भारतात जवळ जवळ २० टक्के बालमृत्यु धनुर्वाताने होतात. घराभोवती व रस्त्यालगत साठवलेल्या कचऱ्याच्या ढिगांमुळे माशांची वाढ होते. शेण व केरकचऱ्यामधे माशा अंडी घालतात. या ढिगाभोवती डुकरे, उंदीर, कुत्री व अन्य प्राणी वावरतात. त्यामुळे शेण व केरकचऱ्याची विल्हेवाट लावावी.
केरकचरा साठविण्यासाठी घरापासून १५-२० फुटावर खड्डा करावा. १ मीटर लांब, १ मीटर रुंद व ०.८ मीटर खोल असा खड्डा खणावा. खड्डयाभोवती १० सेंमी. मातीचा भराव टाकून तो चांगला बांधून घ्यावा. त्यामध्ये खराब भाजीपाला, वाया गेलेले कागद, गुरांचे शेण वगैरे या खड्डयात टाकावे. या सर्व पदार्थांचे विघटन होऊन कंपोस्ट खत तयार होते. ते एक उत्तम प्रकारचे खत आहे. प्रत्येक आठवडयाला तो ढिग सारखा करून त्यावर ३ बोटे मातीचा भर दयावा. ३-४ महिन्यानंतर खड्डयात चांगले खात तयार होते. पहिला खड्डा भरल्यानंतर तिथेच शेजारी दुसरा खड्डा तयार करावा.
स्त्रोत : परिसर स्वच्छता व डासांमुळे होणारे आजार, माहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिका, वॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्ट
अंतिम सुधारित : 2/22/2020
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
म्हातारपण किंवा दीर्घ आजारपण यामुळे माणूस अंथरुणाल...
या विभागात अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे म्हणजेच योग...
डॉक्टर्स आणि नर्सेस एवढेच मनुष्यबळ गृहीत धरून स्वा...