पंजाब राज्यातील एक विद्यापीठ. अमृतसर ह्या ठिकाणी २४ नोव्हेंबर १९६९ रोजी स्थापन झाले. विद्यापीठाचे स्वरूप अध्यापनात्मक व संलग्नक आहे. विद्यापीठाच्या क्षेत्रात पंजाब राज्यातील अमृतसर, गुरदासपूर, जलंदर आणि कपुरथळा हे जिल्हे समाविष्ट होतात. सध्या त्रेसष्ट महाविद्यालये विद्यापीठास संलग्न केलेली असून विद्यापीठात मानव्यविद्या आणि समाजशास्त्रे, विज्ञान, कृषी व वनविद्या, दंतविज्ञान, ललित कला व वास्तुकला, शिक्षण, वैद्यक इ. विद्याशाखा आहेत. याशिवाय एक सायं-महाविद्यालय आहे. गुरू नानकाच्या शिकवणुकीचे संशोधन व अभ्यास हे या विद्यापीठाचे खास वैशिष्ट्य आहे. अंध, अपंग इत्यादींना खासगी रीत्या काही परीक्षांना बसता येते. विद्यापीठाचे माध्यम इंग्रजी व पंजाबी आहे. १९७२ मध्ये ह्या विद्यापीठात सु. ४४,४७१ विद्यार्थी शिकत होते. विद्यापीठाचा अर्थसंकल्प १९७२ मध्ये १२१·०१ लाख रु. होता. ह्या विद्यापीठाने अद्यापि संशोधन व इतर अन्य क्षेत्रांत विशेष प्रशंसनीय कामगिरी केलेली आढळत नाही.
लेखक : सु. र. देशपांडे
माहिती स्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 5/19/2020
ईजिप्तमधील एक प्रसिद्ध व प्राचीन इस्लामी विद्यापीठ...
उत्तर प्रदेश राज्यातील अलीगढ येथे १९२० मध्ये स्थाप...
आंध्र प्रदेश राज्यातील एक विद्यापीठ.
मध्य प्रदेशातील एक विद्यापीठ.