वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईडच्या प्रमाणामध्ये औद्योगीकरण व अन्य हस्तक्षेपामुळे भर पडत आहे, त्यामुळे वनस्पती आणि सूक्ष्मजीवांच्या साखळी प्रक्रियेतून पृथ्वीवरील मातीमध्ये असलेल्या कार्बनचा साठा मुक्त होण्याचे प्रमाण वाढू शकत असल्याचा इशारा प्रिन्सटन विद्यापीठातील संशोधकांनी दिला आहे. माती, वनस्पती आणि कार्बन यातील गुंतागुंतीच्या संबंधाचे विवरण करणारे संगणकीय प्रारूप संशोधकांनी केले आहे. हा अहवाल "जर्नल नेचर क्लायमेंट चेंज' मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.
पृथ्वीवरील सर्व वनस्पती आणि वातावरणातील कार्बनच्या दुप्पट कार्बन हा पृथ्वीच्या मातीमध्ये साठलेला आहे. मात्र माणसांच्या कार्बनच्या साखळीमध्ये वाढत असलेला हस्तक्षेप व वनस्पतीची वाढ यामुळे होणाऱ्या मातीतील कर्ब उत्सर्जनाचे प्रमाण वातावरणात वाढत आहे. कार्बन, वनस्पती आणि माती यामध्ये गुंतागुंतीच्या प्रक्रिया होत असतात. तापमान, आर्द्रता, वनस्पतीमुळे मातीतील कार्बनमध्ये होत असलेले बदल महत्त्वाचे आहेत. त्यात मातीमध्ये असलेले जीवाणू, बुरशी, मूलद्रव्ये, कर्ब मूलद्रव्ये हे मोलाची भूमिका निभावतात.
वाढत असलेले हरितगृह वायू, कार्बन डायऑक्साईड आणि प्रदूषित घटक यामुळे वनस्पतींच्या वाढीला चालना मिळते. या अधिक वाढीमुळे मातीतील कार्बनच्या मुक्ततेमध्ये त्यांचा वाटा वाढत आहे. मुळांमुळे सूक्ष्मजीवांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होते. त्याचा परिणाम मातीतील कर्बाच्या विघटनामध्ये होत असल्याचे "प्रिन्सटन एन्व्हायर्न्मेंटल इन्स्टिट्यूट' येथील संशोधक बेन्जामिन सुलमान यांनी सांगितले.
मुळांची वाढीमुळे सूक्ष्मजीवांच्या प्रक्रियेला सुरवात होते, त्यामुळे मूलद्रव्यांवर कार्बनचे बंध तयार होऊन कुजण्याच्या प्रक्रियेपासून संरक्षण मिळते. त्याचा परिणाम मातीमध्ये कार्बन अधिक काळासाठी साठविला जातो.
(स्रोत : बेन्जामीन सुलमान, प्रिन्सटन एन्व्हायर्न्मेंटल इन्स्टिट्यूट.)
स्त्रोत : अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
पानांच्या कडा तांबटसर होऊन पानावर तांबडे, पिवळे ठि...
निसर्गात ऋतुचक्रामुळे घडून येणारे बदल मनाला आल्हाद...
या विभागात त्वचेच्या रंगहिनता किंवा वर्णहीनता कशाम...
हवामान बदलांसंबंधी जागरूकता वाढवण्यासाठी २३ मार्च ...