অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जीवनसत्त्वे

जीवनसत्त्वे : कार्य, आमापन व मानक

इतर अन्नघटकांप्रमाणे जीवनसत्त्वांचे जठरांत्र मार्गात अवशोषण होते व ती जरूर त्या शरीर भागात रक्तप्रवाहातून नेली जातात. काही जीवनसत्त्वांच्या, विशेषेकरून मेदविद्राव्य जीवनसत्त्वांच्या, अवशोषणाकरिता पित्तरसाची जरूरी असते. अन्नमार्ग निरोगी असल्यास जलविद्राव्य जीवनसत्त्वांचे अवशोषण सहज होते. शरीरातील काही भागांत काही जीवनसत्त्वे साठविली जातात. अ आणि ड जीवनसत्त्वे यकृतात साठविली जातात. १,५०० ग्रॅम वजनाच्या यकृतात अ जीवनसत्त्व ५,००,००० आंतरराष्ट्रीय एकक एवढे साठविलेले असते. दैनंदिन गरज २,५०० एकक मानल्यास हा साठा २०० दिवस पुरतो. जलविद्राव्य जीवनसत्त्वे मूत्रातून उत्सर्जित होत असल्यामुळे त्यांचा शरीरात साठा होत नाही.

जीवनसत्त्वे को-एंझाइमांप्रमाणे कार्य करतात. ती एंझाइम संस्थांचा क्रियाशील भाग आहेत. जीवमात्रांचा आवश्यक अशी ऊर्जा उत्पन्न होण्याकरिता ज्या शारीरिक घडामोडी (चयापचयात्मक क्रिया) होतात त्यांमधील उत्प्रेरकांचे (विक्रियेत भाग न घेता विक्रियेची गती वाढविणाऱ्या पदार्थांचे) कार्य जीवनसत्त्वे करतात. उदा., कार्बोहायड्रेट चयापचयातथायामीन हे जीवनसत्त्व को-एंझाइमाप्रमाणे कार्य करते. त्याचा अभाव असल्यास कार्बोहायड्रेट चयापचयातील मध्यस्थ पदार्थ लॅक्टिक अम्ल आणि पायरूव्हिक अम्ल शरीरात सांद्रित होतात (साठतात) सर्व तंत्रिका (मज्जा) ऊतकांच्या पोषणाकरिता कार्बोहायड्रेट चयापचय फार जरूरीचा असतो, मात्र तो सदोष असल्यास तंत्रिकांचा ऱ्हास होतो.

जीवनसत्त्वांचे आमापन (क्रियाशीलता ठरविण्यासाठी करण्यात येणारे पृथक्करण) करण्याच्या साधारण तीन पद्धती आहेत : (१) रासायनिक अगर भौतिक-रासायनिक, (२) जैव व (३) सूक्ष्मजैव.

न्नपदार्थांतील जीवनसत्त्वांचे प्रमाण तसेच मानवाची दैनंदिन गरज निरनिराळ्या प्रकारांनी उल्लेखितात. आंतरराष्ट्रीय एकक जैव आमापनाने ठरविले आहे. अमेरिकेन औषधिकोशात या एककाशी जुळणारे परंतु स्वतंत्र एकक वापरले आहे. जीवनसत्त्वांचे मापन मिलिग्रॅममध्येही करतात. संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक आरोग्य संघटनेने पुरस्कृत केलेली जीवनसत्त्व मानके जगभर उपयोगात आहेत [ आमापन, जैव].

प्रतिजीवनसत्त्वे

जीवनसत्त्वांच्या विशिष्ट सक्रियतेस प्रतिरोध करणाऱ्या पदार्थांना प्रतिजीवनसत्त्वे म्हणतात. हे पदार्थ जीवनसत्त्वांचे (१) निष्क्रियीकरण किंवा रासायनिक नाश; (२) चयापचयापासून मिळणारे पदार्थ तयार होण्यास विरोध अगर (३) स्पर्धाजन्य विरोध यांपैकी कोणत्याही प्रकारचा व्यत्यय आणतात. निसर्गामध्ये असे पदार्थ पुष्कळ आहेत; त्यांपैकी काहींचे संश्लेषण करण्यात आले आहे. मानवांत किंवा जनावरांत फारच थोडी प्रतिजीवनसत्त्वे प्रभावकारी ठरली आहेत. प्रतिजीवनसत्त्वे वापरून प्रायोगिक त्रुटिजन्य रोग निर्माण करता येतात. पँटोथिनिक अम्लजीवनसत्त्व बयांच्या त्रुटीमुळे होणाऱ्या रोगांचा अभ्यास प्रतिजीवनसत्त्वे वापरून करण्यात आला. प्रतिजीवनसत्त्वांची प्रमुख उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.

