परमा हे याचे महत्त्वाचे कारण आहे. परमा या रोगाशिवाय इतर काही जंतुंमूळे लैंगिक संबंधातून मूत्रनलिकादाह होतो. लग्नानंतर पहिल्या लैंगिक संबंधानंतर एक-दोन दिवसांत दोघांनाही हा त्रास जाणवण्याची शक्यता असते. याचे कारण बहुधा विषाणू असतात. बहुधा हा आजार पुरुषांमध्येच होतो. कारण लैंगिक संबंधामध्ये स्त्रीच्या मूत्रनलिकेचा फारसा संबंध येत नाही. मात्र या जंतुंमुळे स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या तोंडाचा दाह होतो. तसेच या जंतूंमुळे गर्भाशय व गर्भनलिका सुजण्याची शक्यता असते.
बहुधा हा त्रास तीन-चार दिवसांनंतर आपोआप कमी होतो. यातील काही प्रकारच्या विषाणूंवर डॉक्सीच्या गोळया गुणकारी आहेत. मात्र डॉक्सीने काही रुग्णांना आराम मिळत नाही. अशा वेळी डॉक्टरकडे पाठवणे चांगले.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्यविद्या
अंतिम सुधारित : 8/2/2020
परमा किंवा गोनोरिया हा जिवाणूंमुळे होणारा आजार असू...
परमा हा एक समागमाव्दारे पसरणारा रोग (एसटीडी) आहे. ...
लिंगसांसर्गिक आजार म्हणजे लैंगिक संबंधातून पसरणारे...