बाळंतपणानंतर गर्भाशय हे हळूहळू पुर्वावस्थेला येऊ लागते. या दीड महिन्याच्या काळात निदान दोनदा नर्स बाईला भेटले पाहिजे. पहिली भेट ही तीन दिवसाच्या आतच घ्यावी. ताप येणे, पोट साफ न होणे, लघवीला त्रास होणे तसेच अंगावरून जाने, पोटात दुखणे अशा व्याधी उदभवू शकतात. त्याकडे दुर्लक्ष करू नये. थोडयाशा उपचारांनी या व्याधी बऱ्या होतात. तसेच स्तनात दूध साचू देऊ नये. ते काढून टाकावे नाहीतर गाठ बनते व बेंड होते.
गरोदरपणासारखेच जन्मल्यानंतरही वाढीसाठी बाळ आईवरच अवलंबून असते. आईच्या दुधातून बाळाच्या वाढीसाठी योग्य असे सर्व प्रकारचे घटका मिळतात. म्हणूनच प्रत्येक बाळंतपणानंतर जोपर्यंत बाळ अंगावर पीत असते. तोपर्यंत आईच्या आहाराचे खूपच महत्त्व असते. तिच्या नेहमीच्या गरजा भागविण्यासाठी, बाळंतपणात शरीराची झीज भरून घेण्यासाठी, बाळाच्या वाढीसाठी लागणारे जास्तीचे घटक दुधात तयार होण्यासाठी आवश्यक असणारे घटक आहारातूनच मिळतात.
बाळंतपणानंतर स्त्रीचे शरीर हे थोडेसे ढिले पडते. सैल पडते आणि त्याला काहीसे बेडौलपणा येतो. गर्भाशय पूर्वावस्थेला येऊ लागते. अशावेळी शरीराला काही शारीरिक काही शारीरिक हालचाल, व्यायामाची गरज असते. पडल्या पडल्या हातापायांची हालचाली करणे, पोटांच्या स्नायूचे आकुंचन, प्रसरण होतील हे पहाणे, उताणे झोपून पाय गुडघ्यात दुमडून सरळ वर खाली करणे, पाय सरळ सोडून ताठ बसून पायांचे अंगठे हाताच्या बोटांनी पकडणे अशा हालचाली खूपच लाभदायक होऊ शकतात. त्याचबरोबर दिर्घश्वास घेणे, सोडण्याची कला ही शिकून घ्यावी. चालण्याचा व्यायामही करावा. काही सोपी योगासने फारच उपयोगी आहेत. उदा. मत्सासन, धनुरासन, सर्पासन, श्वसन परंतु अशी योगासने तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावीत.
स्त्रोत : बाळंतपण, माहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिका, वॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्ट
अंतिम सुधारित : 4/6/2020
या विभागात अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे म्हणजेच योग...
अन्न आणि पोषण बोर्ड निर्मित अर्भक बाळाला आहाराचे म...
उष्मांक (कार्यशक्ती) देणारे पदार्थ: कर्बोदके आणि स...
पोषण हा वैद्यकीय शास्त्रातला एक अत्यंत महत्त्वाचा ...