याआधी आपण निरनिराळया लक्षणांची माहिती घेतली. प्रत्यक्ष तपासणी कशी करतात हे आता पाहू या. या प्रकरणात दिलेले रोगनिदान तक्ते आणि मार्गदर्शकांचा योग्य वापर करून बहुतेक आजारांचे निदान करता येईल. ज्या लक्षणासाठी निदान चार-पाच तरी आजार संभवतात त्यांचेच फक्त तक्ते व मार्गदर्शक केलेले आहेत. तसेच जी लक्षणे केवळ गंभीर (उदा. बेशुध्दी) आजारातच येतात त्यांच्यासाठी तक्ते व मार्गदर्शक तयार केलेले नाहीत.
कारण अशा वेळी सरळ तज्ज्ञाकडे पाठवणे गरजेचे आहे.
या तक्त्यांना, मार्गदर्शकांना पूरक ठरेल अशी तपासणी आता जरा तपशीलवार पाहू या. या प्रक्ररणात आपण पायावर सूज, डोकेदुखी, चक्कर ही 4 रोगलक्षणे पाहू या. तापासाठी स्वतंत्र प्रकरण आहे. इतर रोगलक्षणे योग्य त्या शरीरसंस्थेबरोबर दिली आहेत.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 6/5/2020