प्रस्तावना
मनुष्याला जगण्यासाठी चांगल्या निवार्याची म्हणजेच घराची आवश्यकता असते. विशेषतः ग्रामीण भागातील गरिबांना पक्क्या घराचे महत्व अधिक वाटत असते कारण त्यांच्यावरील बेघरपणाचा शिक्का पुसला जाऊन त्यांना अल्पशी प्रतिष्ठा व सुरक्षितता मिळते. भारतामध्ये घरांची टंचाई दूर करणे ही गरिबी हटविण्यासाठी असलेली एक रणनीती आहे.
इंदिरा आवास योजना (आय् ए वाय्)
2001 च्या जनगणनेनुसार ग्रामीण भागात आणखी 148 लक्ष घरांची गरज आहे आणि ती ओळखून भारत निर्माण कार्यक्रमात तिला पुरेसे महत्व देण्यात आले आहे.
- 2005-06 पासून पुढील 4 वर्षांत देशभरात 60 लक्ष घरे बांधण्याची योजना आहे.
- ग्रामीण विकास मंत्रालयातर्फे इंदिरा आवास योजनेच्या माध्यमाने ग्रामीण घरबांधणीचा हा कार्यक्रम राबविण्यात येईल.
- ही योजना केंद्रातर्फे प्रायोजित आहे. येणारा खर्च केंद्र सरकार व राज्य सरकारे 75:25 ह्या प्रमाणात वाटून घेतील.
आर्थिक स्रोतांचे वाटप करण्यासाठी खालील निकष आहेत
- राज्ये/केंद्र शासित प्रदेश
- निराश्रितांचे प्रमाण जास्त असणार्या राज्यांना अग्रक्रम देण्यात येईल
- 75% महत्व घरांच्या टंचाईला असेल तर राज्यपातळी वाटपासाठी योजना आयोगाने निश्चित केलेल्या दारिद्र्याच्या प्रमाणास 25% महत्व देण्यात येईल.
- जिल्हापातळी वाटपासाठी
- 75% महत्व घरांच्या टंचाईला असेल तर अनु. जाती/अनु. जमातींच्या एकंदर लोकसंख्येशी असलेल्या प्रमाणास 25% महत्व देण्यात येईल.
- सर्वसामान्य क्षेत्रातील दर घरास रु. 45,000 पर्यंत अनुदान देण्यात येईल तर डोंगराळ क्षेत्रातील दर घरासाठी ते रु. 48,500 पर्यंत मिळेल. ही रक्कम दोन हप्त्यांमध्ये DRDA तर्फे देण्यात येईल.
- ही योजना विशेषत्वे दारिद्र्यरेषेखालील (BPL) ग्रामीण कुटुंबांसाठी आहे.
- अंमलबजावणीदरम्यानचा महत्वाचा नियम म्हणजे लाभार्थींपैकी किमान 60% अनु. जाती/अनु. जमातींमधील असायला हवेत.
- स्वच्छ शौचालय आणि धूर न करणारी चूल ह्यांचा खर्च ह्या अनुदानात धरला आहे.
- योजनेनुसार घराचे आबंटन कुटुंबातील स्त्री-सदस्याच्या नावाने असण्याला प्राथमिकता देण्यात येईल.
ह्या योजनेत शारीरिक व मानसिक अपंगत्व असलेले लोक, माजी सैनिक, विधवा आणि मुक्त करण्यात आलेले बांधील मजूर ह्यांच्यासाठी राखीव कोटा आहे.
स्रोत: भारतनिर्माण
अंतिम सुधारित : 1/30/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.