बाळाचे डोके मोठे असून जन्ममार्ग लहान असल्यास, मूल आडवेतिडवे किंवा पायाळू असल्यास, आईचा रक्तदाब वाढला, मधुमेह असेल तर, गर्भाशयाच्या तोंडावर गाठ असल्यास किंवा नाळ बाळाच्या मानेभोवती किंवा खाली सरकलेली असल्यास बाळंतपण अडचणीत येते व त्यासाठी सिझेरियन करावे लागते. पोट व गर्भाशयात छेद घेऊन वरून मूल काढले जाते. आई व बाळाची यामुळे सुखरूप सुटका होऊ शकते.
नैसर्गिक प्रसूती अवघड किंवा अशक्य झाली तर शास्त्रापाशी तीन पर्याय उपलब्ध असतात.
१) फोर्सेप्स लावणे :-
म्हणजे योनिमुखापर्यंत आलेले बाळाचे डोके चिमट्यात धरून बाहेर ओढण्यासाठी भूल दयावी लागते. बाळाचे गर्भाशय फिरणे याचा अचूक अंदाज घेऊन त्याच्या तोंडावर, डोक्यावर कुठेही इजा होणार नाही अशाप्रकारे चिमट्यात त्याला पकडावे लागते. स्त्रीच्या बाबतीत जास्त रक्तस्त्राव होण्याची, योनीमार्गाला व मूत्राशयाला इजा होण्याचीही शक्यता असते. बाळाला इजा झाल्यास मात्र त्याची बौद्धीक वाढ खुंटणे, डोळ्यांना इजा होणे, बहिरेपणा येणे अशाही समस्या उभ्या राहू शकतात.
२) व्ह्याकुम/ व्हेन्टोज डिलीव्हरी :-
यामध्ये बाळाच्या डोक्यात एक प्रकारची तबकडी हवेच्या दाबाने चिकटवून ठेवायची व तिला सतत ठरावीक ओढ देऊन बाळ बाहेर काढले जाते. मातेच्या शरीराची कमी हानी होते. परंतु बाळाच्या टाळूला इजा होणे, मेंदुमध्ये रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते.
३) सिझेरियन :- सिझेरियन म्हणजे योनीमार्गातून बाळ बाहेर न आणता ओटीपोटावर छेद देऊन बाळ पोटावरून बाहेर काढणे. पोटाच्या कोणत्याही मोठया शस्त्रक्रीयेसारखीच पूर्वतयारी सिझेरियनसाठीही करावी लागते. पोटावर बेंबीखाली छेद दिला जातो. गर्भाशयापर्यंत पोहचून प्रथम बाळ बाहेर काढले जाते. नंतर वर काढली जाते. गर्भाशय रिकामे केले जाते. प्रथम गर्भाशयावरचा छेद शिवला जातो. नंतर पोटाच्या कातडीचे थर शिवले जातात. शस्त्रक्रियेनंतर पहिले २४ तसं वेदना होत असल्यामुळे झोपेची व वेदना कमी करणारी औषधे देवून वेदना कमी केल्या जातात. दुसऱ्या दिवशी स्त्री उठून बसू शकते. चौथ्या पाचव्या दिवसापासून स्वतःचे व्यवहार स्वतः करू शकते. सातव्या दिवशी टाके काढल्यानंतर ८ व्या ते १० व्या दिवशी घरी जाऊ शकते. पहिले सिझेरियन झाले म्हणजे दुसरेही सिझेरियनच होईल असे नसते परंतु फार वेळ वाट बघणे डॉक्टरांना धोक्याचे वाटत असल्यास डॉक्टर योग्य तो निर्णय घेतात.
बाळंतपण जर लांबत चालले आणि त्यात अडचण यायला लागली तर चिमट्याचा उपयोग केला जातो. उच्च रक्तदाब, क्षय किंवा इतर काही कारणांनी हा विलंब होऊ शकतो. अशा वेळी बाळ बाहेर यायला उशीर लागला तर मातेच्या जीवाला सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो. अशावेळी चिमटा लावून कौशल्याने व्यवस्थित मूल बाहेर काढले जाते.
स्त्रोत : बाळंतपण, माहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिका, वॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्ट
अंतिम सुधारित : 7/9/2020
या विभागात अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे म्हणजेच योग...
डॉक्टर्स आणि नर्सेस एवढेच मनुष्यबळ गृहीत धरून स्वा...
म्हातारपण किंवा दीर्घ आजारपण यामुळे माणूस अंथरुणाल...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...