मुलीचे वय जर १८ वर्षांचे आत असेल तर असे गरोदरपण हे आई आणि बाळ या दोघांनाही धोकादायक असते. लहान वयामुळे तिच्या कमरेच्या वगैरे हाडांची वाढ, अवयवांची वाढ विशेषतः गर्भाशयाची वाढ परिपूर्ण झालेली नसते. त्यामुळे बाळंतपण होणे अवघड होते, तर कधी मूत्राशय, गर्भाशय, योनीमार्ग व इतर अवयवांना इजा होऊ शकते. तसेच शारीरिक वाढ व मानसिक वाढ पूर्ण झालेली नसल्यामुळे दूधही पुरेसे येत नाही. बाळाला वाढवायलाही अडचणी निर्माण होतात. म्हणून मुलीचे वय जोपर्यंत १८ वर्ष होत नाही, तोपर्यंत मुलीचा विवाह करू नये व तिच्यावर गरोदरपणही लादू नये.
आईच्या पहिल्या बाळंतपणातील झीज तीन वर्षाच्या आत भरून येत नाही. व तीन वर्षाच्या आत गरोदर राहिल्यास आईची तब्येत ढासळते व त्याचा परिणाम जन्माला येणाऱ्या मुलावरही होतो व ते अपुऱ्या वाढीचे जन्माला येऊ शकते. पहिल्या मुलाकडेही दुर्लक्ष होते व त्याचीही वाढ नीट होत नाही. अशाप्रकारे दोन्ही मुले कमकुवत बनतात व दोघांचेही जीवन धोकादायक बनू शकते. म्हणून अगोदरच मूल ३ वर्षांचे झाल्याशिवाय दुसरे मूल होऊ देऊ नये.
वरचेवर होणाऱ्या बाळंतपणामुळे मातेची तब्येत प्रत्येकवेळी अधिकाधिक ढासळत जाते व बाळंतपणात गुंतागुंत निर्माण होते. बाळाच्या जन्मानंतर रक्तस्त्राव होणे, गर्भाशय खाली उतरणे, मृत बालक जन्माला येणे, शस्त्रक्रियेची जरुरी पडणे, गर्भाशय फाटणे, रक्तक्षय होणे इ. अनेक प्रकारच्या गुंतागुंतीमुळे तीन मुलांनंतरचे गरोदरपण धोकादायक ठरू शकते.
गरोदर मातेचे वय जर ३०- ३५ च्या पुढे असेल तर गरोदरपण आणि बाळंतपण गुंतागुंतीचे होते. नैसर्गिक प्रसुती न होणे, तातडीच्या शस्त्रक्रियेची जरुरी लागणे असे अनेक प्रश्न निर्माण होतात. यासाठी मूल होण्याचे स्त्रीचे वय २० ते ३० च्या दरम्यान असावे.
स्त्रोत : गरोदरपण, माहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिका, वॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्ट
अंतिम सुधारित : 7/1/2020
डॉक्टर्स आणि नर्सेस एवढेच मनुष्यबळ गृहीत धरून स्वा...
म्हातारपण किंवा दीर्घ आजारपण यामुळे माणूस अंथरुणाल...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
या विभागात अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे म्हणजेच योग...