सिफिलीस हा समागमाव्दारे पसरणारा होणारा रोग असून तो ट्रेपोनेमा पॅलीडम या विषाणूमुळे होतो.
सिफिलीसच्या फोडाव्दारे थेट संपर्क होऊन हा रोग एका व्यक्तींकडून दुस-या व्यक्तीला होतो. बाह्य गुप्तांग, योनी, गुदव्दार आणि रेक्टम इथं सामान्यतः हे फोड होतात. हे फोड ओठांवर किंवा तोंडामधे देखील होतात. या विषाणूचा प्रसार योनीमार्गे, गुदव्दारामार्गे आणि तोंडावाटे समागम करण्यामुळे होते. गर्भवती महिला आपल्या पोटातील बाळाला या रोगाची लागण करु शकतात. संडासामधील कमोडची सीट, दरवाजांच्या मुठी, पोहण्याचे तलाव, गरम पाण्याचे टब, एकमेकांचे कपडे किंवा जेवणाची भांडी वापरणे यांच्यामुळे तो पसरत नाही.
सायफिलीसची लागण झालेल्या अनेक व्यक्तींना कित्येक वर्षे कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत.
सायफिलीसच्या प्राथमिक अवस्थेत एक किंवा अनेक फोड दिसून येतात. सायफिलीसचे संक्रमण आणि त्याची पहिली लक्षणे दिसणे यांच्या मधला कालावधी हा 10 ते 90 दिवसांचा (सरासरी 21 दिवस) असू शकतो. हे फोड सामान्यतः घट्ट, गोल, लहान, आणि वेदनारहित असतात. ज्या ठिकाणी सायफिलीसनं शरीरात प्रवेश केला आहे तिथे ते उगवतात. तथापि, पुरेसे उपचार केले नाहीत तर, हे संक्रमण दुस-या टप्प्यात पोचते.
या टप्प्यामधे त्वचेवर पुरळ आणि श्लेष्म पडदा विकृती निर्माण होते. हे पुरळ सामान्यतः खाजत नाहीत. ते खडबडीत, लाल, किंवा लालसर तपकिरी बिंदूसारखे दोन्ही हातांच्या किंवा पायांच्या तळव्यांवर दिसून येतात. तथापि, वेगळ्या आकारातील पुरळ हे शरीराच्या इतर भागांवर देखील येऊ शकतात, काहीवेळा ते इतर रोगांमुळे होणा-या पुरळांसारखे दिसतात. या पुरळांशिवाय, दुस-या टप्प्यातील सायफिलीसच्या लक्षणांमधे, ताप येणे, सुजलेल्या कंठग्रंथी, घसा खवखवणे, केसांचे पुंजके गळणे, डोकेदुखी, वजन कमी होणे, स्नायूंमधे वेदना आणि थकवा यांचा समावेश होतो.
जेव्हा दुस-या टप्प्यातील लक्षणे नाहीशी होतात तेव्हा सिफिलीसच्या नंतरच्या टप्प्याला सुरुवात होते. यामधे शरीराच्या आतील अवयवांचे नुकसान होते. त्यात मेंदू, नसा, डोळे, रक्तवाहिन्या, यकृत, हाडे, आणि संधींचा समावेश होतो. हे अंतर्गत नुकसान अनेक वर्षांनंतर दिसून येते. सिफिलीसच्या उशीराच्या टप्प्यातील चिन्हे आणि लक्षणांमधे स्नायूंच्या हालचालीत समन्वय राखण्यात अडचण येणे, अर्धांगवायू, बधिरता, हळूहळू अंधत्व येणे, आणि स्मृतिभ्रंश यांचा समावेश होतो. या नुकसानामुळे मृत्यु देखील ओढवू शकतो.
एखादी गर्भवती महिला किती काळ संसर्गग्रस्त आहे त्यानुसार, तिचे बाळ मृतावस्थेत जन्माला येणे, किंवा जन्मानंतर काही काळातच मरणार्या बाळाला जन्म देणे असा धोका उद्भवू शकतो. एखादे संसर्गग्रस्त बाळ या रोगाच्या कोणतीही चिन्हांशिवाय किंवा लक्षणांविनाच जन्म घेऊ शकते. तथापि, त्यावर तत्काळ उपाय न केल्यास, त्या बाळाला काही आठवड्यांच्या आतच गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. उपचार न केलेल्या बाळांचा विकास उशीराने होतो, त्यांना आकडी येऊ शकतो किंवा ते मरण पावू शकतात.
गुप्तांगाजवळील फोडांमुळे सिफिलीसव्दारे एचआयव्हीचे संसर्ग समागमाव्दारे पसरणे सोपे जाते. सिफिलीस झालेला असताना एचआयव्हीचे संसर्ग होण्याचा धोका अंदाजे 2 ते 5 पटींनी वाढतो.
एकदा सिफिलीस झाल्यानतंर तो पुन्हा होण्यापासून त्या व्यक्तीला संरक्षण मिळत नाही. यशस्वी उपचारानंतर, लोकांना पुन्हा संक्रमण होऊ शकते.
या रोगाचा प्रसार होणे टाळण्याकरता खात्रीशीर उपाय म्हणजे लैंगिक संबंध टाळणे हा होय. मद्यपान आणि अमली पदार्थांचे सेवन टाळण्याव्दारेही या रोगाचे प्रसार टाळता येते कारण या सवयींमुळे धोकादायक लैंगिक वागणुकीची शक्यता असते.
स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम
अंतिम सुधारित : 5/31/2020
या विभागात अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे म्हणजेच योग...
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
डॉक्टर्स आणि नर्सेस एवढेच मनुष्यबळ गृहीत धरून स्वा...