माझ्या गटातील एका महिलेने, नंदा बाळू भांगरे यांनी मिरची कांडप मशिनरी आणून आपला उदयोगधंदा चालू केला आहे. त्या उद्योगधंद्यातुन तिला पैसे तर मिळतातच शिवाय गावातील लोकांना बाहेर न जाता येथे चांगली सोय असल्या कारणाने गावाचे कल्याण केलेले आहे. तरुण म्हातारी माणसे येथून राजूर येथे १० कि. मी. दूर आहे. तसेच, त्यांना तिथपर्यंत जाता येत नाही. म्हणून या गिरणी कांडप मशिनरीचा चांगला उपयोग होतो.
मी येथील आठ बचत गटांचे काम करत असताना कोणाचे व्याज येणे आहे, कोणाचे किती शिल्लक बाकी हे सर्व कामे करत असते. माझ्या मते बचतगटामुळे महिला एकत्र येतात. बचत भरतात, कर्जाची देवाण-घेवाण करतात. महिला बचत गटांचे रजिस्टर पूर्ण करत असल्याने महिलांचा आत्मविश्वास खूप चांगला आहे.
महिला बचत गटाच्या महिलांना परसबाग म्हणजे काय त्याचा उपयोग कोणत्या कारणासाठी होतो ते महिलांना माहित नसल्यामुळे, त्यांना परसबाग तयार करण्यास सांगितले व त्या परसबागेपासून वेगवेगळ्या पालेभाज्या मिळाल्याने आरोग्यास उपायकारक आहे. त्यामुळे महिलांना परसबागेचे काय महत्त्व आहे ते महिलांना कळले.
तसेच, माझ्या गावात एच बी कॅम्प मागील वर्षी झाला. त्यावेळेस भरपूर माणसांचे एच बी चे प्रमाण हवे तेवढे नसल्याकारणाने महिला, पुरुष, युवक यांना हिरव्या पालेभाज्या खाण्याबाबाद माहिती दिली व मुठभर शेंगदाणे व थोडा गुळ खडा दररोज खाल्ला तर तुमचे एच बी चे रक्तातील प्रमाण वाढेल. कालांतराने २०१३ जानेवारी मध्ये पुन्हा एच बी कॅम्प घेण्याचे ठरवले. त्यावेळेस बरेच महिला, पुरुषांचे एच बी चे प्रमाण वाढलेले दिसल्यामुळे आरोग्यास त्याचा चांगला उपयोग जाला.
आशय लेखिका : अर्चना नवनाथ वळे (खडकी खुर्द)
अंतिम सुधारित : 12/25/2019
अपंग व्यक्तींपैकी 75 टक्के ग्रामीण भागात राहतात. आ...
सरकारने 4882 कोटी रुपयांच्या राष्ट्रीय अन्न सुरक्...
एखाद्या शहरांतील रस्त्यावर राहणार्या मुलांचा उल्...
आधुनिकत्व (मॉडर्निटी) म्हणजे तीन महत्त्वाच्या बाबत...