पोषण हा वैद्यकीय शास्त्रातला एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. शरीराची वाढ आणि रोगप्रतिकारशक्ती योग्य पोषणावरच अवलंबून असतात. कुपोषणाचे प्रत्यक्ष आजार म्हणजे निरनिराळया अन्नघटकांच्या अभावाने तयार झालेले विविध आजार (उदा. रातांधळेपणा, अंधत्त्व, सर्वांगसूज, रोडपणा, मुडदूस, रक्तपांढरी, इ.). तसेच कुपोषणामुळे अप्रत्यक्ष आजार म्हणजे रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्याने विविध आजार होतात. (उदा.अनेक प्रकारचे जंतुदोष).
या दोन्ही समस्या समजण्यासाठी आधी पोषणाची मूलतत्त्वे समजावून घेणे आवश्यक आहे.
कुपोषणाचा प्रश्न हा केवळ माहितीच्या अभावाचा किंवा अज्ञानाचा नसून मुख्यतः गरिबीचा आहे. पण श्रीमंत कुटुंबातही कमी जास्त कुपोषण आढळते. त्यासाठी आहारशास्त्राची माहिती आवश्यक आहे.
पोषणाचे शास्त्र तसे समजायला सोपे आहे. या प्रकरणात आपल्याला शिकायचे आहे :
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020
या विभागात अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे म्हणजेच योग...
अन्न आणि पोषण बोर्ड निर्मित अर्भक बाळाला आहाराचे म...
सर्व अन्नघटक स्वतःच परिपूर्ण नसतात. पण दोन-तीन अन्...
शेतकरी शेतात राबतो, चटणी, भाकरी खाऊन दोन वेळची भूक...