2001 च्या जनगणनेनुसार, भारतात 2.19 कोटी अपंग व्यक्ती आहेत म्हणजे एकूण लोकसंख्येच्या 2.13 टक्के. ह्यामध्ये अंध, बहिरे, मुके, मर्यादित हालचाली करू शकणारे (लोकोमोटर) आणि मानसिक समस्या असलेले लोक समाविष्ट आहेत.
अशा अपंग व्यक्तींपैकी 75 टक्के ग्रामीण भागात राहतात. 49 टक्के साक्षर आहेत तर 34 टक्क्यांकडे रोजगार आहे. आतापर्यंत अशा व्यक्तींचे वैद्यकीय दृष्टीने पुनर्वसन करण्याचा विचार केला जात असे मात्र आता सामाजिक पुनर्वसनावर जास्त भर देण्यात येत आहे.
हालचाल 28%
पाहणे 49%
ऐकणे 6%
बोलणे 7%
मानसिक 10%
स्रोत:भारताची जनगणना 2001
हालचाल 51%
पाहणे 14%
ऐकणे 15%
बोलणे 10%
मानसिक 10%
स्रोत: नॅशनल सँपल सर्वे ऑर्गनायझेशन 2002
सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयामधील अपंगत्व विभाग अशा व्यक्तींना सबल व सक्षम करण्याचे काम करतो. 2001 च्या जनगणनेनुसार भारतात 2.19 कोटी अपंग व्यक्ती आहेत म्हणजे एकूण लोकसंख्येच्या 2.13 टक्के. ह्यामध्ये अंध, बहिरे, मुके, मर्यादित हालचाली करू शकणारे (लोकोमोटर) आणि मानसिक समस्या असलेले लोक समाविष्ट आहेत.
भारताच्या राज्यघटनेनुसार सर्व नागरिकांना समता, स्वातंत्र्य, न्याय आणि प्रतिष्ठेचे आश्वासन देण्यात आले आहे व ह्यामध्ये अपंग नागरिकांचाही अर्थातच निर्विवाद समावेश आहे. तसेच घटनेनुसार अपंगांच्या सक्षमीकरणाची थेट जबाबदारी राज्य सरकारांवर सोपवण्यात आली आहे.
घटनेच्या 253 व्या कलमातल्या संघराज्य सूचीतील 13 क्रमांकाच्या मुद्दयामध्ये अधिनियमित केले आहे की “अपंग व्यक्ती (समान संधी, हक्कांची सुरक्षा आणि संपूर्ण सहभाग) कायदा, 1995” नुसार अपंगांना समान संधी मिळेल तसेच राष्ट्र-उभारणीच्या कार्यात त्यांचा संपूर्ण सहभाग राहील. जम्मू-काश्मीर वगळता हा कायदा भारतभर लागू आहे. जम्मू-काश्मीरमध्ये अपंग व्यक्ती (समान संधी, हक्कांची सुरक्षा आणि संपूर्ण सहभाग) कायदा, 1998” अधिनियमित केला आहे.
विविधांगी सहकार्यात्मक विचाराने, सर्व संबंधित सरकारी विभागांना म्हणजे केंद्र सरकारमधील मंत्री, राज्य सरकारे व केंद्रशासित प्रदेश, केंद्रीय व राज्यीय महामंडळे, स्थानिक व अन्य उचित प्राधिकरणे ह्यांना सामील करून ह्या कायद्यातील विविध तरतुदींच्या कार्यान्वयनाच्या दृष्टीने पावले टाकण्यात येत आहेत.
आशिया-पॅसिफिक विभागातील अपंगांचा संपूर्ण सहभाग आणि त्यांना समतेची वागणूक देण्यासंबंधीच्या जाहीरनाम्यावर भारताने स्वाक्षरी केली आहे. बिवाको मिलेनियम फ्रेमवर्क मध्ये ही भारताचा सहभाग आहे ज्यामध्ये सर्वसमावेशक, मर्यादा-मुक्त व हक्काधारित समाज उभा करण्याची कल्पना मांडली आहे. अपंगांचे हक्क आणि प्रतिष्ठा जपण्यासाठी व त्यांचा प्रसार करण्यासाठी यूएन संयुक्त राष्ट्र संघटनेने 30 मार्च 2007 रोजी केलेल्या ठरावावर भारताने त्याचदिवशी स्वाक्षरी केली आहे. 1 ऑक्टोबर 2008 रोजी भारताने ह्या ठरावास मंजुरी दिली.
