जींद संस्थान
जींद संस्थान : ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील पंजाबमधील एक संस्थान. क्षेत्रफळ ३,४५० चौ. किमी. लोकसंख्या ३,६१,८१२ (१९४१). उत्पन्न सु. पंचवीस लाख रुपये. संस्थानचा प्रदेश सलग नव्हता. सपाट भूप्रदेश, ७ शहरे व ४३९ खेडी यांचा प्रशासकीय सोयीसाठी दोन निझामत व तीन तहसील यांत संस्थानची विभागणी केलेली होती.