कटीभागाचा दाहरोग (पीआयडी) हा एक सर्वसाधारण शब्दप्रयोग आहे जो गर्भाशय, फॅलोपिन ट्यूब (डिंबग्रंथींमधून गर्भाशयात अंडी वाहून नेणारी नळी) आणि इतर पुनरुत्पादक अवयवांच्या संक्रमणाशी निगडीत आहे.
विषाणू हा एखाद्या महिलेच्या योनी किंवा गर्भाशयाच्या मुखातून वर सरकतो आणि तिच्या पुनरुत्पादक अवयवात शिरतो. विविध प्रकारचे विषाणू पीआयडीला कारणीभूत ठरतात, परंतु अनेक प्रकरणी ते परमा आणि क्लॅमिडीयाशी संबंधित असतात, हे दोन सर्वात सामान्य विषाणूजन्य एसटीडी आहेत. लैंगिकदृष्ट्या क्रियाशील महिलांना त्यांच्या गर्भधारणाक्षम वर्षांमधे सर्वाधिक धोका असतो, आणि पंचवीस वर्षांपेक्षा कमी वयाच्या महिलांना त्यांच्यापेक्षा अधिक वयाच्या महिलांच्या तुलनेत पीआयडी विकसित होण्याची अधिक शक्यता असते. याचं कारण असं की अल्पवयीन मुली आणि य़ुवतींचे गर्भाशय पूर्णतः विकसित झालेले नसते. त्यामुळे पीआयडीशी निगडीत असलेले एसटीडी त्यांना होण्याची शक्यता बळावते.
पीआयडीची लक्षणे अजिबात नसण्यापासून तीव्र असण्यापर्यंत वेगवेगळी असू शकतात. ज्यावेळी पीआयडी हा क्लॅमिडीयल संक्रमणामुळे होतो तेव्हा त्या महिलेला, तिच्या पुनरुत्पादक अवयवांना गंभीर स्वरुपाचे नुकसान पोचत असताना हलकी लक्षणे दिसतात किंवा अजिबात दिसत नाहीत. ज्या महिलांना पीआयडीची लक्षणे दिसतात त्यांना साधारणतः ओटीपोटात वेदना होते. अन्य चिन्हे आणि लक्षणांमधे ताप, अधिक प्रमाणात योनीतून दुर्गंधीयुक्त रक्तस्त्राव, वेदनादायक समागम, लघवी करताना दुखणे आणि पाळीचा रक्तस्त्राव अनियमित होणे यांचा समावेश होतो.
समागमाव्दारे संप्रेषित होणारे रोग टाळण्याचा खात्रीशीर मार्ग म्हणजे लैंगिक संबंधापासून दूर राहणे, किंवा ज्याची तपासणी करण्यात आली आहे आणि त्याला कोणताही संसर्ग नसल्याची खात्री आहे अशा जोडीदारासोबत दीर्घकालीन एकनिष्ठ संबंध ठेवावे.
स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम
अंतिम सुधारित : 7/10/2020
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
योनिद्वारे रक्तस्रावाची कारणे अनेक आहेत. त्यांचे य...
प्रत्येकच रोग सर्वानाच होतो असं नाही परंतु बहुतांश...
अतिसाराबाबतच्या माहितीचा प्रसार करणे व तिची अंमलबज...