ नका.
मुलास डायरिया थांबेपर्यंत जास्तीचे पातळ पदार्थ द्या.
साधारणपणे तीन-चार दिवसांनंतर अतिसार थांबतो. मात्र एक आठवड्यापेक्षा जास्त काळ अतिसार टिकल्यास संगोपनकर्त्यांनी तज्ञ आरोग्यसेवकाचा सल्ला घ्या.
मुलाने खालील लक्षणे दाखवल्यास तज्ञ आरोग्यसेवकाचा सल्ला घ्या -
मुलांमध्ये यांपेकी कोणते ही लक्षण आढळल्यास, तज्ञ आरोग्यसेवकाचा सल्ला तातडीने घ्या. दरम्यानच्या काळात मुलास जलसंजीवनी किंवा अन्य पातळ पदार्थ द्या.
एक-दोन तासांच्या अवधीत बरेचदा पातळ शौचास झाल्यास किंवा उलट्या झाल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या, कारण ही कॉलर्याची लक्षणे आहेत व कॉलर्यामुळे मूल काही तासांत मरण्याची ही शक्यता असते!
अतिसार झालेल्या लहान मुलास अन्न व पातळ पदार्थाचा सर्वोत्तम एकत्रित स्रोत म्हणजे आईचे दूध. ते स्वच्छ असते, त्यात पोषणमूल्ये भरपूर असतात व आजारांचा सामना करण्याची ताकद त्यामध्ये असते. फक्त आईच्या दुधावरच असलेली मुले क्वचितच अतिसाराने आजारी पडतात.
आईच्या दुधाने जलशुष्कता व कुपोषण टळते व शरीरातून गेलेल्या पाण्याची भरपाई होते. अतिसार झालेल्या मुलास कमी दूध पाजण्याचा सल्ला काहीवेळा मातांना दिला जातो - हा सल्ला चुकीचा आहे.
उलट अशा वेळी आईने अधिक स्तनपान करवले पाहिजे.
अतिसारग्रस्त मुलाचे वजन फार वेगाने घटते व त्याचे लवकर कुपोषण होऊ शकते. अतिसारग्रस्त मुलास जेवढे जास्त अन्नपाणी दिले जाईल तेवढे चांगले. अन्नामुळे अतिसार थांबून त्याची तब्येत सुधारण्यास मदत होते.
अतिसारग्रस्त मुलास खाण्याची इच्छा होत नाही, उलट्या होतात. त्यामुळे त्याला भरवणे अवघड असते. मूल सहा महिने किंवा जास्त वयाचे असल्यास पालकांनी किंवा संगोपनकर्त्यांनी त्याला जास्तीतजास्त अन्न देण्याचा प्रयत्न करावा. त्याच्या आवडीचे मऊ अन्न एकावेळी थोडे-थोडे द्या. मिठाचे प्रमाण योग्य ठेवा. मऊ अन्न कठीण पदार्थांपेक्षा खायला व पचायला सोपे असते.
अतिसारग्रस्त मुलास देण्यासाठी योग्य अन्नपदार्थ म्हणजे मऊ शिजवलेला घेवडा, नरम मासे, मांस, दही व फळे. भाजीत थोडे तेल घाला. दिवसातून पाच-सहा वेळा ताजे अन्न शिजवून त्याला द्या.
अतिसार थांबल्यावर त्यामधून पूर्णपणे बरे होण्यासाठी जादा खाणे आवश्यक असते. अशा वेळी किमान दोन आठवड्यांसाठी मुलास एक जास्तीचे जेवण द्या किंवा जास्ती स्तनपान करवा. म्हणजे आजारपणात गेलेली त्याची ताकद भरून येण्यास मदत होईल.
मुलाचे घटलेले वजन पुन्हा वाढून, अतिसारग्रस्त होण्याआधी होते त्याच्या आसपास आल्याशिवाय ते त्या आजारातून बाहेर आले आहे असे मानता येणार नाही
अतिसारामधून बाहेर येण्यासाठी मुलांना अ जीवनसत्वाची मदत होते. आईचे दूध, लिव्हर, अंडी, दुधाचे पदार्थ, नारंगी व पिवळ्या रंगाची फळे, गडद हिरव्या पालेभाज्या यांमध्ये अ जीवनसत्व भरपूर आढळते.
अतिसार काही दिवसांत आपोआप बरा होतो. खरा धोका असतो मुलाच्या शरीरातून पाणी व पोषक द्रव्ये बाहेर पडल्याने जलशुष्कता व कुपोषणाचा.
अतिसारग्रस्त मुलास कोणत्याही गोळ्या, ऍन्टिबायोटिक्स किंवा इतर औषधे शिफारस केलेली असल्याखेरीज देऊ नका.
अतिसारावरील खरा उपाय म्हणजे भरपूर पातळ पदार्थ खाणे व स्वच्छ पाण्यामध्ये योग्य प्रमाणात मिसळून जलसंजीवनी उर्फ ओरल रीहायड्रेशन सॉल्ट्स घेणे.
जलसंजीवनीचे पाकीट उपलब्ध नसल्यास जलशुष्कता टाळण्यासाठी चार सपाट चमचे साखर व अर्धा चमचा मीठ एक लिटर स्वच्छ पाण्यात मिसळून हे मिश्रण मुलास पाजा. प्रमाण व्यवस्थित ठेवा, जास्त साखरेमुळे अतिसार वाढेल तर मीठ जास्त झाल्यास मुलास अधिकच त्रास होईल. उलट मिश्रण जरा पातळ झाले तरी चालेल आणि त्याचा प्रभाव जास्त प्रमाणात कमी होणार नाही.
