অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अन्नघटक

आहाराचे घटक किंवा मूलतत्त्वे

  1. उष्मांक (कार्यशक्ती) देणारे पदार्थ: कर्बोदके आणि स्निग्ध पदार्थ. (मुख्यत: पिठूळ पदार्थ)
  2. शरीराच्या घडणीसाठी लागणारे पदार्थ: प्रथिने.
  3. चयापचयासाठी व प्रतिकारशक्तीसाठी सूक्ष्म प्रमाणात आवश्यक असणारी विविध जीवनसत्त्वे
  4. क्षार : लोह, चुना, इत्यादी खनिज पदार्थ
  5. पाणी (रोजची गरज एक ते दीड लिटर)
  6. मलविसर्जनासाठी व पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी आवश्यक असणारा चोथा.

प्रथिने : नत्रयुक्त पदार्थ

शरीरात प्रत्येक भाग हा प्रथिने आणि क्षार यांचा मिळून तयार झालेला असतो. घर जसे विटा, चुना, पत्रे यांचे तयार झालेले असते तसे शरीरही (घनभाग) 75% प्रथिने व क्षारांचे बनलेले असते. प्रथिने हा नत्रयुक्त पदार्थ आहे. पृथ्वीवर सजीव सृष्टीची सुरुवातच प्रथिनांपासून झाली. प्रथिने म्हणजे जीवसृष्टीचा अगदी मूळघटक आहे. शिवाय शरीरात60% वजन पाण्याचेच असते.

 

 

लेखक : डॉ. श्याम अष्टेकर

(MBBS, MD community Medicine)

संदर्भ : आरोग्यविद्या

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate