सभासदांचा पैसा बचतरूपाने गटाकडे एकत्र येतो. कर्ज म्हणून गटाकडून तो परत काही सभासदांकडे जातो. काही पैसा शिल्लक राहतो. जमा – त्यातून खर्च व राहिलेली शिल्लक – किती सोपे आहे हिशोब ठेवणे.
स्वावलंबी बचतगट हा पूर्णपणे विश्वासाच्या, भरवशाच्या पायावर उभा आहे. आणि त्या करिताच तुम्हांला पैसा न् पैशाचा चोख हिशोब ठेवणे जरुरीचे आहे. देवाघरचे- पावसाचे पाणी कसे नितळ अन् स्वच्छ असते तसा तुमचा हिशोब पाहिजे. खूप सोपी रीत आहे. कशी ती पाहू –
तुमच्याजवळ आम्ही छापलेली हिशोबाची वही आहे. (नसल्यास परिशिष्ट – ३ पहा.) त्यामध्ये चार भाग आहेत.
१. महिन्याचा जमाखर्च
२. प्रत्येक सभासदाचे खातेपान
३. महिन्याच्या संक्षिप्त तपशील
४. बँकेच्या किंवा इतर संस्थेकडून घेतलेल्या कर्जाचा तपशील.
हे खुलासेवार पाहू –
१. महिन्याचा जमाखर्च (भाग १)
हिशोब ठेवणाऱ्यास सूचना :- तुमच्या बचत गटाची मिटिंग सुरु होण्यापूर्वीच ‘येणे’ चे कॉलम तुम्ही लिहून तयार ठेवा.
उजव्या बाजूस जमा (Receipt) आहे.
पहिला कॉलम ‘बचत’ म्हणजे डाव्या बाजूला जी रक्कम लिहिली आहे, ती सभासदाने दिल्यानंतर या कॉलम मध्ये लिहा.
बचत वेळेवर भरली नसल्यास त्या वरील ‘दंड’ जो ठरला असेल तो दुसऱ्या कॉलममध्ये वसुल करून लिहा.
त्याचप्रमाणे कर्ज व व्याज काही जमा केले, तर त्याप्रमाणे लिहा.
‘मागील शिल्लक’ काही असेल तर लिहा.
त्यानंतर जमा बाजूच्या सर्व रकान्यांची एकूण रक्कम खालच्या
कॉलम्स मध्ये येईल ती याप्रमाणे लिहा.
या सर्वांची बेरीज ‘एकूण जमा’
वरील इतर जमा म्हणजे बचत, दंड, कर्जावरील व्याज, याच्या शिवाय जमा होणारी रक्कम, उदा. देणगी, धंद्यातील नफा, बँकेकडून घेतलेले कर्ज, बँकेच्या पुस्तकात जमा झालेले व्याज, इत्यादी
^ आता आपल्याकडे पैसे जमा झाले आहेत. गटामध्ये जो निर्णय होईल त्याप्रमाणे सभासदांना कर्ज देणे व ते जमा बाजूला जो कॉलम आहे ‘दिलेले कर्क’ त्यामध्ये दिलेल्या सभासदांसमोर लिहिणे व त्याची जी बेरीज आहे ती नंतर खालील ठिकाणी मांडा
इतर खर्च म्हणजे, बैठकीचा चहापाण्याचा खर्च, स्टेशनरी खरेदी, इत्यादी.
टीप – महिन्याचा हिशोब लिहितेवेळी एखादया सभासदाने जर बचत रक्कम भरलेली नसेल तर ती रक्कम सभासदाच्या नावासमोर ‘दिलेले कर्ज’ मध्ये लिहा आणि त्यावर व्याज पण आकारण्यात येईल.
हा झाला महिन्याचा जमाखर्च.
२. सभासदांचे खातेपान (भाग २)
३. महिन्यांचा संक्षिप्त तपशील (भाग ३)
त्यानंतर अनुक्रमे ‘कर्जदार सभासदांची नावे’ व नावावर कर्ज’ जे कॉलम्स आहेत. हे लक्षात ठेवा, की हे कॉलम्स आहेत. हे लक्षात ठेवा, की हे कॉलम्स भरताना तुम्ही एक करायचे की सभासदाचे खाते पान उघडायचे व त्यामध्ये ‘एकूण येणे’ जे लिहिले असेल, ते या ठिकाणी लिहायचे. (ज्यांचे नावावर कर्ज येणे आहे, फक्त तीच नावे या ठिकाणी लिहा.)
सभासदांची नावे व रक्कम लिहून झाल्यानंतर ‘आतापर्यंतचा खर्च’त्या खाली लिहा.
