ही तक्रार मुख्यत: लहान मुलांमध्ये, पण कधीकधी मोठया वयातही आढळते. (विशेषत: गरोदरपणी अनेक स्त्रियांची ही तक्रार असते.) यात माती, भिंतीचा रंग, राख,चुना, खडू, पेन्सिल, इत्यादी एरवी 'अखाद्य' असे अनेक पदार्थ येतात. माती खाण्याची तक्रार उद्भवण्याची प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे-
- आहारात लोहक्षाराची कमतरता.
- दीर्घकाळ निव्वळ स्तनपान व बाळास वरचे अन्न वेळेवर सुरू न करणे.
- कुठल्याही कारणाने आलेली रक्तपांढरी.
- काही मानसिक कारण - उदा. दुर्लक्ष झाल्याची भावना मनात बळावणे.
माती खाणे हा विकार सहा ते सात महिन्यांनंतरच्या मुलांमध्ये दिसते. वयाच्या दोन वर्षापुढेही माती खाणे टिकल्यास तपासणी करून घ्यावी.
आहारात लोहक्षार व चुनायुक्त पदार्थ असावेत. (पाहा पोषणावरचे प्रकरण) ,कॅल्शियम, मुलाला लोहक्षाराच्या गोळया किंवा औषध द्यावे.
माती खाणा-या मुलांना जंतविकार होतो. त्यामुळे त्याला जंताचे औषध द्यावे. रंग़ीत द्रव्ये (उदा. भिंतीचा रंग), इत्यादी पोटात गेल्याने होणारे आजार होऊ शकतात. यासाठी डॉक्टरकडे पाठवावे.
माती खाण्यावर एक उपाय याप्रमाणे : चांगली सोनकाव 15 ग्रॅम + दीड चमचा तूप हे मिश्रण लोखंडी तव्यावर परतून घ्यावे. परतल्यावर हे मिश्रण ठिसूळ बनते. ह्या मिश्रणाच्या मुगाएवढया गोळया तयार करून घ्या. या गोळया मुलांना सकाळी सायंकाळी एकेक अशा तीन आठवडे रोज द्याव्यात. याबरोबर चिमूटभर त्रिफळा चूर्णही द्यावे. या उपायांनी मुलांचे माती खाणे थांबते.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 6/5/2020
रक्ताचा लालपणा कमी होणे म्हणजे अॅनिमिया. यालाच रक्...
अतिसाराबाबतच्या माहितीचा प्रसार करणे व तिची अंमलबज...
आजीबाईचा बटवा-इतर आजारांसाठी
आजीबाईचा बटवा-लहान मुलांमधील पोटदुखी