पुष्य नक्षत्राच्या बाजूलाच पाच थोड्याशा फिकट चांदण्या आकृतीत मांडलेल्या दिसतात. ह्या पाच तारकांच्या पंचकास आश्लेषा किंवा सर्प नक्षत्र म्हणतात. कल्पना केल्यास आपणास ह्या पंचकाचा आकार सर्पाच्या फण्यासारखा जाणवेल. त्यालाच 'आश्लेषा पंचक' म्हणतात.
अनेक संस्कृतीमध्ये या नक्षत्राचा संबंध सर्पाबरोबर जोडलेला आढळतो. आकाशात देखिल या सर्पाची पूर्ण आकृती आश्लेषा नक्षत्रापासून सुरू होऊन हस्त नक्षत्रापर्यंत संपते. आकाशात या सर्पाने सुमारे १०० अंशाचा भाग व्यापलेला आहे.
आपल्या येथे त्यास वासुकी असे म्हणतात तर ग्रीक पुराणात त्याचे नाव हायड्रा असे आढळते. इजिप्शियनांना ह्या सर्पाचा आकार नदीसारखा वाटला म्हणून त्यांनी त्यास 'स्वर्गीय नाइल' असे नाव दिले.
माहिती स्रोत: अवकाशवेध.कॉम
अंतिम सुधारित : 8/11/2023
२७ नक्षत्राची सुरुवात अश्विनी नक्षत्राने होते.
दक्षिणेच्या बाजूने झुकलेला हा तारकासमूह म्हणजे अनु...
हिवाळ्यामध्ये सूर्य मावळण्याच्या वेळेस कृत्तिका नक...
हस्त नक्षत्राच्या थोडे पुढे पाहिल्यास आपणास एक सुं...