(१) अंड्याच्या पांढऱ्या बलकात असणारे अव्हिडीन हे प्रथिनबायोटीन या जीवनसत्त्वास अशोषणीय बनविते. (२) मिरिथायामीन व ऑक्सीथायामीन हीथायामीन या जीवनसत्त्वाची प्रतिजीवनसत्त्वे आहेत. (३) डिक्युमारॉल हेजीवनसत्त्व के चे प्रतिजीवनसत्त्व आहे. (४) माशांमध्ये थायामिनेज हे थायामिनाचे प्रतिजीवनसत्त्व असते; शिजवण्याने ते नाश पावते. (५) ॲमिनोप्टेरीन व मिथोट्रेलेट हीफॉलिक अम्ल या जीवनसत्त्वाची प्रतिजीवनसत्त्वे आहेत. (६) पॅरा-ॲमिनो बेंझॉइक अम्ल हा पदार्थ जीवनसत्त्व असल्याचे अजून अनिश्चित आहे. हा पदार्थ वनस्पती व प्राणी यांमध्ये आढळतो. या पदार्थाचे प्रतिजीवनसत्त्व असल्याचा गुण सल्फोनामाइड औषधांत आढळून आला आणि ती औषधे काही सूक्ष्मजंतूंमुळे उद्‌भवणाऱ्या रोगांवर गुणकारी ठरली आहेत.

. स. १९४० नंतर अनेक प्रतिजीवनसत्त्व रासायनिक चिकित्सेत फार उपयुक्त असल्याचे आढळले आहे.

शूंतील जीवनसत्त्वन्यूनता

वर उल्लेख केलेली सर्व जीवनसत्त्वे पशूंच्या आणि कोंबड्यांच्या शरीरपोषणाकरिता व तसेच त्यांच्या शरीरक्रिया व्यवस्थित चालण्यासाठी अल्पप्रमाणात आवश्यक आहेत. जीवनसत्त्वांचे कार्य मानवात होणाऱ्या कार्याप्रमाणेच आहे. नैसर्गिक आहारावर पोसलेल्या जनावरांमध्ये जीवनसत्त्वन्यूनता (आहारातील जीवनसत्त्वांची उणीव) सहसा संभवत नाही. पशूंच्या निरनिराळ्या जातींची त्या त्या जीवनसत्त्वाची गरज कमीजास्त असते. काही जीवनसत्त्वांचे संश्लेषण पशू आपल्या शरीरात करू शकतात. घोडे आतड्यात व गाई-गुरे रोमंथिकेत (पोटातील पहिल्या कप्यात) ब जीवनसत्त्वांचे, त्याचप्रमाणे सर्व पशू सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने कातडीमध्ये ड जीवनसत्त्वाचे संश्लेषण करतात. क जीवनसत्त्वाचे (ॲस्कॉर्बिक अम्लाचे) संश्लेषण पशूंच्या आतड्याचे होते. जीवनसत्त्वांची  अल्प गरज सुद्धा ज्या वेळी पशूंच्या खाद्यातून भागत नाही किंवा त्यांच्या पचन तंत्रात बिघाड होतो, धातुजन्य विषबाधा होते अथवा जीवनसत्त्वांचा जास्त प्रमाणात वापर ज्यांत होतो असे संक्रामक (संपर्काने होणारे) रोग होतात त्या वेळी पशूंमध्ये जीवनसत्त्वन्यूनतेमुळे होणाऱ्या विकारांची लक्षणे दिसतात.

