उघडयावर संडास केल्यामुळे अनेक रोगांचा एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे प्रसार होतो. रोगाची लागण झालेल्या वव्यक्तींच्या विष्ठेत रोगाचे जंतू व जंताच्या अळ्या, अंडी असतात. ते माणसाच्या डोळ्याला दिसू शकत नाहीत आणि ते शरीराला फार अपायकारक असतात. हे विष्ठेतील जंतू, जंताची अंडी पाण्यामार्फत, भाजीपाल्यामार्फत, हातांच्या स्पर्शामार्फत आणि माशा, झुरळे यासारख्या कीटकांमार्फत एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे जातात. अशा रितीने रोगांचा प्रसार होतो. उदा. आमांश, पटकी, विषमज्वर, कावीळ, पोलिओ.
ग्रामीण भागातील बरेचसे लोक व शहरी भागातील काही लोक शेतात, जंगलात, नदी किनारी, रेल्वेलाईन जवळ किंवा रस्त्याच्या कडेला शौचास बसतात. स्त्रियांना भल्या पहाटे, लोकांना जग येण्याआधी किंवा रात्रीच्या वेळी शौचास जावे लागते. दिवसा उजेडामध्ये त्यांना शौचास जाता येत नाही. त्यामुळे पोट दुखते व आरोग्यास अपायही होतो. लहान मुले तर सर्रास घराबाहेरच रस्त्यावर किंवा पाण्याच्या पन्हाळीत बसतात. पुष्कळ लोकांचा असा गैरसमज असतो की , लहान मुलांची विष्ठा काही अपायकारक नसते. पण तसे काहीही नसते.
संडासचा वापर केला की, उघडया मानवी विष्ठेतून होणारा रोगाचा प्रसार थांबतो. शिवाय संडासात मिळालेल्या एकांतामुळे तो लहान, थोर, स्त्री, पुरुष सर्वांना उपयुक्त ठरतो. आजारी माणसांनाही संडासचा उपयोग करता येतो. घराजवळ बांधलेला संडास पावसाळ्यातही उपयोगी पडतो. खरे पाहिले असता संडास बांधण्यास फारशी जागा लागत नाही. दोन प्रकारचे संडास बांधकामासाठी सुचविले जातात.
जिथे पाणी कमी असते आणि झाडाची पाने, माती, दगड इत्यादींचा वापर गुद्दद्वार स्वच्छ करण्यासाठी वापरतात. तेथे चराचा संडास पुयोगी ठरतो. माशा व दुर्गंध टाळण्यासाठी नवीन तऱ्हेचे चराचे संडास वापरणे चांगले. सुधारित चराचे संडास बनवताना त्यात दुर्गंध, वास बाहेर टाकण्यासाठी एक नळी वापरतात, ती बाहेर काढलेली असते. तिच्यातून वास बाहेर जातो. आतमध्ये अंधार ठेवतात. त्यामुळे माशा नळीतून बाहेर पडतात. माशा उजेडाकडे आकर्षित होतात. वरती त्यांना पकडण्यासाठी एक जाली ठेवलेली असते. त्यात त्या अडकल्या जातात.
ज्याठिकाणी पाणी मिळू शकते व गुद्द्द्वार धुण्यासाठी पाणी वापरले जाते. तिथे ह्या प्रकारचा संडास वापरला जातो. पाणी जोराने मानवी विष्ठेवर फेकले जाते. मानवी विष्ठा एका पसरट भांडे जर आधी थोडे ओले ठेवले तर विष्ठा भांडयाला चिकटत नाही व चटकन खाली सरकते. दोन किंवा तीन लीटर पाणी एकावेळेस वापरावे लागते. लघवी, विष्ठा आणि पाणी हे सगळे नळीवाटे चरात ढकलले जाते. चार झाकलेला असतो. नळीत विष्ठा व त्यावर पाण्याचा एक थर कायमच राहतो. त्या पाण्याच्या थराचे एक बूचच बनते, पाण्याच्या थराचे आवरण सतत वरती कायमच राहतो. त्यामुळे घाण वास संडासामध्ये येत नाही. एक मोठे पाण्याचे भांडे संडासाजवळ पाण्याने भरून ठेवावे लागते. म्हणजे त्यातील पाणी विष्ठेवर टाकण्यासाठीही दोन खड्डे किंवा चर खोदावे लागतात व इंग्रजी ‘वाय’ या आकाराच्या नळीने ते संडासाच्या पसरट भांडयाला जोडलेले असतात. तसेच एक चर भरेपर्यंत दुसरा चर रिकामाच ठेवावा लागतो. पाच-सहा माणसांच्या कुटुंबाला एक चर भरायला साधारणपणे तीन वर्ष लागतात. त्यानंतर दोन वर्षेपर्यंत सर्व मैला संथ न हलवता ठेवावा लागतो. याकाळात सर्व मैला कुजून वासरहित बनतो व त्याचा खत म्हणून वापर करता येतो. एका आड एक चराचा वापर करता येतो.
स्त्रोत : परिसर स्वच्छता व डासांमुळे होणारे आजार, माहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिका, वॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्ट
अंतिम सुधारित : 12/4/2019
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
डॉक्टर्स आणि नर्सेस एवढेच मनुष्यबळ गृहीत धरून स्वा...
या विभागात अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे म्हणजेच योग...
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...