आयत्यावेळी गोंधळ होऊ नये म्हणून सातव्या, आठव्या महिन्यात खालील गोष्टी तयार ठेवल्या पाहिजेत. धुवून ठेवलेली आणि कडक उन्हात वाळवलेली भरपूर स्वच्छ मऊ फडकी, जाळीदार कापड, स्वच्छ कापूस, नवे ब्लेड, पाणी उकळण्यासाठी स्टोव्ह, पातेली, साबण, वर्तमानपत्र एवढया गोष्टी वापराव्यात. याशिवाय कॉट, गाडी, स्वच्छ अंथरूण, पांघरूण, रबर, मेणकापड, प्लास्टिकचा स्वच्छ कागद याचीही तयारी ठेवावी.
स्वच्छ हात, स्वच्छ जागा, नाळ कापण्यासाठी निर्जंतुक ब्लेड, साबण, स्पिरीट, नाळ बांधण्यासाठी निर्जंतुक दोरा, नाळेवर काहीही न लावणे या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.
बाळंतीणीची खोली अडगळीची असू नये. मोकळी हवा व उजेड येणारी असावी. धूळ किंवा धूर खोलीत येऊ नये. खोलीच्या भिंती स्वच्छ असाव्यात. जमीन व फरशी स्वच्छ असावी.
बाळंतीणीने रोजच्या रोज आंघोळ करावी. बाळंतीणीने स्तन, मायांग व सगळे स्वच्छ ठेवले पाहिजे. असे केल्याने जंतूसंसर्ग होत नाही. बाळालाही रोजच्या रोज आंघोळ घालणे आवश्यक आहे.
स्त्रोत : बाळंतपण, माहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिका, वॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्ट
अंतिम सुधारित : 7/22/2020
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
या विभागात अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे म्हणजेच योग...
म्हातारपण किंवा दीर्घ आजारपण यामुळे माणूस अंथरुणाल...
डॉक्टर्स आणि नर्सेस एवढेच मनुष्यबळ गृहीत धरून स्वा...