अजीवनसत्त्वन्यूनता

यामध्ये सर्वसाधारणपणे डोळ्यांचे विकार होणे व त्याचप्रमाणे पशूंच्या वाढीवर विपरीत परिणाम होणे, ही लक्षणे दिसतात. घोड्यांमध्ये रातांधळेपणा, डोळ्यांतून पाणी गळणे, खूर वेडेवाकडे वाढणे, श्वसन तंत्राचे विकार व प्रजननक्षमतेत बिघाड उत्पन्न होणे ही लक्षणे दिसतात. गाई-म्हशीत दुधातून अ जीवनसत्त्व शरीराबाहेर पडत असते व त्यांना ते हिरव्या चाऱ्यातून मिळत असते. ते न मिळाल्यास गर्भपात होतो किंवा अशक्त, आंधळी, अतिसाराचा विकार जडलेली अशी रोगट वासरे जन्मतात व क्वचित झटके येऊन ती मृत्युमुखी पडतात. मोठ्या जनावरांत डोळ्यांचे विकार म्हणजे क्वचित अंधत्व संभवते. शेळ्यामेंढ्यांत हा विकार संभवत नाही पण जेव्हा उद्‌भवतो तेव्हा गायीसारखीच लक्षणे दिसतात. कोंबड्यांच्या पिलांमध्ये अशक्तता, अपूर्ण वाढ, रोगट प्रवृत्ती, डोळ्यांवाटे पाणी येणे, तर वयस्क कोंबड्यांमध्ये अशक्तपणा, नाकाडोळ्यांतून चिकट पांढरा घट्ट स्त्राव येणे व घशामध्ये पिवळट पापुद्रे इ. लक्षणे आढळतात. डुकरांमध्ये पिलांची वाढ खुरटते व मोठ्या डुकरांत वांझपणा दिसून येतो. मांजरांच्या पिलांना अतिसार, तर कुत्र्यामांजरांत स्वच्छमंडलाचे विकार उद्‌भवून क्वचित अंधत्व येते.

विविध जीवनसत्त्वांची दैनंदिन गरज, पुरवठा, त्रुटिजन्य रोग व परिणाम होणारे शरीरभाग

जीवनसत्त्व, दैनंदिन गरज

पुरवठा करणारा अन्नपदार्थ

त्रुटिजन्य रोग

परिणाम होणारा शरीरभाग

(अ) मेदविद्राव्य :

अ जीवनसत्त्व :

१,५०० ते ५,००० (आं. ए.) स्त्रीला दुग्धकालात ८,००० आं. ए.


ड जीवनसत्त्व :

लहान मुले : १ वर्षाखालील ८०० आं. ए.

३ वर्षांचे वरील ४०० आं. ए.

तरुण मुले : ४०० आं. ए.

स्त्री : गर्भारपणी : ६०० आं. ए.

दुग्धकालात : ८०० आं. ए.

ई जीवनसत्त्व :

प्रौढ व्यक्तीस १० ते ३० मिग्रॅ.

के जीवनसत्त्व :

(आतड्यातील सूक्ष्मजंतू संश्लेषणाद्वारे पुरेसे जीवनसत्त्व बनवीत असल्यामुळे दैनंदिन गरज निश्चित ठरविता येत नाही).

(आ) जलविद्राव्य :

थायामीन :

१ ते २ मिग्रॅ.

रिबोफ्लाविन :

१·१ ते १·६ मिग्रॅ.

 

 

 

 

 

जीवनसत्त्व :

अर्भक : ०·२ ते ०·३ मिग्रॅ.

प्रौढ : २ ते ३ मिग्रॅ.

 

 

 

निॲसीन :

मुले : ६ ते २५ मिग्रॅ.

प्रौढास : १७ ते २१ मिग्रॅ.

मांस, माशाच्या यकृतापासून बनविलेले तेल, भाज्या, दूध, तूप, लोणी, अंड्याचा पिवळा बलक.



माशाच्या यकृतापासून

बनविलेले तेल, लोणी, अंड्याचा पिवळा बलक.

भाज्या, फळे, गहू आणि तांदूळ, मांस, अंडी, दूध, लोणी, गव्हाच्या अंकुरापासून काढलेले तेल.

हिरव्या भाज्या, तृणधान्य, मांस.

तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, तीळ, शेंगदाणे, बिनसडीच्या डाळी, लाल मिरची, यीस्ट.

दूध व दुधापासून बनणारे पदार्थ, हिरव्या भाज्या, अंड्यातील पांढरा बलक, यकृत, मांस, यीस्ट.

अंड्याचा पिवळा बलक, मांस, मासे, दूध, बिनसडीचे धान्य, यीस्ट.

मांस, यकृत, गव्हाचे अंकुर, टोमॅटो, डाळी, बटाटे, हिरव्या भाज्या, तृणधान्ये.

नेत्रशुष्कता,

रातांधळेपणा.


मुडदूस, अस्थिमार्दव.

मानवात कोणताही विशिष्ट रोग आढळलेला नाही.

त्वचा व श्लेष्मकला यांमधून रक्तस्त्राव होणे- रक्तस्त्राव प्रवृत्ती.

बेरीबेरी (बाल, शुष्क व आर्द्र)

अरिबोफ्लाविनोसीस

केवळ ह्याच जीवनसत्त्वाच्या त्रुटीमुळे उद्‌भवणारा विशिष्ट रोग नाही.

लक्षणहीन त्रुटी आढळते, वल्कचर्म.

