परमा हा एक समागमाव्दारे पसरणारा रोग (एसटीडी) आहे. हा रोग निस्सेरीया गोनो-हीई या विषाणूमुळे होतो. हा विषाणू, स्त्रिया आणि पुरुषांच्या पुनरुत्पादक मार्गातील ओलसर भागात वाढतो आणि सहज व्दीगुणीत होतो. हा विषाणू, तोंड, घसा, डोळे आणि गुदव्दारातही वाढतो.
परमा हा शिश्न, स्त्रीयोनी, तोंड किंवा गुदव्दाराशी संपर्क होण्याव्दारे पसरतो. प्रसुतीदरम्यान हा रोग मातेकडून बाळालाही होऊ शकतो.
लैंगिकदृष्ट्या कोणत्याही क्रियाशील व्यक्तीला परमा होऊ शकतो. अर्थात परमा झालेल्या अनेक पुरुषांना कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत, काही पुरुषांना संक्रमणानंतर दोन ते पाच दिवसांनी काही चिन्हे किंवा लक्षणे दिसून येतात, ही लक्षणे दिसून येण्यास जास्तीत जास्त तीस दिवस लागू शकतात. या चिन्हें आणि लक्षणांमधे लघवी करताना जळजळणे, किंवा शिश्नातून पांढरा, पिवळा, किंवा हिरवा स्त्राव होतो. काहीवेळा परमा झालेल्या पुरुषांना वृषणात वेदना होते किंवा ते सुजतात.
महिलांमधे, परमाची लक्षणे ब-याचदा सौम्य असतात. महिलांमधील प्रारंभिक लक्षणे आणि चिन्हे यामधे, लघवी करताना वेदना किंवा जळजळ होणे, योनीव्दारे अधिक स्त्राव होणे, किंवा दोन पाळींच्या दरम्यान योनीतून रक्तस्त्राव होणे यांचा समावेश असतो.
एखाद्या गर्भवती महिलेला परमा असेल तर, प्रसुतीदरम्यान ते योनी मार्गातून बाहेर येत असताना ती त्याला हे संक्रमण प्रसारीत करु शकते. त्यामुळे अंधत्व, सांध्यांमधे संक्रमण किंवा जीवाला घातक असे रक्ताचे संक्रमण बाळाला होऊ शकते. गर्भवती महिलेला परमाचे निदान झाल्यानंतर लगेचच त्यावर उपचार केल्यास या समस्या टाळता येऊ शकतात. गर्भवती महिलांनी आवश्यकतेनुसार योग्य ती तपासणी, चाचणी आणि उपचारांसाठी आरोग्य निगा कार्यकर्त्याचा सल्ला घ्यावा.
समागमाव्दारे संप्रेषित होणारे रोग टाळण्याचा खात्रीशीर मार्ग म्हणजे लैंगिक संबंधापासून दूर राहणे, किंवा अशा जोडीदारासोबत दीर्घकालीन एकनिष्ठ संबंध ठेवावेत ज्याची तपासणी करण्यात आली आहे आणि त्याला कोणताही संसर्ग नाही याची खात्री आहे.
स्त्रोत : पोर्टल कंटेंट डिम
अंतिम सुधारित : 4/29/2020
योनिद्वारे रक्तस्रावाची कारणे अनेक आहेत. त्यांचे य...
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
प्रत्येकच रोग सर्वानाच होतो असं नाही परंतु बहुतांश...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...