१२ राशीपैकी काही ठराविक राशीच वेगळ्या या अर्थाने की त्या राशी आपल्या आकारानेच ओळखता येतात. सिंह, मृग आणि आश्लेषा प्रमाणेच वृश्चिक अशी आणखी एक रास आपल्या नावाप्रमाणे आढळते.
तूळ नक्षत्राच्या पुढेच पहिल्यास आपणास एक विंचवाच्या आकाराप्रमाणे एक तारकासमूह आढळतो. तो म्हणजे वृश्चिक. अवकाशात हा समूह ओळखणे अतिशय सोपे.
या विंचवाच्या पुढच्या बाजूस तोंडाशी आपण तीन जवळपास समान तेजाच्या तारका आढळतात. थोड्याश्या दक्षिणेच्या बाजूने झुकलेला हा तारकासमूह म्हणजे अनुराधा नक्षत्र होय.
एक प्रकारे या अनुराधा नावाचा अर्थ असा होतो की राधेच्या मागोमाग तिचे अनुकरण करणारी म्हणजेच अनुराधा.
भारतीय प्राचीन साहित्यामध्ये अनुराधेचा उल्लेख आढळतो. पं. महादेव शास्त्री जोशींनी अनुराधा या नावाची व्युत्पत्ती दिली आहे. असुरांवर विजय मिळवण्यासाठी आपण अनुकूल सामग्रीने समृद्ध होऊया अशी प्रतिज्ञा देवांनी ज्या नक्षत्रावर केली ते अनुराधा (अन-अनुकूल, राधा-समृद्धी).
माहिती स्रोत: अवकाशवेध.कॉम
अंतिम सुधारित : 9/8/2023
तारकामध्ये मधला तारा तेजस्वी आहे. हेच ज्येष्ठा नक्...
हिवाळ्यामध्ये सूर्य मावळण्याच्या वेळेस कृत्तिका नक...
पुष्य नक्षत्राच्या बाजूलाच पाच थोड्याशा फिकट चांदण...
२७ नक्षत्राची सुरुवात अश्विनी नक्षत्राने होते.