डोळे, श्वसनमार्ग व अन्नमार्ग यांमधील श्लेष्मकला, मूत्रमार्ग व जननमार्ग, त्वचा.


हाडे, दात.

जननमार्ग, स्नायू, यकृत, मेंदू, रक्तातील  लाल कोशिका.

रक्तातील प्रोथ्राँबीन

मेंदू, तंत्रिका व हृदय.

त्वचा, ओठ व जीभ, डोळ्यातील स्वच्छमंडल, यकृत आणि तंत्रिका.

मेंदू, वृक्क, त्वचा, रक्तातील लाल कोशिका, अधिवृक्क ग्रंथी.

जठरांत्रीय मार्ग, त्वचा व मेंदू.

पँटोथिनिक अम्ल :

५ ते १५ मिग्रॅ.

 

 

फॉलिक अम्ल :

५० ते १०० मायक्रोग्रॅम

 

बायोटीन :

१५० ते ३०० मायक्रोग्रॅम

 

 

कोलीन :

३०० ते ५०० मिग्रॅ.

 

१२ जीवनसत्त्व :

दैनंदिन गरज अनिश्चित, सर्वसाधारणपणे १० ते ५० मायक्रोग्रॅम.

ॲस्कॉर्बिक अम्ल :

२० मिग्रॅ.

गर्भारपण व दुग्धकाल : ५० मिग्रॅ.

प्राण्याच्या शरीरातील यकृत, वृक्क, प्लीहा, अधिवृक्क ग्रंथी व हृदय या भागांत भरपूर असते. हिरव्या भाज्या व दूध यांशिवाय इतर सर्व अन्नात असते.

ताज्या भाज्या, यीस्ट, मांस व यकृत.

हिरव्या भाज्या, यकृत, यीस्ट, वृक्क, दूध.

अंड्याचा पिवळा बलक, गव्हाचे अंकुर, यीस्ट, यकृत, वृक्क, सोयाबीन.

यकृत, वृक्क, मांस

 

 

 

 

हिरव्या भाज्या, फळे, बटाटे,

दक्षिण भारतातील गरीब रहिवाशांमध्ये हातापायांची आग हे प्रमुख असलेला रोग होतो.

बृहत्‌कोशिका असलेला रक्तक्षय.


मानवात विशिष्ट रोग आढळलेला नाही.

 

 

 

मानवात विशिष्ट रोग आढळलेला नाही

 

 

मारक रक्तक्षय

 

 

 

 

 

स्कर्व्ही

अधिवृक्क ग्रंथी, वृक्क, त्वचा, मेंदू, मेरुरज्जू.

 

 

 

 

रक्तातील लाल कोशिका.

 

 

त्वचा, स्नायू.

 

 

 

 

यकृत, वृक्क, अग्निपिंड

 

 

रक्तातील लाल कोशिका.

 

 

रक्तवाहिन्या, त्वचा, दात व हिरड्या, हाडे, रक्तातील लाल कोशिका.

श्लेष्मकला- श्वासनाल, आतडी इ. नलिकाकार पोकळ्यांच्या आतील पृष्ठभागावरील बुळबुळीत ऊतकाचे अस्तर; अस्थिमार्दव-हाडे मृदू होणे; प्रोथ्राँबीन- रक्त गोठण्यात उपयुक्त असणाऱ्या थ्राँबीन या पदार्थाचा पूर्वगामी पदार्थ; अरिबोफ्लाविनोसीस-मुखाच्या कोनात, ओठांवर, नाकाच्या व डोळ्यांच्या आसपास जखमा होणे आणि तेलकट खपल्या पडणारी त्वचा ही लक्षणे असणारा रोग; स्वच्छमंडल-बुबुळाच्या पुढचा पारदर्शक भाग; अधिवृक्क ग्रंथी- प्रत्येक वृक्काच्या वरच्या बाजूला असणारी वाहिनीविहीन ग्रंथी [ अधिवृक्क ग्रंथि]; प्लीहा-पानथरी; मेरुरज्जू-मेंदूच्या मागील भागातून निघणारा व पाठीच्या कण्यातून जाणारा तंत्रिकांचा दोरीसारखा जुडगा; अग्निपिंड-जठराच्या मागील बाजूस असणारी मोठी, लांबट व द्राक्षाच्या घडासारखी ग्रंथी [ अग्निपिंड] }.

