कुटुंबाच्या अनेक गरजा असतात. प्रामुख्याने गरिबांच्या जीवनात त्यांच्या दैनंदिन जीवनाच्या प्राथमिक गरजा भागवण्याकरताच त्यांचे उत्पन्न खर्च होते. आणि त्यांना तेवढेच शक्य असते. त्याचा परिणाम म्हणजे या कुटुंबांना कर्ज घ्यावे लागते, किंवा कायमच ‘सालकरी’ म्हणून सावकारांकडे किंवा श्रीमंतांकडे राहावे लागते.
कर्ज नेहमीच घेतले जाते –
१. उपजीविकेसाठी
(उदा. दैनंदिन गरजा, आरोग्य, शिक्षण, अन्नधान्य इ.)
२. कृषीय=उत्पादनाच्या साधनांसाठी
(उदा. बी-बियाणे, खाते, साहित्य इ.)
३. या व्यतिरिक्त इतरही कारणांसाठी कर्ज घेतले जाते.
(उदा. लग्नासाठी अवाढव्य खर्च, दारू, जागर इ.)
गटामध्ये ह्या प्रकरणाचा ‘कर्ज का घेतले’ याचे टीकात्मक विश्लेषण करण्यासाठी अवलंब करावा. याचा उपयोग तोटे कमी करण्यासाठी आणि त्याचा फायदा कोण घेतो आहे, हे पाहण्यासाठी होईल.
सत्र २ :
१. लागणारा वेळ : १ ते १ १/२ तास. गटाची एकत्रित चर्चा
२. बचत स्थापन करण्याकरिता जो मार्गदर्शक किंवा महिला समाज सेविका आहे, त्यांनी जमलेल्या सभासदांना एक प्रश्न विचारावा की :
त्यांच्याकडून निरनिराळी उत्तरे येईपर्यंत थांबा.
३. फळ्यावर ३ मथळे करा :
अ) प्राथमिक गरजांसाठी घेतलेले कर्ज
ब) उद्योगधंद्यासाठी घेतलेले कर्ज
क) अनुत्पादक कर्ज
४. खाली दिलेल्या कारणांसाठी उत्तरे आली तर ठीक आहे. नाही तर खालील करणे त्यांच्या लक्षात आणून दया.
अ) प्राथमिक गरजांसाठी घेतलेले
शिक्षण, औषधोपचार, अन्न धान्य खरेदीसाठी, घर बांधणीसाठी किंवा घर दुरुस्तीसाठी
ब) उद्योगधंद्यासाठी घेतलेले कर्ज
क) अनुत्पादक कर्ज
प्राथमिक गरजांशिवाय इतर कारणांसाठी हे कर्ज घेतले जाते. ह्या प्रकारचे कर्ज घेणे टाळले पाहिजे किंवा घेण्याचे प्रमाण कमी केले पाहिजे. ह्या कर्जामुळे मालमत्ता नष्टप्राय होते व परतफेड फार कठीण जाते.
उदा. सण साजरा करण्यासाठी, लग्नाचा थाटमाट व त्यावरील अनावश्यक खर्च.
५.लग्नाकरिता येणाऱ्या खर्चाविषयी चर्चा करा. गटाकडून आलेली उत्तरे लिहून काढा.
लग्नाचा खर्च : हा खर्च खालील गोष्टींसाठी केला जातो –
६. आता प्रत्येक मुद्द्यांचे पृथक्करण करा –
अ) हा खर्च खरोखर आवश्यक आहे का ?
ब) यापैकी कोणत्या गोष्टी टाळता येतील, किंवा कमी करता येतील?
क) हुंडा प्रथा ही चांगली आहे का?
ड) हुंडा देणे व घेण्याची प्रथा मोडणे का अवघड जाते ?
७. आपण कर्ज कोणाकडून घेतो ?
कर्ज घेण्याची करणे सभासदांकडून आपणास मिळाली. त्यांच्या स्वतःच्या अनुभवांवर व जीवनात घडलेल्या प्रसंगावरून त्यांनी खालील प्रश्नांची उत्तरे दयावीत.
अ) आपल्या गावात सहसा कर्ज कोणाकडून घेतले जातात ?
ब) कर्जावर व्याजाचा दर काय असतो ?
क) अशा प्रकारे घेतलेल्या कर्जाचे परिणाम काय झाले?
८. निष्कर्ष – गटाचे निर्णय
ह्या सत्रानंतर आपण हा निर्णय घेऊ शकाल की, कर्ज कोणत्या कारणासाठी दयायचे आणि कोणत्या कारणांना प्राधान्य दयायचे.
बचत गटाने कर्ज वितरीत करताना खालील गोष्टींचा विचार करावा –
९. गटाने कर्ज दयायला सुरुवात केल्यानंतर आपण हा विषय परत घेऊ शकता व आपल्या गटाचे निर्णय पक्के करू शकता.
लेखक : वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट
स्त्रोत : थेंबे थेंबे तळे साचे - पुस्तिका
अंतिम सुधारित : 8/29/2020
दारिद्रयाचे दुष्टचक्र नष्ट करण्यासाठी आपणास एका पर...
टसर कोषाचे उत्पादन हे अतिशय कष्टाचे आणि जोखमीचे का...
रत्नागिरी जिल्ह्यात सह्याद्रीच्या रांगेत वसलेले मु...
खातेदार किंवा गिऱ्हाईक हे कर्ज घेण्यासाठी नेहमीच इ...