वरुडी पठार या गावामध्ये वाटर संस्थेचे प्रकल्पांतर्गत काम चालू आहे. या प्रकल्पात मी वसुंधरा सेविका म्हणून काम करत आहे. सुरुवातीला प्रकल्पातून मिळालेल्या वसुंधरा सेविका ट्रेनिंगमुळे गट कसे स्थापन करायचे त्याचे नियम काय असतात हे शिकल्यानंतर गावात घरोघरी जाऊन गृह भेटी केल्या. त्यात गावात असे दिसून आले कि ७ गट चालू होते पण ते गट फक्त भिशी स्वरुपात चालू होते. त्या गटांना गटाच्या नियमांचे मार्गदर्शन केले. त्यामुळे ते गट आता नियमाप्रमाणे सुरु आहेत. त्यांच्या बैठका नियमित होतात. त्यानंतर आणखी गृह भेटी करून ३ गट तयार केले आहेत. त्या गटांना नवीन मार्गदर्शन केले आहे. तेव्हा ते सुरवातीपासून नियमित आणि व्यवस्तीत चालू आहेत. तेव्हा आता १० गट असल्यामुळे महिला एकत्र येतात एकमेकिंचे सुख दुख जाणून घेतात आणि त्यावर येणाऱ्या अडचणी सोडू लागल्या आहेत. यातून असे दिसू लागले आहे कि पहिल्या महिला घराबाहेर पडत नव्हत्या पण आता त्या एकत्र येऊन आपले विचार सांगू लागल्या आहेत. तसेच एकमेकींचा विचार सुधा करू लागल्या आहेत. याचे एक उदाहरण म्हणून –
आमच्या गावातील संयुक्त महिला समिती मधील एका महिलेवर अचानक प्रसंग ओढवला. अनिता बाळासाहेब फटांगरे हिचा पती (बाळासाहेब ताबाजी फटांगरे) हा ग्रामपंचायत मध्ये शिपायाचे काम करीत होता. तो एप्रिल महिन्यामध्ये रात्रीच्या वेळेस रस्त्यावरचे बल्ब लावण्याकरिता विजेच्या खांबावर चढला असता अचानक वीज प्रवाह सुरु झाल्याने तो तिथेच चिकटला आणि मरण पावला. त्यामुळे अनिता वर फार मोठा प्रसंग ओढवून आला. तिची दोन मुले आहेत. पहिला मुलगा ५ वर्षाचा आणि दुसरा मुलगा ३ वर्षाचा आहे. आणि सासू सासरे हे पूर्ण थकलेले आहेत. तेव्हा त्यांच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी पूर्णपणे अनितावर पडली आहे. गटातील सर्व महिलांच्या लक्षात आले आहे कि अनिता वर आलेला प्रसंग खूप वाईट आहे. आणि त्यानंतर महिलांनी विचार करून गटातून ५०० रुपये प्रत्येक गटातून अनिताला आर्थिक मदत म्हणून द्यायचे ठरविले.
असे महिलांनी ठरविल्यानंतर गावातील बर्याच नागरिकांनी रुपये १०० प्रमाणे ३५०००/- मिळून जमा करून दिले आणि दोन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी म्हसोबा विद्यालयाचे संस्थापक जाधव सर यांनी घेतली आहे. अशा पद्धतीने आर्थिक मदत केली आहे.
आशय लेखिका : अलका हुंबरे, वरुडी पठार (संगमनेर)
अंतिम सुधारित : 7/6/2020
एखाद्या शहरांतील रस्त्यावर राहणार्या मुलांचा उल्...
सरकारने 4882 कोटी रुपयांच्या राष्ट्रीय अन्न सुरक्...
अपंग व्यक्तींपैकी 75 टक्के ग्रामीण भागात राहतात. आ...
आधुनिकत्व (मॉडर्निटी) म्हणजे तीन महत्त्वाच्या बाबत...