मधुमेह या व्याधीमधे शरीर पुरेशा प्रमाणात इन्शुलिन तयार करु शकत नसल्यानं रक्तातील साखरेचं प्रमाण बरंच वाढतं. इन्शुलिन हा एक संप्रेरक असून तो स्वादुपिंडाद्वारे तयार करुन सोडला जातो. इन्शुलिन हे रक्तातील साखर नियंत्रित करते.
मधुमेह असलेल्या मुलाच्या रक्तात साखरेचं प्रमाण अधिक असतं, याचं एक कारण म्हणजे स्वादुपिंड कमी प्रमाणात इन्शुलिन तयार करतं किंवा इन्शुलिनच तयार करत नाही (टाईप-एक मधुमेह, पूर्वी याला लहान मुलांचा मधुमेह म्हणत) किंवा तयार केल्या जाणा-या इन्शुलिनच्या प्रमाणाबाबत शरीराला संवेदना नसते (टाईप दोन मधुमेह). टाईप-एक मधुमेह हा लहानपणात केव्हाही होऊ शकतो, अगदी अर्भकावस्थेतसुध्दा परंतु तो सामान्यतः वयाच्या ६व्या आणि १३व्या वर्षात सुरु होतो. टाईप दोन मधुमेह प्रामुख्यानं पौंगंडावस्थेत होतो परंतु वजनानं अधिक आणि लठ्ठ मुलांमधेही मोठ्या प्रमाणात दिसून येऊ लागला आहे.
पुढील निकष पूर्ण करणा-या मुलांची रिकाम्या पोटी रक्तातील साखर वयाच्या १०व्या वर्षापासून दर २ वर्षांनी तपासावी
पौंगडावस्थेतील मुलांना पुढील कारणांमुळं त्याच्या रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यात समस्या येतेः
टाईप एक मधुमेहाची लक्षणं लगेच विकसित होतात, सामान्यतः दोन ते तीन आठवड्यात किंवा कमी काळात आणि ती सहजपणे दिसतात. रक्तातील उच्च साखरेमुळं त्या मुलाला वारंवार लघवी लागते. शरीरातील द्रवपदार्थ कमी झाल्यानं तहान वाढते आणि द्रवपदार्थ पिण्याचं प्रमाण वाढतं. काही मुलांना अतिसार होतो त्यामुळं अशक्तपणा, आळस येतो आणि नाडी जलद चालते. दृष्टी अंधुक होऊ शकते.
टाईप दोन मधुमेह असलेल्या मुलांमध्ये लक्षणं ही टाईप एक मधुमेहींपेक्षा कमी तीव्र असतात आणि संथगतीनं विकसित होतात – काही आठवडे किंवा अगदी काही महिन्यांनी. मुलाची तहान आणि लघवीची भावना वाढली आहे किंवा थकवा येणं यासारखी अस्पष्ट लक्षणं पालकांना दिसू शकतात. सामान्यतः टाईप दोन मधुमेह असलेल्या मुलांना तीव्र अतिसार होत नाही.
स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम
अंतिम सुधारित : 6/16/2020
डॉक्टर्स आणि नर्सेस एवढेच मनुष्यबळ गृहीत धरून स्वा...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
या विभागात अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे म्हणजेच योग...