जीवनसत्त्वन्यूनता

घोडे व गाई-गुरे व समूहातील जीवनसत्त्वांचे शरीरात संश्लेषण करू शकतात, त्यामुळे ब जीवनसत्त्वाच्या अभावामुळे होणारे विकार त्यांच्यात सहसा उद्‌भवत नाहीत. कोंबड्या स्वतःचीच विष्ठा खाऊन हे जीवनसत्त्व मिळवितात. कोंबड्यांच्या आतड्याच्या शेवटच्या भागात हे जीवनसत्त्व संश्लेषित केले जाते; पण ते त्यांच्या शरीराला उपयोगी पडत नाही. पायांतील अधूपणा, नखे आतल्या बाजूस वळलेली दिसणे, अंडी कमी देणे त्याचप्रमाणे उबविण्याकरिता ठेवलेल्या अंड्यांमध्ये १९ ते २१ दिवसांच्या दरम्यान पिले आतल्याआत मरणे व त्यामुळे साहाजिकत बाहेर पडणाऱ्या पिलांचे प्रमाण कमी होणे इ. लक्षणे दिसतात. डुकरांमध्ये आतड्याचा शोथ (दाहयुक्त सूज) व खुरटलेली वाढ ही लक्षणे दिसतात. कुत्र्यामांजरांत थकवा, वल्कचर्म (मुख्यत्वे कातडीचा विकार व त्याबरोबर तंत्रिका तंत्राची अकार्यक्षमता) व डोळ्यांचे विकार उद्‌भवतात.

जीवनसत्त्वन्यूनता

घोड्यामध्ये व गाई-म्हशींमध्ये वंध्यत्व संभवते.

जीवनसत्त्वन्यूनता

घोड्यांच्या स्प्लिंटस (पुढील पायाच्या विशिष्ट हाडाचा विकार), स्पॅव्हिन (मागील पायाच्या विशिष्ट हाडाचा विकार) व रिंगबोन (खुरामधील सर्वांत वरच्या हाडाचा विकार) ह्या विकारांचा [→ घोडा] ड जीवनसत्त्व कमी पडत असण्याशी संबंध असावा, असे मानतात. कोंबड्यांच्या पिलांमध्ये पायाची हाडे व चोच ठिसूळ होणे व मुडदूस ही लक्षणे दिसतात. पातळ कवचाची किंवा कवचहीन अंडी देणे, अंड्यांतून बाहेर पडणाऱ्या पिलांचे प्रमाण कमी होणे व अंडी दिल्यानंतर दिसणारा तात्पुरता पक्षाघात ही लक्षणे कोंबड्यांत दिसतात; तसेच मोठ्या जातीच्या कुत्र्यांना मुडदूस होतो.

जीवनसत्त्वन्यूनता

गाई-गुरांत स्नायूंच्या पोषणात बिघाड होऊन कुपोषण होते. उबविण्याकरिता ठेवलेल्या अंड्यांतून पिले बाहेर येण्याचे विवक्षित प्रमाण असते; हे प्रमाण ई जीवनसत्त्वाच्या न्यूनतेमध्ये पुष्कळच कमी होते.

के जीवनसत्त्वन्यूनता

यामुळे कोंबड्यांमध्ये रक्तक्षय होतो. सर्व पशूंमध्ये प्रोथ्राँबिनाचे प्रमाण कमी झाल्यामुळे रक्त गोठण्यास विलंब लागतो. यकृताच्या विकारांत के जीवनसत्त्वन्यूनता उद्‌भवण्याचा संभव असतो.

जीवनसत्त्वाच्या न्यूनतेमुळे होणारे विकार त्या त्या जीवनसत्त्वाचा पुरवठा शरीराला सुरू केल्यावर बहुतांशी बरे होतात.मात्र रोगाच्या प्रथमावस्थेत उपचार सुरू केले, तर जास्त गुणकारी ठरतात. पशूंच्या शरीराची जीवनसत्त्वांची गरज अत्यल्प असते. उपचाराच्या वेळी ही गोष्ट लक्षात घेतली गेली नाही व मात्रा जास्त प्रमाणात दिली गेल्यास विपरित परिणाम होतात; उदा., ब जीवनसत्त्व (यीस्टच्या स्वरूपात) डुकरांना जास्त दिल्यास मुडदूस होतो.

