न्यूट्रोपीनिया म्हणजे रक्तातील पांढर्या पेशींचे प्रमाण कमी होणे. संसर्गाशी लढण्याचे काम मुख्यतः ह्याच पेशी करतात. केमोथेरेपी घेतल्यानंतर न्यूट्रोपीनिया आढळणे ही अगदी सर्वसामान्य बाब आहे परंतु ह्यामुळे संसर्ग होण्याचा धोका वाढतो.
कर्करोगाशी सामना देणारी ही औषधे शरीरातील वेगाने वाढणार्या सर्वच पेशींना मारून टाकतात – त्यामुळे वाईटाबरोबर काही चांगल्या पेशीही मरतात. परिणामी रोगग्रस्त पेशींसोबत चांगल्या पांढर्या पेशीदेखील मरतात.
आपले डॉक्टर किंवा नर्स आपणांस ह्याबाबत सांगू शकतील. केमोथेरेपी घेतल्यानंतर न्यूट्रोपीनिया आढळत असल्याने त्याच्या तपासणीसाठी डॉक्टर आपले थोडे रक्त काढून घेतील.
केमोथेरेपी घेतल्यानंतर ७ ते १२ दिवसांनी न्यूट्रोपीनिया आढळू शकतो. अर्थात आपण घेतलेल्या केमोथेरेपीच्या स्वरूपावर हा कालावधी अवलंबून असतो. आपल्या शरीरातील पांढर्या पेशींचे प्रमाण सर्वांत कमी कधी असू शकेल ह्याबाबत डॉक्टर किंवा नर्स आपणांस सांगू शकतील. ह्या दिवसांत आपण संसर्गांवर बारीक नजर ठेवणे गरजेचे आहे.
न्यूट्रोपीनिया होण्या- न होण्याबाबत आपण फारसे काही करू शकत नाही, परंतु पांढर्या पेशींची संख्या कमी असताना संसर्ग होणे आपण टाळू शकता.
डॉक्टरांकडून केल्या जाणार्या उपचारांबरोबरच, संसर्ग टाळण्यासाठी, आपण खालील सूचनांचे पालन करावे.
केमोथेरेपी घेणार्या कर्करोग्यांनी वेटिंग रूममध्ये (विश्रामकक्षात) फार वेळ बसू नये. केमोथेरेपी घेताना ताप आल्यास ते संसर्गाचे लक्षण असू शकते. हे संसर्ग फार चटकन गंभीर रूप धारण करू शकतात. असे असल्यास पहिल्या भेटीतच संबंधितांना आपली केमोथेरेपी तसेच तापाबद्दल सांगा. कारण हे संसर्गाचे लक्षण असू शकते.
स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम्
अंतिम सुधारित : 7/16/2020
दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात कर्करोग म...
नैसर्गिकपणे येणार्या तंतुमय गारगोटी खनिजला अस्बेस्...
सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ असलेली अॅसिडिटी, अपचन,...
हा एक आकस्मिक आणि गंभीर आजार आहे.