अपंग व्यक्तींना उपकरणे अथवा साहित्य खरेदीसाठी व उभारणीसाठी मदत (एडीआयपी योजना)
ह्या योजनेचा मुख्य उद्देश आहे गरजू अपंग व्यक्तींना आधुनिक, टिकाऊ व शास्त्रीय उपकरणे व इतर साहित्य उपलब्ध करून देणे ज्यायोगे त्यांच्या वास्तविक, सामाजिक व मानसिक पुनर्वसनास मदत होईल, ते अपंग असल्याचा त्यांच्या जीवनशैलीवर होणारा परिणाम कमी होईल व त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल. अशी उपकरणे ISI प्रमाणित असली पाहिजेत.
ADIP योजनेत दिल्या जाणार्या मदतीची आणि उत्पन्नाची मर्यादा :
(i) दरमहा रु 6,500/- पर्यंत (i) उपकरणांची व साहित्याची पूर्ण किंमत
(ii) दरमहा रु. 6,501/- ते रु. 10,000/- पर्यंत (ii) उपकरणांची व साहित्याची 50% किंमत
ही योजना स्वयंसेवी संस्था, संबंधित मंत्रालयाच्या कार्यान्वयन एजन्सीज्, राष्ट्रीय संस्था व ALIMCO (a PSU) ह्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमार्फत राबविण्यात येईल.
40% अथवा त्यापेक्षा जास्त अपंगता असणारे व ज्यांच्या कुटुंबाचे मासिक उत्पन्न 15,000 रु.पेक्षा जास्त नसेल असे विद्यार्थी ह्या शिष्यवृत्त्यांसाठी पात्र मानले जातात. पदवीपर्यंतचे व पदव्युत्तर तांत्रिक अथवा व्यावसायिक अभ्यासक्रम शिकणार्यांसाठी दरमहा रु. 700/- ची शिष्यवृत्ती देण्यात येते, वसतिगृहांत राहणार्यांसाठी ही रक्कम रु. 1,000/- असते. पदविका तसेच प्रमाणपत्र पातळीवरचे व्यावसायिक अभ्यासक्रम करणार्यांना दरमहा रु. 400/- ची तर वसतिगृहात राहणार्यांसाठी दरमहा रु. 700/- ची शिष्यवृत्ती दिली जाते. ह्या शिष्यवृत्तीखेरीज, विद्यार्थ्यांना दरवर्षी रु. 10,000/- पर्यंतची शैक्षणिक फी देखील परत करण्यात येते. ह्या योजनेअंतर्गतचे आर्थिक सहाय्य पदवीपर्यंतचे व पदव्युत्तर तांत्रिक अथवा व्यावसायिक अभ्यासक्रम करणार्या अंध व बहिर्या व्यक्तींना देखील, संपादन सॉफ्टवेअरसहित असलेल्या संगणकासाठी, मिळू शकते. सेरेब्रल पाल्सी ग्रस्त विद्यार्थ्यांसाठी सपोर्ट अॅक्सेस सॉफ्टवेअरसाठी मदत मिळते.
अपंगांच्या सक्षमीकरणाच्या धोरणाशी सुसंगत राहून व त्यांच्या विविधांगी समस्यांवर मात करण्याच्या दृष्टीने प्रत्येक मुख्य अपंगतेसाठी खालील राष्ट्रीय संस्था/शिखर पातळी संस्थांची स्थापना करण्यात आली आहे:-
(i) दृष्टि-अपंगांसाठी राष्ट्रीय संस्था, देहरादून
(ii) अस्थिव्यंग-अपंगांसाठी राष्ट्रीय संस्था, कोलकाता
(iii) श्रवण-अपंगांसाठी अली यावर जंग राष्ट्रीय संस्था, मुंबई
(iv) मानसिक अपंगांसाठी राष्ट्रीय संस्था, सिकंदराबाद
(v) पुनर्वसन प्रसिक्षण व संशोधनासाठी राष्ट्रीय संस्था, कटक
(vi) शारीरिक अपंगतेसाठी संस्था, नवी दिल्ली.
(vii) बहुअपंग व्यक्तींच्या सबलीकरणासाठी राष्ट्रीय संस्था (NIEPMD), चेन्नई
अंतिम सुधारित : 4/27/2020
एखाद्या शहरांतील रस्त्यावर राहणार्या मुलांचा उल्...
आधुनिकत्व (मॉडर्निटी) म्हणजे तीन महत्त्वाच्या बाबत...
आर्थिक वर्षातील पहिल्या ग्रामसभेमध्ये ज्याप्रमाणे ...
ग्रामसभेचे अधिकार मुंबई ग्रामपंचायत [सुधारणा] अधिन...