१. पोलीस अधिक्षक
२. पोलीस उपअधिक्षक
३. पोलीस निरीक्षक
४. पोलीस उपनिरीक्षक
५. पोलीस पाटील
पोलीस खाते हे महसूल खात्यास पुढील उपक्रमात खालील प्रकारे समन्वय करेल.
१. आपत्ती काळात वायरलेस यंत्रणेमार्फत संपर्क / दळणवळण करेल.
२. आपत्तीच्या काळात बघ्यांची गर्दी नियंत्रित करणे, वाहतुकीची व्यवस्था लावणे.
३. आपत्तीग्रस्त भागातील संपत्ती आणि मौल्यवान वस्तूचे रक्षण करणे.
४. आपत्तीच्या काळात जखमींना प्राधान्याने दवाखान्यात/ इस्पितळात हलविले जात असताना गर्दी आवरण्याचे कार्य आणि बंदोबस्ताचे कार्य पोलीस प्रशासनामार्फत केले जाईल.
५. मृताची योग्य ओळख करून त्याची योग्य ती कार्यवाही करणे.
६. मदतीस आणि सोडवणूकीस सहजपणे जाता येईल अशी व्यवस्था निर्माण करणे.
७. पोलिसांच्या पद्धतीनुसार पंचनामा करणे.
८. रेल्वे स्टेशन, बस स्टँड यांच्यावर नियंत्रण बंदोबस्त ठेवणे.
९. आपत्तीग्रस्त भागाची सातत्याने पाहणी करणे.
१०. कायदा व सुव्यवस्था काबूत आणि समाज विघातक प्रवृत्तींना नियंत्रणात ठेवणे.
११. आपत्ती ग्रस्तांना हलवण्यासाठी वाहनाची व्यवस्था करणे.
१२. लोकांना व्यक्तिगत माहितीसाठी मार्गदर्शन करणे.
१३. एन.एस.एस./ एन. वाय. के. एस/ आर. एस.पी यांच्या माध्यमातून ट्राफिकचे नियंत्रण करणे.
१४. आपत्तीच्या काळात जिल्हाधिकारी कार्यलयाच्या नियंत्रण कक्षास दर दोन तासांनी घटनेविषयी अदयावत माहिती देणे.
माहिती संकलन : बाळू भांगरे
माहिती स्रोत : आपत्ती जोखीम कार्यक्रम, जिल्हा अधिकारी कार्यालय व जिल्हा नियंत्रण कक्ष, गडचिरोली
अंतिम सुधारित : 9/5/2019
विविध क्षेत्रे पादाक्रांत करुन महिलांनी आपला ठसा स...
आपत्तीच्या काळात आरोग्य विभागाची जबाबदारी
सध्या संगणक आणि अँन्ड्राईड फोनचा जमाना आहे. त्यात ...
आपत्तीच्या काळात अग्निशमन विभागाची जबाबदारी.