दृष्टी चांगली राखण्यासाठी अ जीवनसत्व आवश्यक आहे. मुलांमधे, अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळं दृष्टी कमी होते. ही कमतरता अगदी तीव्र असेल, तर त्यामुळं कायमचं अंधत्व येऊ शकतं. आपल्या देशात, अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळं दरवर्षी 30,000 मुलांची दृष्टी जाते. 1 ते 5 वर्षे वयाच्या मुलांमधे ही कमतरता अधिक असल्याचं दिसून येतं.
अ जीवनसत्वाची कमतरता असलेल्या मुलांमधे अंधत्व एकदम येत नाही. तिचे निदान लवकरच्या टप्प्यात झालं तर अ जीवनसत्वानं समृध्द असा आहार घेऊन ते ठीक करता येतं.
रातांधळेपणा हे पहिले लक्षण आहे. हे लक्षण असलेल्या मुलांना कमी उजेड असताना किंवा अंधारात दिसत नाही. डोळ्याचा पांढरा भाग कोरडा होतो आणि त्याची चमक संपते.
ही लक्षणे दिसल्यानंतर, तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. उपचार न केल्यास, ही स्थिती कायमच्या अंधत्वात रुपांतरीत होऊ शकते.
वाढणा-या मुलांसाठी पोषक आहार
वाढत्या वयात मुलांना पोषक आहार मिळाला पाहिजे. एखाद्या मुलाच्या शरीरात प्रथिने आणि उष्मांकांची कमतरता असेल (कुपोषण), तर बालशोष आणि क्वाशीओर्केर यांसारखे रोग होतात.
1-5 वर्षे वयाच्या कुपोषित बालकांना ते होतात.
हा रोग पाय सुजणे, त्यानंतर हात सुजणे आणि नंतर संपूर्ण शरीर सुजणे असा पसरतो. खरखरीत त्वचा, डोक्यावर कमी केस, केसांचा रंग लालसर तपकिरी होणं ही बालशोषाची लक्षणे आहेत. तो झालेली मुलं फिकट आणि उत्साह नसलेली अशी दिसून येतात.
हा रोग झालेली मुले खूपच अशक्त आणि लुकडी असतात. प्रारंभिक टप्प्यात मुलांना अतिसार होतो. त्वचा कोरडी होते.
हे रोग झालेल्या मुलांवरील उपचारांसाठी सूचना
उष्मांक आणि प्रथिने यांनी समृध्द पोषक आहार मुलांना पुरेशा प्रमाणात वारंवार अंतराने दिला पाहिजे. तीव्र कमतरतेची लक्षणे असलेल्या मुलांना तत्काळ डॉक्टरकडे नेले पाहिजे.
हैदराबादच्या राष्ट्रीय पोषाहार संस्थेनं मिक्स नांवाचा पोषक आहार सर्व पोषक घटकांच्या मिश्रणातून तयार केला आहे. हे मिश्रण घरात तयार करता येऊ शकतं.
भाजलेला गहू - 40 ग्रॅम
धान्य - 16 ग्रॅम
भाजलेले शेंगदाणे - 10 ग्रॅम
गूळ - 20 ग्रॅम
या घटकांची पूड करुन ते एकत्र करा. या मिश्रणामधे 330 ग्रॅम उष्मांक आमि 11.3 ग्रॅम प्रथिने असतात.
हे मिश्रण दूध किंवा पाण्यासोबत दिले जाते. बालशोष आणि क्वाशीओर्कर रोग असलेल्या मुलांना आहार देण्यासाठी या मिश्रणाचा प्रयोग करण्यात आला आहे.
स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम
अंतिम सुधारित : 8/9/2020
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
योनिद्वारे रक्तस्रावाची कारणे अनेक आहेत. त्यांचे य...
अतिसाराबाबतच्या माहितीचा प्रसार करणे व तिची अंमलबज...