नस्पतींतील जीवनसत्त्वे

अलीकडील काळात वनस्पती आणि प्राणी यांच्या पोषणविषयक झालेल्या सखोल अभ्यासामुळे जीवनसत्त्वांचे महत्त्व व कार्य पटू लागले असून व नवनवीन जीवनसत्त्वांचा शोध लागून त्यांच्या संख्येत भर पडत गेली आहे. तुलनात्मक दृष्ट्या प्राण्यांना आवश्यक असलेल्या जीवनसत्त्वांपैकी काही थोडीच वनस्पतींवर परिणामकारक असल्याचे दिसून आले आहे. वनस्पतींमध्ये जीवनसत्त्वांचे आवश्यक तितके रासायनिक संश्लेषण होऊन ती ऊतकांमध्ये साठविली जातात व जरूर पडेल त्या त्या प्रमाणात त्यांचा उपयोग करण्यात येतो. यामुळेच वनस्पतींच्या प्रौढावस्थेत त्यांना जीवनसत्त्वे न मिळाली, तरी त्यांची उणीव न भासता नियमित वाढ सुरू राहते.

सुरुवातीला सूक्ष्मजंतू व कवक यांची प्रयोगशाळेत कृत्रिम वाढ करताना त्यांच्या पोषणविद्रावात साखर व लवणे यांव्यतिरिक्त बटाटे, पेप्टोन, ओट किंवा मक्याचे पीठ, यीस्टचा अर्क वगैरे कार्बनी संयुगांचा उपयोग केल्यासच त्यांची वाढ होत असल्याचे दिसून आले, कारण कवक व सूक्ष्मजंतू यांना त्यांपासून स्वतःच्या वाढीस आवश्यक ती  जीवनसत्त्वे मिळतात. कवक व सूक्ष्मजंतू हे परोपजीवी (दुसऱ्या जीवांवर जगणारे) असल्याने स्वतःच्या वाढीस आवश्यक ती जीवनसत्त्वे स्वतः तयार करू शकत नाहीत किंवा जरी थोड्याफार प्रमाणात तयार करीत असली, तरी त्यांच्या वाढीस ती पुरेशी नसतात.

ब्ल्यू. जे. रॉबिन्सन व एम्. ए. बार्टली यांनी १९३७ मध्ये टोमॅटोच्या मूलग्रांचे (मुळांच्या टोकांचे) लवणे, साखर व थायामीन यांचा पोषणविद्राव वापरून कृत्रिम संवर्धन केले व पोषणविद्रावात हे जीवनसत्त्व असल्यामुळेच मूलग्रांची अमर्याद वाढ करणे शक्य झाल्याचे दिसून आले. याच दरम्यान जे. बॉनर (१९३७) यांनीही मुळांची भरपूर व अमर्याद वाढ होण्यास जीवनसत्त्वांची आवश्यकता असते असे निरनिराळ्या प्रयोगांद्वारे दाखवून या विधानाला पुष्टी दिली. मूलाग्रे वाढताना त्यांच्या कार्बोहायड्रेटचयनाशी (कार्बोहायड्रेटांचा शरीरात उपयोग करून घेण्याच्या क्रियेशी) थायामीन या जीवनसत्त्वाचा दाट संबंध असल्याचेही नंतर दिसून आले. एफ्. टी. ॲडिकॉट या शास्त्रज्ञांना १९४१ मध्ये असे आढळून आले की, उच्छेदित (कापून वेगळे केलेल्या) मूलग्रांचे संवर्धन करताना थायामीन पोषणविद्रावात नसेल, तर विभज्येतील [सतत वाढणाऱ्या कोशिकांच्या समूहातील; विभज्या] कोशिकांच्या विभाजनाचा वेग मंदावून त्यांची वाढही खुंटते. सर्वसाधारणपणे मुळे जीवनसत्त्व स्वतः तयार करू शकत नसल्याने वनस्पतींच्या जमिनीवरील भागांकडूनच त्यांना ते मिळवावे लागते.

र्व उच्च व काही क्षुद्र वनस्पतींना थायामिनाची आवश्यकता असते व त्या त्याचे संश्लेषणही करू शकतात; परंतु सूक्ष्मजंतू, यीस्ट व तंतुयुक्त कवक यांच्या बऱ्याचशा जाती त्याचे संश्लेषण करू शकत नाहीत. यामुळे त्यांना आपल्या वाढीसाठी थायामीन किंवा पिरिमिडीन व थियाझोल यासारख्या माध्यामिक संयुगांसाठी दुसऱ्यावर अवलंबून रहावे लागते. रॉबिन्सन यांनी १९३८ मध्ये पोषणविद्रावात फक्त पिरिमिडीन, फक्त थियाझोल, पिरिमिडीन व थायाझोल हे दोन्ही आणि थायामीन असे विद्राव वापरून निरनिराळ्या कवकांच्या वाढीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला. ई. एल्. टेटम व टी.टी. बेल यांना १९४६ मध्ये न्यूरोस्पोरा या कवकामध्ये थायामीनाचे संश्लेषण वृद्धीस आवश्यक असलेल्या इतर संयुगांप्रमाणेच आनुवंशिक नियंत्रणाशी निगडित असते, असे दिसून आले.