‘आत्तापर्यंतचा खर्च’ म्हणजे मागील महिन्यापर्यंत झालेल्या ‘आत्तापर्यंतच्या खर्चात’ या महिन्याचा ‘इतर खर्च’ मिळवा व लिहा.
नंतर तुमच्याकडे असलेली शिल्लक लिहा. (हातातील +बँकेतील)
या सर्वांची बेरीज करा म्हणजे ‘एकूण रक्कम (अ)’ तयार होईल.
हे सर्व केल्यानंतर तुम्हाला कोणी विचारले, की तुमचा गट सुरु झाल्यापासून किती रुपयांचा व्यवहार केलात तर एका क्षणात तुम्ही सांगू शकाल की इतक्या सभासदांकडून इतके येणे आहे. खर्च आतापर्यंत एवढा झाला आहे व शिल्लक इतकी आहे. बचतगटाचे पूर्ण चित्रच तुम्ही उभे करू शकता.
हे खाली दिलेले जडन रकाने आहेत ते फत ताळा करण्याकरिता आहेत. सरावाने ते तुम्हास जमतील फक्त त्यातील एकूण रक्कम व एकूण बेरीज यावर लक्ष ठेवा. |
आम्हास खात्री आहे, की हिशोब तपासनीस-ऑडिटर सुद्धा तुमची चूक काढू शकणार नाही. (मात्र एक काम करा – लिहिण्यापूर्वी कॉलम नीट वाचा, मगच आकडे लिहा. पहिले एक- दोन महिने शिसपेन्सिलने लिहिले तरी चालेल म्हणजे र्ब्र्ने चूक दुरुस्त करता येईल. )
४. बँकेच्या किंवा इतर संस्थेकडून घेतलेल्या कर्जाचा तपशील (भाग ४)
बचत केली महिलांनी, रुपया रुपया जमवला, नेऊन घातला बँकेत, वापर केला पैशांचा, उभा राहिला जोडधंदा, पैसा हातात राहिला औदा II |
राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (NABARD) व रिझर्व बँक यांचे परिपत्रकानुसार बँकांना आदेश देण्यात आले आहेत, की स्वयंसेवी संस्था आणि स्वावलंबित अल्पबचत गट (नोंदणी झालेले किंवा न झालेले) यांच्या मार्फत खेडयातील गरीब लोकांना पतपुरवठा उपलब्ध करावा.
ही पत निर्माण होण्याकरिता गटाने कमीत कमी श महिने आपला कारभार लोकशाही पद्धतीने केलेला असावा. त्यांचे हिशेब व्यवस्थित असावेत.
त्याचप्रमाणे इतरही काही संस्थांकडून अल्पबचत गटास कर्ज मिळण्याची शक्यता असते. त्याकरिता आपल्या हिशोबाच्या पुस्तकात चौथ्या भागात त्याचा हिशोब ठेवण्याकरिता सोपी पद्धत दिलेली आहे. कसे तर पाहू.---
मार्च महिन्यामध्ये जी कर्जफेड बाकी असेल, ती रक्कम आपण वर्षअखेर हिशोब करताना विचारात घेऊ. त्याकरिता नवीन पान घेण्याची जरूर नाही. मात्र पहिले कर्ज फिटल्यानंतर नवीन कर्जास नवीन पानावर सुरुवात करावी.
परिशिष्ट ३, भाग ४ मध्ये, आपण बघू शकाल की महाराष्ट्र बँकेकडून दि. ५-१-९७ रोजी द.सा.द.शे. १०.५% व्याज दराने तीन वर्ष मुदतीसाठी रु. ५०००/- कर्ज घेतले असून तीन वर्ष मुदतीत आपणास रु. ६५७६/- परत करावे लागतील, त्याचा मासिक हप्ता रु. १८३/- आहे. परतफेडी मध्ये मुद्दल अधिक व्याज अशी रक्कम असते म्हणजे घेतलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम तुम्हास फेडावी लागते. त्याचा हिशेब बँकेचे अधिकारी करतील. त्यांनी सांगितल्याप्रमाणे पैसे भरणे, एवढेच तुमचे काम.
वर्षाअखेर :
हिशोब लिहिण्याच्या पद्धती आपण शिकलात. पण हे रहाटगाडगे असेच चालू ठेवायचे का? नाही. वर्षाच्या वर्षाला हिशोब पूर्ण करून बँकेचे किती देणे आहे, गटाला व पर्यायाने सभासदांना किती नफा झाला हे कळावयास पाहिजे व परत नवीन पानावर नव्या वर्षाचा हिशोब लिहिणे चालू केले पाहिजे.
