मुलांमध्ये लघवी संसर्ग होण्याची करणे खालीलप्रमाणे आहेत.
किडणी व मूत्रमार्गाच्या संसर्गाचे निदान करण्यासाठी आवश्यक तपासणीचे दोन भागात विभाजन करता येईल :-
लघवीच्या सामान्य व कल्चर ह्या तपासणीत पू आढळणे, मूत्रमार्गाच्या संसर्गाचे लक्षण आहे. ही तपासणी संसर्गाच्या निदान व उपचारासाठी खूप महत्वाची आहे.
इतर आवश्यक तपासणी करून किडणी आणि मूत्रमार्गातील दोष, लघवीच्या मार्गातील अडथळे आणि लघवी करण्याच्या प्रक्रियेतील त्रुटी वगैरे समस्यांचे निदान होऊ शकते. ह्या समस्या मूत्रमार्गात वारंवार संसर्ग होण्याला जबाबदार असतात. या समस्यांवर निदानासाठी आवश्यक तपासण्या कोणत्या, या संदर्भात आपण यापूर्वीच प्रकरण क्र. ४ आणि क्र. १९ मध्ये चर्चा केली आहे.
मिक्चुरेटिग सिस्टोयुरेथ्रोग्राम – MCU म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ह्या तपासणीत विशेष प्रकारचे आयोडीनयुक्त द्रव कॅथेटर (नळी) द्वारे मुत्राशायात भरले जाते. मग मुलाला लघवी करण्यास सांगितले जाते. लघवी करताना मूत्राशय आणि मूत्रनलिका यांचे एक्सरे घेतले जातात. या तपासणीमुळे लघवी मुत्राशायातून उलट्या दिशेने मूत्रवाहिनीत जात असेल, मूत्राशयात काही कमतरता असेल किंवा मूत्राशयातून लघवी बाहेर पडण्याच्या मार्गात काही अडथळा असेल तर त्याबद्दलची माहिती मिळते.
३ वर्षावरील मुलांमध्ये जेव्हा जेव्हा लघवीत संसर्ग होतो, तेव्हा पोटाचा एक्सरे, सोनोग्राफी ह्या तपासणीनंतर आवश्यक असल्यास वरील तपासणी केली जाते. या तपासणीमुळे संसार्गासाठी जबाजन्मतःच असलेली कमतरता किंवा मूत्रमार्गातील अडथळा या संबंधी माहिती मिळू शकते.
ह्या रोगावर विशिष्ट उपचार किडनी फिजिशियन, नेफ्रोलॉजिस्ट-किडणी सर्जन-युरोलॉजिस्ट किंवा मुलांचे तज्ञ ठरवतात.
या जन्मजात असलेल्या कमतरतेत किडणीचा भाग (जो किडनीच्या आतल्या बाजूच्या मध्यभागात असतो व किडणीत तयार झालेल्या मुत्राला, खाली मूत्रवाहिनीत पाठवतो.) आणि मूत्रवाहिनीला जोणारी जागा आकुंचित पावल्यामुळे लघवीच्या मार्गात अडथळा येतो. या अडथळयामुळे किडणी सुजते आणि रुग्णांना वारंवार लघवीचा संसर्ग होतो. जर योग्य वेळी योग्य उपचार केले गेले नाही, तर बराच काळ (वर्ष) सुजलेली किडणी हळूहळू कमजोर होऊन निकामी होऊ शकते.
जन्मतः असलेल्या ह्या व्यंगावर औषध नाही. ह्या व्यंगावर विशिष्ट उपचारामध्ये ‘पायलोप्लास्टी’ ऑपेरेशन करून लघवीच्या मार्गातील अडथळा दूर केला जातो.
या जन्मजात व्यंगामुळे काय होते ?
मुलांच्यात आढळणाऱ्या या समस्येमध्ये मूत्रनलिकेत जन्मजात निर्माण झालेल्या झडपेमुले मूत्रमार्गात अडथळा येतो व लघवी करताना त्रास होतो. लघवी करताना जोर करावा लागतो, लघवीची धार पातळ असते व थेंब थेंब लघवी होते. जन्मल्यावर पहिल्याच महिन्यात किंवा कधी कधी गर्भावस्थेतील शेवटच्या महिन्यात करण्यात येणाऱ्या सोनोग्राफीत या रोगाची लक्षणे पहायला मिळतात.
लघवीच्या मार्गात अधिक अडथळा आल्यामुळे मूत्राशयाची भिंत मोठी होते व मूत्राशयाचा आकार मोठा होतो. मुत्राशयातून पुरेशा प्रमाणत लघवी बाहेर पडत नसल्यामुळे लघवी मुत्राशयातच राहते. अधिक प्रमाणात लघवी साठल्यामुळे मुत्राशयावरील दाब वाढत जातो, ज्यामुळे मूत्रवाहिनी व किडणीही फुगून प्रसरण पावतात. या परिस्थितीत योग्य उपचार केले नाहीत तर हळूहळू गंभीर नुकसान होऊ शकते.
