हे रंगहीन भागांच्या लक्षणासह असते, ते ठळकपणे दिसतात आणि ब-याचदा एकसमान असतात, ते रंगकारक पेशींच्या अभावामुळे उद्भवते. रंगविहीनता ही एक किंवा दोन ठिपक्यांपुरती असते किंवा ती त्वचेचा बहुतांश पृष्ठभाग व्यापते. कोड झालेल्या भागातील केस हे सामान्यतः पांढरे असतात. त्वचेवरील चट्टे हे वुडस् प्रकाशाखाली फुगीर दिसतात.
ही ठराविक दाहकारक व्याधी (उदा. त्वचाशोथ), भाजणे आणि त्वचेचे संक्रमण बरे झाल्यानंतर होते. ही चट्टे आणि न वाढलेल्या त्वचेशी निगडीत असते. त्वचेचा रंग हा कमी होतो परंतु ती कोडाच्या सारखी दुधाप्रमाणे पांढरी नसते. काहीवेळा आपोआप पुन्हा रंग येऊ शकतो.
ही एक दुर्मिळ वांशिकरित्या आलेली व्याधी आहे ज्यामधे रंगकारक पेशी या उपस्थित असतात परंतु त्या मेलॅनिन तयार करत नाहीत. त्याचे अनेक प्रकार आहेत. टायरोसिनेस-नकारात्मक वर्णहीनतेमधे केस पांढरे असतात, त्वचा फिकट असते, आणि डोळे गुलाबी असतात, नेत्रदोल आणि वक्रभवन सामान्यतः दिसून येते. त्यांनी सूर्यप्रकाश टाळावा, उन्हाचा चश्मा वापरावा, आणि दिवसाच्या वेळेत SPF > = 15 असलेले सनस्क्रीन वापरावे.
याशिवाय अवरंजकतेचे तीन मुख्य प्रकार आहेत, त्वचेचा रंग उडणारी एक सामान्य स्थिती आहे तिला पिटीरीयासिस म्हणतात.
स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम
अंतिम सुधारित : 5/23/2020
हवामान बदलांसंबंधी जागरूकता वाढवण्यासाठी २३ मार्च ...
दूरदर्शन सह्याद्री निर्मित बदलती शिक्षण पद्धती हि ...
‘नैसर्गिक निवड’
पानांच्या कडा तांबटसर होऊन पानावर तांबडे, पिवळे ठि...