खातेदार किंवा गिऱ्हाईक हे कर्ज घेण्यासाठी नेहमीच इतर बाहेरच्या मार्गाचा अवलंब करतात (उदा. सावकार, बँक व गावातील श्रीमंत व्यक्ती ज्यांच्याकडे मोठया प्रमाणावर भांडवल असते.) ज्या वेळेस ते कर्ज परत करतात, त्या वेळी दिले जाणारे व्याजही त्या सावकार किंवा श्रीमंत व्यक्तीकडे जाते.
जेव्हा महिलांना बचत करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते, त्या वेळी महिलांच्या गटाचे भांडवल : निधी तयार होतो. बचतगट हा देखील कर्ज घेण्यासाठी एक मार्ग आहे. या बचतगटा मार्फत कर्ज घेतल्यास मिळणारे व्याज गटालाच मिळते. बाहेर जात नाही.
अनेक गटांनी आपसात देवाणघेवाण केली आहे. त्यांच्या अनुभवावरून दिसून आलेले फायदे खालीलप्रमाणे-
१.गरजेच्या वेळेला ताबडतोब पैसे मिळतात. बँकेप्रमाणे कोणत्याही कागदपत्रांची पूर्तता करावी लागत नाही.
२.व्याजामुळे गटाचे भांडवल वाढण्यास मदत होते. व्याजाचे पैसे बाहेरील व्यक्तीकडे (उदा. सावकाराकडे) न जाता गटातच राहतात.
३. कोणाची गरज जास्त तीव्र आहे याबद्दल महिलांना चर्चा पडताळून पहायची सवय लागते. तसेच त्या स्वतः निर्णय घेऊ लागतात. त्यामुळे त्यांच्यात जास्त जवळीकीचे नाते निर्माण होते. त्यामुळे त्या इतर विषयांबद्दलही बोलू लागतात.
गटांतर्गत देवाणघेवाणीचा प्रकरणाभ्यास –
खालील प्रकरणाभ्यासात २० महिलांचा गट प्रत्येकी २० रु. प्रमाणे बचत करीत आहे. कर्ज महिना २% व्याजाने दिलेले आहे.
महिला |
बचत जमा |
दिलेले कर्ज |
व्याज |
जानेवारी |
४०० |
४०० |
- |
फेब्रुवारी |
४०० |
८०० |
८ |
मार्च |
४०० |
१२०० |
१६ |
एप्रिल |
४०० |
१६०० |
२४ |
मे |
४०० |
२००० |
३२ |
जून |
४०० |
२४०० |
४० |
जुलै |
४०० |
२८०० |
४८ |
ऑगस्ट |
४०० |
३२०० |
५६ |
सप्टेंबर |
४०० |
३६०० |
६४ |
ऑक्टोबर |
४०० |
४००० |
७२ |
नोव्हेंबर |
४०० |
४४०० |
८० |
डिसेंबर |
४०० |
४८०० |
८८ |
एकूण |
४८०० |
- |
५२८ |
लेखक : वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट
स्त्रोत : थेंबे थेंबे तळे साचे - पुस्तिका
अंतिम सुधारित : 6/5/2020
दारिद्रयाचे दुष्टचक्र नष्ट करण्यासाठी आपणास एका पर...
टसर कोषाचे उत्पादन हे अतिशय कष्टाचे आणि जोखमीचे का...
प्रामुख्याने गरिबांच्या जीवनात त्यांच्या दैनंदिन ज...
प्रत्येकी पाच महिला असतील अशांना सामावून घेण्यात आ...