अग्निशमन दल अधिकारी यांच्या जबाबदा-या
आपत्तीपूर्वी व आपत्तीच्या वेळी अग्निशमन दल अधिकारी यांनी खालील जबाबदा-या पार पाडणे आवश्यक आहे.
१. बाधित क्षेत्रामध्ये अडकलेल्या लोकांची सुटका करणे.
२. जखमी व्यक्तींना रुग्णालयामध्ये स्थलांतरीत करण्यास प्राधान्य देणे.
३. बाधित क्षेत्रामधून सर्व व्यक्तींचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करणे.
४. बाधित क्षेत्रामधील लोकांची विद्युत उपकरणे आणि विद्युत पुरवठा यापासून सुरक्षा करणे.
५. रस्त्यावर पडलेल्या झाडांमुळे निर्माण झालेला अडथळा दूर करून वाहतूक सुरळीत ठेवणे.
६. तालुका प्रशासनाशी समन्वय साधून, पडझड झालेल्या घरांमधून लोकांची सुटका करणे.
७. बाधित क्षेत्रामध्ये घडणा-या घटना, तसेच नेमणूक करण्यात आलेल्या कर्मचा-याविषयी अग्निशमन नियंत्रण कक्षास माहिती देणे व अतिरिक्त माहिती बाबत कळवणे.
माहिती संकलन: बाळू भांगरे
माहिती स्रोत: जिल्हा आपत्ती धोके व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर
अंतिम सुधारित : 6/26/2020
कृषी, अन्न व सहकार विभागातून पुरवठा विभाग स्वतंत्र...
आपत्तीच्या काळात रेल्वे विभाग व एस. टी. महामंडळाची...
कृषी, अन्न व सहकार विभागातून पुरवठा विभाग स्वतंत्र...
आपत्तीच्या काळात कृषि विभागाची जबाबदारी