जेव्हा एखाद्या कामासाठी यंत्राचा शोध लागतो तेव्हा स्त्रियांना बाजूला सारून पुरुष त्या कामाचा ताबा घेतो असेही दिसून येते. उदा. गवत कापणे,भारे वाहणे हे काम स्त्रियांचे पण बैलगाडीत किंवा ट्रॅक्टरमधून ते भरून आणायचे असेल तर आपोआप ते काम पुरुषाकडे जाते. म्हणजे जास्त श्रमशक्ती लागणारे काम शेवटी स्त्रियाच पार पाडतात असे दिसते. स्त्रियांना रोजगाराच्या कामाशिवाय 4-5 तास घरगुती कामही करावे लागते. दुसरे म्हणजे गरोदरपण, बाळंतपण, गर्भपात, स्तनपान, इ. शारीरिक जबाबदा-यांची त्यात भर पडत असते. स्त्रिया काम जास्त करतात पण मोबदला कमी मिळतो अशी परिस्थिती आहे. स्त्रियांच्या विशेष समस्या आणि गरजा ध्यानात घेणे आवश्यक आहे. गरोदरपण,बाळंतपण, गर्भपात, इ. संबंधीच्या रजा, स्तनपानासाठी वेळ, लहान बाळांसाठी पाळणाघरे,स्वच्छतागृहे या सर्व सोयी करणे आवश्यक आहे.
स्त्रियांना कामावर पुरुषांकडून छळणूक सहन करण्याची अनेक उदाहरणे घडत असतात. चिडवणे, लगट करणे, मानसिक छळ करणे, बलात्कार, इ. प्रकार होत असले तरी त्याची वाच्यता फार होत नाही. या गोष्टी सिध्द करणे अवघड आणि सिध्द झाल्यानंतर समाज स्त्रियांनाच दूषण देणार ही परिस्थिती. याबद्दल स्त्रियांच्या अडचणी लक्षात घेऊन वातावरण बदलले पाहिजे. बहुतेक ठिकाणी रात्रीच्या पाळीला स्त्रियांना न ठेवण्याची पध्दत आहे. यासाठी प्रत्येक कारखान्यात महिला तक्रार निवारण समिती असणे कायद्याने अनिवार्य आहे.
स्त्रियांच्या अनेक व्यवसायांपैकी सर्वात अमानवी व्यवसाय म्हणजे वेश्याव्यवसाय. यात तर त्यांना दुख: आणि अनेक आजार सहन करावे लागतात. लिंगसांसर्गिक आजारांचे पुढचे सर्व परिणाम वंध्यत्त्व, पोटदुखी, इत्यादी त्यांना भोगायला लागतात. एड्स हा आजार तर हजर असतोच.
लेखक : डॉ. शाम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्यविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020
गणेश घोरपडे यांनी जिल्ह्यातील सातारा, वाई आणि खंडा...
कुशल व्यवस्थापन, तरुण नेतृत्व, प्रभावी योजना यामधू...
वर्धा येथील अभियंता विनोद राजगुरे हीच अंबाडी शेतकऱ...
कपाशीत सापळा पीक म्हणून वापर होणाऱ्या अंबाडी पिकाप...