आर्थिक वर्षातील पहिल्या ग्रामसभेमध्ये ज्याप्रमाणे मागील वर्षाचा आर्थिक अहवाल व लेखा परीक्षण अहवाल ठेवणे आवश्यक आहे.
त्याच प्रमाणे ऑक्टोबर / नोव्हेंबर महिन्यामध्ये होणाऱ्या ग्रामसभेमध्ये पुढील वर्षाचे अंदाजपत्रक सादर करणे आवश्यक आहे. त्यामुळे या ग्रामसभेत अंदाजपत्रकाची ग्रामसभा असेही म्हणतात.
प्रत्येक ग्रामपंचायतीला पुढील वर्षाचे त्यांचे अंदाजपत्रक ३१ डिसेंबरपूर्वी ग्रामपंचायतीला सादर करणे बंधनकारक आहे.
त्यामुळे या महिन्यातील ग्रामसभेमध्ये पंचायतीने तयार केलेले अंदाजपत्रक ग्रामसभेपुढे ठेवून ग्रामसभेच्या काही सूचना असतील तर त्या सूचना विचारात घेऊन त्याप्रमाणे अंदाजपत्रकाला मंजूरी घेऊन ते ३१ डिसेंबर पूर्वी पंचायत समितीला सादर करावे लागते.
संदर्भ : लोकशाहीचे बलस्थान व गावाचे व्यासपीठ : ग्रामसभा
वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट, पुणे
अंतिम सुधारित : 6/5/2020
एखाद्या शहरांतील रस्त्यावर राहणार्या मुलांचा उल्...
ग्रामसभेचे अधिकार मुंबई ग्रामपंचायत [सुधारणा] अधिन...
अपंग व्यक्तींपैकी 75 टक्के ग्रामीण भागात राहतात. आ...
आधुनिकत्व (मॉडर्निटी) म्हणजे तीन महत्त्वाच्या बाबत...