बँकेचे किंवा इतर संस्थांचे आर्थिक वर्ष मार्च महिन्यात संपते. त्याकरिता आपणही आपल्या बचत गटाचा हिशोब दरवर्षी मार्च महिन्यात पूर्ण करू. तुमचा बचत गट प्रथम कोणत्याही महिन्यात सुरु केलेला असला, तरी मार्च महिन्यात त्या वर्षाचा हिशोब पूर्ण करा व परत त्याच महिन्यात नवीन पानावर नवीन वर्षाच्या नोंदी घ्या. कसे ते आता आपण पाहू-
टीप – या रकमा लाल पेनने लिहा म्हणजे आपल्या लक्षात राहील की ही रक्कम प्रत्यक्षात जमा झालेली नाही. नवीन वर्षाचा हिशोब लिहिताना त्यांचे नावांवर ते कर्ज म्हणून दाखवायचे आहे. |
खातेपानावर पण जमा केलेल्या दाखवा. आता महिन्याचा जमाखर्चामध्ये तुमची सर्व रक्कम, काही प्रत्यक्ष व काही कागदोपत्री जमा झाली आहे, म्हणजे शिल्लक (बँकेतील + हातातील) दाखवली गेली आहे.
नवीन वर्षाचा हिशोब आपण या पानावर सुरु करू.
- महिना लिहा. “मार्च(नवीन वर्ष)”
- सर्व सभासदांची नावे लिहून घ्या व त्यांच्या नावापुढे जमा बाजूला (उजवी बाजू) मार्चअखेर त्यांची जी एकूण बचत झाली, ती ‘बचत’ कॉलम मध्ये लिहा.
- त्याचप्रमाणे शेवटी जो कॉलम आहे. ‘दिलेले कर्ज’, त्यामध्ये ज्यांचेकडे प्रत्यक्ष कर्ज येणे बाकी आहे, (मार्चचा हिशेब पुर करण्याकरिता कागदोपत्री त्यांचे कर्ज आपण जमा दाखविले होते) व ज्यांना मार्च महिन्यात नवीन कर्ज देऊ, ती रक्कम त्यांचे नावासमोर लिहा. व त्याचप्रमाणे त्यांच्या खात्यावरही लिहा.
टीप – नवीन वर्षाच्या हिशोबाच्या पानावर उजव्या बाजूस ‘जमा- बचत’ व ‘दिलेले कर्ज’ हे दोनच कॉलम भरले जातील. |
- आता चालू महीन्याचा सारांश जो उजव्या कोपऱ्यात आहे तो बघू – ‘मागील शिल्लक’ शून्य येणार.
- ‘एकूण बचत जमा’ लिहा (उदाहरणात ती रु. १६३८/- आहे.)
- कर्ज वसूल- शून्य
- व्याज- शून्य
- मात्र ‘इतर जमा’ मध्ये मार्च महिन्यात बँकेचे जे देणे राहिले आहे (परत फेड बाकी) ते दाखविले आहे. रु. ४७२२/-
- आता बेरीज करून ‘एकूण जमा’ लिहा. रु. ६३६०/-
- दिलेले कर्ज – रु. ६०००/-
- इतर खर्च – शून्य
- एकूण खर्च – रु. ६०००/-
- आता एकूण जमामधून एकूण खर्च वजा करा. राहील ती शिल्लक जसे की उदाहरणात रु. ३६०/-
टीप – वरील नोंदी शिवाय कुठल्याही नोंदी. जशा ‘दंड’, ‘कर्जफेड’, ‘व्याजफेड’, ‘इतर खर्च’ येणार नाही. |
हे वर लिहिलेले तुम्हाला मनोरंजक वाटणार नाही, कारण ही काही राजाराणीची गोष्ट नाही, यांत आहे आकडेमोड, पण हे निश्चित, की तुम्ही गटाचा हिशोब लिहायला लागलात की या पुस्तिकेप्रमाणे कॉलम भरा.हिशेब पक्का. तुम्ही म्हणाल हे किती सोपे आहे हिशोब ठेवणे.
लेखक : वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट
स्त्रोत : थेंबे थेंबे तळे साचे - पुस्तिका
अंतिम सुधारित : 8/18/2020
खातेदार किंवा गिऱ्हाईक हे कर्ज घेण्यासाठी नेहमीच इ...
रत्नागिरी जिल्ह्यात सह्याद्रीच्या रांगेत वसलेले मु...
दारिद्रयाचे दुष्टचक्र नष्ट करण्यासाठी आपणास एका पर...
प्रामुख्याने गरिबांच्या जीवनात त्यांच्या दैनंदिन ज...