क्लॅमिडीया हा समागमाव्दारे पसरणारा व नेहमी आढळणारा रोग असून तो क्लॅमिडीया ट्रॅकोमॅटीस या विषाणूमुळे होतो. हा विषाणू एखाद्या महिलेच्या पुनरुत्पादक अवयवांना नुकसान पोचवू शकतो.
क्लॅमिडीया हा योनीव्दारे, गुदव्दारामार्गे किंवा तोंडावाटे समागम करण्यातून पसरतो. योनीमार्गे प्रसूतीदरम्यान एखाद्या संसर्गग्रस्त मातेकडून तिच्या बाळालाही संप्रेषित होऊ शकतो. लैंगिकदृष्ट्या क्रियाशील कोणत्याही व्यक्तीला क्लॅमिडीया होऊ शकतो.
स्त्रियांमधे हा विषाणू प्रारंभी गर्भाशय आणि मूत्रमार्गावर परिणाम करतो. ज्या महिलांमध्ये याची लक्षणे दिसतात त्यांना असामान्य प्रमाणात योनीस्त्राव किंवा लघवी करतेवेळी जळजळ होऊ शकते. जेव्हा हा संसर्ग गर्भाशयाकडून अंडनलिकांमधे पसरतो, तेव्हासुध्दा काही महिलांना लक्षणे किंवा चिन्हे दिसत नाहीत, इतरांना ओटीपोटात दुखणे, पाठीच्या खालच्या भागात दुखणे, ताप, समागम करताना वेदना होणे, किंवा दोन पाळ्यांदरम्यान रक्तस्त्राव होणे असे त्रास होऊ शकतात.
लक्षणे असणा-या पुरुषांना त्यांच्या लिंगातून स्त्राव येणे किंवा लघवी करताना जळजळणे होऊ शकते. पुरुषांना लिंगाच्या तोंडाजवळ जळजळ किंवा खाज होऊ शकते.
क्लॅमिडीयावर उपचार न केल्यास ह्या संक्रमणाचे रूपांतर गंभीर स्वरुपातील पुनरुत्पादक आणि इतर आरोग्य समस्यांमधे होऊ शकते आणि त्यांचे अल्प तसेच दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात. महिलांमधे, उपचार न केलेला संसर्ग हा गर्भाशय किंवा अंडनलिकांमधे पसरु शकतो आणि कटीभागाचा दाहरोग (पीआयडी) होऊ शकतो. क्लॅमिडीया झालेल्या महिलांना संबंध आल्यास, एचआयव्ही होण्याची पाचपट अधिक शक्यता असते. पुरुषांमधे गुंतागुंतीची समस्या क्वचितच होते.
समागमाव्दारे संप्रेषित होणारे रोग टाळण्याचा खात्रीशीर मार्ग म्हणजे लैंगिक संबंधापासून दूर राहणे, किंवा ज्याची तपासणी करण्यात आली आहे आणि त्याला कोणताही संसर्ग नसल्याची खात्री आहे अशा जोडीदारासोबत दीर्घकालीन एकनिष्ठ संबंध ठेवावे.
स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम
अंतिम सुधारित : 7/24/2020
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
प्रत्येकच रोग सर्वानाच होतो असं नाही परंतु बहुतांश...
अतिसाराबाबतच्या माहितीचा प्रसार करणे व तिची अंमलबज...
योनिद्वारे रक्तस्रावाची कारणे अनेक आहेत. त्यांचे य...