अशा प्रकारची समस्या मूत्रनलिकेतील जन्मजात निर्माण झालेली झडप ऑपरेशन करून दूर केली जाते. काही मुलांमध्ये जांघेच्या भागात चीर पाडून, मूत्राशयातून लघवी सरळ बाहेर काढून अशा प्रकारची शस्त्रक्रिया केली जाते.
छोट्या मुलांमध्ये आढळणाऱ्या मुतखड्यांवरील उपचारांमध्ये मूतखड्यांवरील उपचारांमध्ये मूतखड्याचे स्थान, आकार, प्रकार वगैरे सगळ्या बाबींचा विचार करून, आवश्यक असल्यास दुर्बिणीची मदत घेऊन शस्त्रक्रियेद्वारे किंवा लिथोट्रीप्सीद्वारे उपचार केले जातात.
अशा प्रकारे मुतखडा काढून टाकल्यावर प्रयोगशाळेत त्याचे परीक्षण करून पुन्हा मुतखडा होऊ नये म्हणून औषध व आवश्यक सल्ला दिला जातो.
मुलांच्यात लघवीच्या संसर्गाच्या सर्व कारणांमध्ये सर्वात मुख्य व महत्वाचे कारण म्हणजे वसायको युरेटेरिक रिफ्लक्स (VUR – Uesico Vreteric Reflux). व्ही. यू. आर. मध्ये जन्मजात व्यंगामुळे लघवी मूत्राशयातून उलट्या बाजूला, मूत्रवाहिनी व किडणीकडे जाते.
मुलांच्यात लघवीचा संसर्ग, उच्च रक्तदाब आणि क्रॉनिक किडणी फेल्युअर होण्याचे सर्वात महत्वाचे कारण व्ही. यू. आर. आहे.
साधारणपणे मूत्राशयावर जास्त दबाव आल्यावरही, मूत्रवाहिनी व मूत्राशयामधली झडप लघवीला मूत्रवाहिनीकडे जाण्यापासून अडवते आणि लघवी करताना मूत्र मुत्राशयातून एकाच दिशेने मूत्रनलिकेतून बाहेर पडते. परंतु व्ही. यू. आर. मध्ये या झडपेच्या रचनेत व्यंग असल्यामुळे जेव्हा मूत्राशयात जास्त लघवी जमा होते. तेव्हा लघवी करताना ती उलट्या दिशेने, मूत्राशयातून एका किंवा दोन्ही मूत्रवाहिन्यांकडे जाते.
या रोगात होणारा त्रास रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असतो. तीव्रता कमी असलेल्या रोगात उलट्या बाजूने जाणाऱ्या लघवीचे प्रमाण कमी असते आणि लघवी फक्त मूत्रवाहिनी आणि किडणीच्या काही भागांपर्यंतच जाते. अशा प्रकारचा रोग झालेल्या मुलांना लघवीत वारंवार संसर्ग होण्याखेरीज इतर कोणतीही समस्या साधारणपणे जाणवत नाही.
रोगाचे प्रमाण जेव्हा तीव्र असते तेव्हा मात्र, जास्त प्रमाणात लघवी उलट्या दिशेने जात असल्याने किडणी फुगते आणि लघवीच्या दाबामुळे दीर्घकाळानंतर हळूहळू किडणीचे नुकसान होते. ह्या समस्येवर योग्य वेळी योग्य उपचार झाले नाही, तर किडणी पूर्णपणे खराब होऊ शकते.
ह्या रोगावरील उपचार, रोगाची लक्षणे, त्यांचे प्रमाण आणि मुलांचे वय लक्षात घेऊन निश्चित केले जातात.
जेव्हा व्ही.यू.आर. अधिक तीव्र असतो आणि ज्यामुळे मुत्रवाहिनी आणि किडणी फुगलेली असते, त्यावेळी मुलांच्यातील व्यंग ठीक करण्यासाठी आणि किडणीच्या सुरक्षेसाठी ऑपरेशन आवश्यक असते. ज्या मुलांमध्ये रोगाची तीव्रता अधिक असल्यामुळे, लघवी अधिक प्रमाणात उलट्या दिशेने जाते अशा मुलांच्यात योग्य वेळी ऑपरेशन केले नाही तर किडणी कायमची खराब होऊ शकते.
ह्या ऑपरेशनचा उद्देश मूत्रवाहिनी आणि मूत्राशय यांमधील झडपे सारखी व्यवस्था पुन्हा पूर्वपदावर आणणे आणि लघवी उलटया दिशेने मूत्रवाहिनीत जाने थांबवणे हा असतो. हे ऑपरेशन खूपच नाजूक असते. ते पेडीअॅट्रिक सर्जन किंवा युरॉलॉजिस्टद्वारा केले जाते.
स्त्रोत: Kidney Education Foundation
अंतिम सुधारित : 1/12/2020
क्षयरोग (टीबी) हा संसर्गजन्य रोग असुन तो मायक्रोबॅ...
तीव्र स्वरुपाच्या पूर्वरूपामध्ये अतिज्वर व सर्वांग...
कवकांमुळे मानवात दोन प्रकारचे रोग होतात. एक स्थानि...
न्यूट्रोपीनिया म्हणजे रक्तातील पांढर्या पेशींचे प...