च्छेदित मूलग्रांची कृत्रिम वाढ करण्यास पोषणविद्रावात थायामीन हा अत्यंत अवश्यक घटक असल्याचे कळल्यावरून संपूर्ण वनस्पतीच पोषणविद्रावात किंवा स्वच्छ, निर्जंतुक वाळूत वाढवून जीवनसत्त्वांशिवाय  व ती पुरविली असता तीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यात आला. ठराविक संहतीत त्यांचा मुळांजवळ पुरवठा केल्यास वनस्पतींच्या वाढीस चांगलीच मदत होत असल्याचे यावरून दिसून आले.

थायामिनाप्रमाणेच जे. बॉनर व पी. एस्. डेव्हिरिअन यांनी १९३९ मध्ये निकोटिनिक अम्ल हेही उच्छेदित मूलाग्रांची कृत्रिम वाढ करताना आवश्यक असल्याचे दाखविले. निकोटिनिक अम्लाशी पोषणविद्रावात उणीव असल्यास वाटण्याच्या मूलाग्रांच्या विभज्यांवर प्रतिकूल परिणाम होऊन त्यांची वाढ पूर्णतः थांबते, असे ॲडिकॉट यांनी १९४१ मध्ये दाखविले. टोमॅटोच्या मूलग्रांची कृत्रिम वाढ करताना पी. आर्. व्हाइट यांना मात्र निकोटिनिक अम्लाची जरूरी भासली नाही. रॉबिन्सन व एम्. बी. श्मीट यांनी १९३९ मध्ये पिरिडॉक्सीन (बजीवनसत्त्व) हे ब गटांपैकी एक जीवनसत्त्व टोमॅटोच्या उच्छेदित मूलाग्रांच्या संवर्धनास उपयुक्त असल्याचे दाखवून दिले आणि व्ही. टी. स्टाऊटमेअर यांनी १९४० मध्ये याचा उपयोग काही वनस्पतींच्या छाट कलमांना मुळे फुटण्यास होऊ शकतो, असे निर्दशनास आणले.

स्कॉर्बिल अम्ल या जीवनसत्त्वाचे उच्छेदित मूलाग्रांचे संवर्धन करण्यात काही वनस्पतींच्या बाबतीत महत्त्व पटले असले, तरी काही इतर वनस्पतींमध्ये त्याची मुळीच गरज भासत नसल्याचीही उदाहरणे आहेत. एम्. ई. रीड शास्त्रज्ञांनी १९४१ मध्ये ॲस्कॉर्बिल अम्लाचे कार्य कोशिकांच्या पृष्ठभागाशी संबंधित असल्याचे सुचविले असून त्यामुळे कोशिकांना विद्राव धरून ठेवण्यास व तो शोषण्यास मदत होते, असे प्रतिपादन केले आहे.

टी हेमबर्ग यांनी १९५३ मध्ये के जीवनसत्त्वाचा प्रत्यक्षात जरी मुळांची वाढ होण्यास उपयोग होत नसला, तरी त्याच्या उपस्थितीत वनस्पतींची मुळे मिळालेल्या हॉर्मोनांचा चांगला उपयोग करून घेऊ शकतात, असे प्रतिपादन केले आहे.

च्छेदित मूलाग्रांचे कृत्रिम संवर्धन करताना पोषणविद्रावात सर्वसाधारणतः थायामीन, निकोटिनिक अम्ल व पिरिडॉक्सीन या जीवनसत्त्वांची गरज लागते. परंतु बऱ्याचशा वनस्पतींच्या मूलाग्रांना निदान थायामीन या एका जीवनसत्त्वाची तरी गरज असतेच. व्हाइट क्लोव्हरची  [ क्लोव्हर] मूलाग्रे मात्र थायामिनाशिवाय वाढू शकतात पण त्यांना निकोटिनिक अम्लाची आवश्यकता असते, तरफ्लॅक्सची मूलाग्रे पोषणविद्रावात या तिन्ही जीवनसत्त्वांच्या अभावी वाढू शकतात, मात्र त्यामुळे त्यांची वाढ अतिशय हळू होते. मुळांची वाढ ही जीवनसत्त्वांच्या प्रमाणावर अवलंबून असते व निरनिराळ्या वनस्पतींच्या मुळांची जीवनसत्त्वांच्या संश्लेषणाची पात्रताही कमीजास्त असते. साधारणतः मुळांमध्ये जीवनसत्त्वे तयार करण्याची पात्रता कमी असते किंवा नसतेही व त्यामुळेच त्यांना वनस्पतींच्या वरच्या भागावर अवलंबून रहावे लागते.