गोवरामुळे अनेकदा गंभीर स्वरूपाचा अतिसार होतो. गोवरविरोधी लसीकरण केल्याने अतिसार होण्याची शक्यता कमी होते.
Facts of Life: ORS
ओआरएसचे मिश्रण– अतिसार/संग्रहणीसाठी एक विशेष पेय
ओआरएस काय आहे | ORS (ओरल रीहाइड्रेशन सॉल्ट्स) (मौखिक/तोंडावाटे पुनर्जलीकरण लवण) शुष्क (कोरडे) क्षारांचे एक असे विशिष्ट सम्मिश्रण आहे, जे सुरक्षित/स्वच्छ पाण्यात मिसळल्या नंतर, अतिसार या संग्रहणीमुळे शरीरामधील कमी झालेल्या पाण्याच्या प्रमाणाचे पुनर्जलीकरण करण्यास मदत करू शकते. |
ORS कोठे मिळू शकते? | बहुतेक देशांमध्ये, दुकाने, फार्मेसी, आणि आरोग्य केंद्रांमध्ये ORS ची पाकिटे मिळतात. |
ORS पेय तयार करण्यासाठी: | 1.ORS पाकिटात ज्या समाविष्टि आहेत (जे काही सामान या घटक आहेत) ते एका स्वच्छ भांड्यात घाला. पाकिटावर दिलेले निर्देश वाचा व स्वच्छ पाण्याच्या योग्य प्रमाणात मिसळा. कमी पाणी घेतल्यास डायरियाच्या स्थितीत आणखी बिघाड होण्याची शक्यता आहे.
2. फक्त पाणीच मिसळा. ORS कधी ही दूध, सूप, फळांचा रस या साधारण पेय-पदार्थांमध्ये मिसळू नका. साखर टाकू नका. 3. चांगल्या प्रकारे मिसळा/घोळा, आणि एका स्वच्छ कपात घेऊन हे मिश्रण मुलास पिण्यास द्या. बाटलीचा वापर करू नका. |
किती प्रमाणात ORS मिश्रण पिण्यास द्यावे? |
जितके ORS मिश्रण मूल पिऊ शकेल तितके पिण्यास प्रोत्साहन द्या. दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी प्रत्येक जुलाबा नंतर एका मोठ्या कपाचा अर्धा किंवा एकचतुर्थांश भाग प्रमाणात ORS मिश्रण पिणे आवश्यक आहे. दोन वर्षे या त्यापेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी प्रत्येक जुलाबा नंतर एका मोठ्या कपाचा अर्घा भाग किंवा पूर्ण मोठा कप भरून ORS मिश्रण पिणे आवश्यक आहे. |
जुलाब/अतिसार साधारणपणे तीन किंवा चार दिवसांत थांबतात. | जर हे जुलाब एका आठवड्यानंतर देखील थांबले नाहीत, तर आपण प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्याशी संपर्क साधावा. |
जर मलाचा स्पर्श (या संपर्क) पिण्याचे पाणी, खाद्यपदार्थ, हात, भांडी या स्वयंपाकाच्या जागांना (या पृष्ठभागांना) झाला तर मुले आणि प्रौढ दोघांच्या ही शरीरात डायरियाचे रोगजंतु प्रवेश करू शकतात. ज्या माश्या मलावर बसतात त्याच जेवणावर बसतात आणि या प्रमाणे डायरिया पसरविणाऱ्या रोगजंतूंना स्थानांतरित करतात. खाद्यपदार्थ व पिण्याचे पाणी झाकून ठेवल्यास यांचा माश्यांपासून बचाव होऊ शकतो.
सगळा मल, अगदी तान्ह्या आणि लहान मुलांचा देखील, रोगजंतूंचे स्थानांतरण करतो आणि महणून असा मल अपायकारक आहे. जर मुले शौचालयाचा वापर केल्याविना मलत्याग करीत असतील, तर त्यांचा मल ताबडतोब स्वच्छ करून टाकावा आणि शौचालयात (संडासात) टाकून द्यावा या जमीनीत पुरून टाकावा. शौचालये आणि शौचकूपांना स्वच्छ ठेवल्याने रोगजंतुंपासून बचाव होतो.
जर संडास या शौचकूप उपलब्ध नसेल तर, मुले व मोठी माणसे दोघांनी ही घर, रस्ते, पाणीपुरवठ्याची जागा आणि मुलांच्या खेळाचे मैदान या सारख्या जागांपासून दूर जाऊन शौच करावे आणि त्यांचा मल मातीमध्ये पुरून टाकावा.
जर काही समुदायांकडे संडास या शौचकूपाची सोय उपलब्ध नसेल तर अशा समुदायांनी एकत्रित होऊन अशा सोयी निर्माण कराव्यात. पाण्याच्या स्त्रोतांना नेहमीच मानव किंवा पशुंच्या मलापासून सुरक्षित ठेवावे.
डायरिया पासून बचावासाठी इतर आरोग्यमय उपाय/मापदंड:
स्त्रोत : UNICEF
अंतिम सुधारित : 5/2/2020
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
या विभागात अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे म्हणजेच योग...
योनिद्वारे रक्तस्रावाची कारणे अनेक आहेत. त्यांचे य...
प्रत्येकच रोग सर्वानाच होतो असं नाही परंतु बहुतांश...