पर्यायी नांवं वेदना
– गुडघा
कारणे
शारीरिक कार्यांदरम्यान किंवा अनावश्यक ताणल्यामुळं, अतिवापर केल्यानं सामान्यतः गुडघेदुखी उत्पन्न होते. अतिलठ्ठपणामुळं गुडघ्याची समस्या वाढण्याचा धोका अधिक असतो. गुडघेदुखी पुढील कारणांनी देखील होतेः
- संधिशोथ
- गुडघ्यावर वारंवार दाब पडल्यामुळं होणारा दाह (जसे बराचवेळ गुडघ्यावर वाकणे, अतिवापर, किंवा जखम).
- जिन्यावरुन वर-खाली जाण्यामुळं गुडघ्यातील वेदना आणखी तीव्र होत जाणे
- फाटलेली कूर्चा किंवा संधिबंध
- ताण किंवा खेचले जाणे
- गुडघ्याची वाटी सरकणे
- संधिमधे दाह होणे
- गुडघ्याला जखम होणे
- कटीतील समस्या – गुडघ्यात जाणवणारी वेदना इथे होऊ शकते.
गुडघेदुखीला कारणीभूत ठरणा-या कमी सामान्य स्थितीमधे हाडात गाठ होण्याचा समावेश आहे.
घरगुती उपचार
गुडघेदुखीची अनेक कारणं, विशेषतः अतिवापर किंवा अति शारीरिक कार्य यांच्याशी संबंधित कारणांवर स्वतःहून केलेल्या निगेला चांगला प्रतिसाद मिळतोः
- विश्रांती घेणे आणि वेदना तीव्र करणारी कामं टाळणे, विशेषतः वजन पेलावी लागणारी कामं.
- बर्फाचा वापर करणे. प्रथम, तो दर तासाला 15 मिनिटापर्यंत लावावा. पहिल्या दिवसानंतर, दिवसातून किमान चारवेळा बर्फ लावावा.
- आपला गुडघा शक्य तितका उंचावर ठेवा म्हणजे सूज कमी करता येईल.
- वेदना आणि सूज यांच्यासाठी औषध घ्या.
- गुडघ्यांच्या खाली किंवा मधे उशी ठेवून झोपावे.
स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम अंतिम सुधारित : 6/17/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.