आजीबाईचा बटवा - इतर आजारांसाठी
लहान बाळांना दात येताना बऱ्याच वेळेला ताप येतो, पोट बिघडते. अशा वेळेला साधारण ६ व्या महिन्यापासून बाळाच्या हिरड्यांवर रोज मध चोळावे, दात व्यवस्थित येतात. या काळात पोट बिघडले असेल तर २ चमचे बडीशेप २ कप पाण्यात उकळून हा काढा. २ चमचे सकाळी आणि संध्याकाळी दयावा. या बडीशेपेच्या काढ्यामुळे बाळांना दूध पचते आणि भूक वाढते.
उपाय
- डोळ्याची शक्ती वाढवण्यासाठी २ चमचे मधामध्ये गाजराचा रस मिसळून रोज हिवाळ्यात दिल्यास डोळ्यांना लाभदायक ठरते.
- घाव भरण्यासाठी काळे तीळ वाटून त्यात मध मिसळून त्याचा लेप जखमेवर लावल्यास जखम भरण्यास मदत होते.
- शरीराला भाजले असेल तर त्या ठिकाणी कोबीची स्वच्छ धुतलेली पाने ठेवून वरून स्वच्छ कापडाने ती जखम बांधून ठेवावी. रोज या जखमेवरील कोबीचे पान आणि कापड बदलावे. जखम पटकन भरून येते.
- कुठल्याही प्रकारचे किडे चावल्यास त्यावर लगेच मध लावावे. चावलेल्या ठिकाणी सूज येत नाही व वेदना कमी होतात.
- खूप उचक्या लागत असतील तर १ चमचा साजूक तुपात १ चमचा जिरे पूड घालून कालवून ठेवावे आणि उचक्या लागल्यावर चाटायला दयावे.
- जिरे आणि धणे समप्रमाणात एकत्र करून ठेवावे. हे मिश्रण रोज जेवणानंतर बडीशेपेच्या ऐवजी खाल्ल्यास आम्लपित्तासारखे विकार बरे होतात.
स्त्रोत : चिमणचारा, संपदा ट्रस्ट
अंतिम सुधारित : 7/24/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.