लोकसंख्या भरमसाठ विस्फोट आणि त्यामुळे येऊ घातलेले संकट नेहमीच आपण बोलत असतो. भारतातील नैसर्गिक साधन संपत्तीचा विचार केल्यास भारतीय जनजीवन स्वयंपूर्ण होणे शक्य आहे. पण त्यासाठी उपलब्ध जमीन-पाणी-निसर्ग याची निगा राखली गेली पाहिजे. तसेच शेती व्यवस्था टिकली पाहिजे. लोकसंख्या नियंत्रणाबद्दल खूप प्रचार केला गेला आहे. पण नैसर्गिक साधनांच्या विनाशाबद्दल थोड्याच लोकांना याची जाणीव आहे. लोकसंख्या वाढीचा बोजा पृथ्वी वर पडत आहे, हे ही तितकेच खरे आहे.
लोकसंख्या वाढ असो-नसो, तरीपण कुटुंब नियोजन सर्वांनीच केले पाहिजे. कुटुंबात एकटया स्त्रीवर मातृत्वाचा व देखभालीचा ताण पडतो. तसेच जास्त बाळंतपणे म्हणजे महिलेवर जास्तीत जास्त शारीरिक व मानसीक ताण, जास्त आजार, पाळणा लांबवणे – थांबवणे, दोन्हीही, स्त्रिया व मुलांच्या दृष्टीने सुखाचे आहे. म्हणूनच कुटुंब नियोजनाचे महत्त्व आहे. कुटुंब नियोजनाचा इतका प्रसार – प्रचार होऊनही अपेक्षेप्रमाणे यश मिळत नाही. या प्रश्नांचे उत्तर अआप्न सर्वांनी मिळून शोधणे गरजेचे आहे.
कुटुंब लहान ठेवायचे तर त्यासाठी योग्य विचारसरणी सामाजिक व आर्थिक परिस्थिती असावी लागते. लहान कुटुंबाचे महत्त्व आपण लहानपणापासूनच शिकत आलो आहोत. तरी देखील त्यामध्ये अजूनही पाहिजे तेवढी सुधारणा झालेली दिसून येत नाही.
पुरुषप्रधान व्यवस्थेत वारसाहक्क मुलाकडे जातो. यामुळे आहे ती साधनसंपत्ती दुसऱ्याच्या घरी जाऊ न देणे ही एक गरीब कुटुंबाला गरज वाटू लागते व ही संपत्ती टिकवून ठेवण्याकरिता मुलगा होईपर्यंत वाट पहिली जाते. ही करणे देखील विचार करण्यास भाग पडणारी आहेत.
म्हणून प्रत्येक पति- पत्नीने मिळून आपले कुटुंब नियंत्रीत कसे राहील याचा विचार करणे व अंमलबजावणी करणे ही काळाची गरज झाली आहे. “कुटुंब लहान सुख महान” या उक्तीप्रमाणे लहान कुटुंब व्यवस्था कशी राहील यावर भर देणे महत्त्वाचे आहे.
स्त्रोत : कुटुंब नियोजन, माहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिका, वॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्ट
अंतिम सुधारित : 7/24/2020
या विभागात अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे म्हणजेच योग...
डॉक्टर्स आणि नर्सेस एवढेच मनुष्यबळ गृहीत धरून स्वा...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...