नस्पतींमध्ये जीवनसत्त्वांचे संश्लेषण त्यांच्या मोठ्या पानांमध्ये होऊन तेथून ती मुळांकडे नेली जातात. थायामीन, पँटोथिनिक अम्ल व पिरिडॉक्सीन यांचे मुळाकडील वहनाचे प्रात्याक्षिक टोमॅटोच्या झाडात दाखविण्यात आले आहे. टोमॅटोच्या झाडात जीवनसत्त्वे पानात तयार झाल्यावर तेथून ती वल्काच्या (सालीच्या) ऊतकांमधून खाली वाहून येतात. पाने व मूळ यांच्यामधील वल्क-ऊतकाचा वाफेच्या साहाय्याने नाश केला असता असे दिसून आले की, यामुळे जीवनसत्त्वांचा प्रवाह खंडित होऊन नाश पावलेल्या वल्क-ऊतकाच्या वर ती साचून राहतात. पानांतून मुळांकडे जशी जीवनसत्त्वे जाताना आढळतात, त्याचप्रमाणे मोठ्या पानांतून कोवळ्या पालवीकडे अशी खालून वरही ती नेली जातात.

काही वनस्पतींची मुळे त्यांना आवश्यक ती जीवनसत्त्वे ठराविक प्रमाणात तयार करून स्वावलंबी असलेली दिसून आली आहेत, तर बऱ्याचशा वनस्पतींमध्ये त्यांचे पानांतून मुळांकडे वाहणे आवश्यक असते. काही वनस्पतींतील वाढते गर्भ व पुष्क (बीजातील गर्भाबाहेरचे अन्न) यांना त्यांच्या वाढीसाठी लागणारी जीवनसत्त्वे वनस्पतींच्या दुसऱ्या भागांपासून पुरविली जातात. गव्हाच्या कणसात जेव्हा दाणा भरू लागतो तेव्हा वनस्पतीच्या इतर भागांतील थायामिनाचे प्रमाण घटल्याचे व दाण्यात ते वाढल्याचे दिसून आले आहे.

काही विशिष्ट वनस्पतींच्या विशेषत

एकदलिकित (गहू, ज्वारी, मका इत्यादींसारख्या) वनस्पतींच्या उच्छेदित मूलाग्रांचे कृत्रिम संवर्धन आज कित्येक वर्षांच्या सतत प्रयत्नानेही शक्य झालेले नाही. मक्याची मूलाग्रे त्यांच्या वाढीस आवश्यक व ज्ञात अशा सर्वतोपरी परिपूर्ण घटकांच्या विद्रावातही फार हळू वाढतात व पुढे त्यांची वाढ मंदावून ती मरतात. कदाचित पोषणद्रव्यात त्यांच्या वाढीस आवश्यक असलेले परंतु ज्ञात नसलेले जीवनसत्त्व किंवा कार्बनी संयुगांच्या उणीवेमुळे वाढ होत नसावी असाच निष्कर्ष त्यातून काढता येतो. ई. एच्. रॉबर्ट्स व एच्. ई. स्ट्रीट (१९५५) यांनी राय ह्या वनस्पतीची मूलाग्रे पोषणविद्रावात ट्रिप्टोफेन हे ॲमिनो अम्ल मिसळून काही काळ सतत वाढविली आहेत. ट्रिप्टोफेन हे ॲमिनो अम्लाचे निकोटिनिक अम्लात रूपांतर होऊन ही वाढ होते.

हॉर्मोने व जीवनसत्त्वे यांत भेद करणे जरा कठिणच आहे. कारण हे दोन्हीही पदार्थ विशिष्ट प्रकारची कार्बनी संयुगे असून अत्यंत अल्प प्रमाणावर वनस्पतींच्या वाढीस जबाबदार असतात. इतकेच नव्हे तर एका जीवातील जीवनसत्त्व दुसऱ्यात हॉर्मोन होऊ शकते [हॉर्मोने].

पहा

अन्न; ॲस्कॉर्बिक अम्ल; इनॉसिटॉले; कोलीन; जीवनसत्त्व अ; जीवनसत्त्व ई; जीवनसत्त्व के; जीवनसत्त्व ड; जीवनसत्त्व ब; जीवनसत्त्व ब१२; थायामीन; निॲसीन; पँटोथिनिक अम्ल; फॉलिक अम्ल; बायोटीन; रिबोफ्लाविन.

------------------------------------------------------------------------------------

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 3/24/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate