एसटीडीमुळे गर्भवती महिलांमध्ये दिसणारे परिणाम गर्भवती नसलेल्या महिलांमधे दिसणार्या परिणामांसारखेच असतात. एसटीडीमुळे गर्भाशयाचा आणि इतर कर्करोग, तीव्र स्वरुपाची काविळ, कटीभागाचा दाहरोग, नपुंसकत्व आणि इतर समस्या होऊ शकतात. महिलांमधील अनेक एसटीडी हे छुपे असतात, म्हणजेच त्यांची चिन्हे किंवा लक्षणे दिसत नाहीत.
एसटीडी असलेल्या गर्भवती महिलेला, प्रसुतीच्या कळा लवकर येऊ शकतात, गर्भाशयात बाळाच्या भोवती असणारा पडदा लवकर फाटणे, आणि प्रसुतीनंतर गर्भाशयात संक्रमण होऊ शकते. एखाद्या गर्भवती महिलेकडून तिच्या बाळाला प्रसुतीच्या आधी, दरम्यान किंवा बाळाच्या जन्मानंतरही एसटीडी संक्रमित होऊ शकतो. काही एसटीडी (जसे सायफिलीस) नाळेत प्रवेश करतात आणि बाळ गर्भाशयात असतानाच त्याला संक्रमित करतात. अन्य एसटीडी (जसे परमा, क्लॅमिडीया, हीपॅटायटीस ब आणि गुप्तांगाजवळ नागीण ) हे प्रसुतीच्या वेळी बाळ योनीमार्गातून बाहेर येत असताना त्यावेळी त्याला होऊ शकतात. एचआयव्ही हा गर्भधारणेच्या दरम्यान नाळेतून प्रवेश करतो, बाळाला जन्मादरम्यान संक्रमित करु शकतो, आणि इतर एसटीडीच्या तुलनेत, बाळाला स्तनपानाव्दारे संक्रमित करु शकतो.
बाळांना होणा-या एसटीडीच्या नुकसानकारक प्रभावांमधे मृत बाळ जन्माला येणे, जन्मावेळी वजन कमी होणे (पाच पाऊंडापेक्षा कमी), डोळे येणे, न्यूमोनिया, नवजात बाळाला रक्तप्रवाहात संक्रमण होणे, मेंदूला नुकसान पोचणे किंवा शरीराच्या हालचालींमधे समन्वय नसणे, अंधत्व, बहिरेपणा, तीव्र स्वरुपाची काविळ, मेंदूज्वर, यकृताचा तीव्र आजार आणि कठीणपणा यांचा समावेश आहे.
|