অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मुत्रमार्गातील जंतूसंसर्ग

मुत्रमार्गातील जंतूसंसर्ग

किडणी, मुत्रवाहिनी, मूत्राशय आणि मुत्रनालीकांनी मुत्रमार्ग तयार होतो, ज्यात विषाणूंद्वारे होणाऱ्या संसर्गाला मुत्रमार्गाचा संसर्ग (Urinary Tract Infection किंवा UTI) म्हटले जाते.

मुत्रमार्ग संसर्गाची लक्षणे कोणती?

मुत्रमार्गाच्या वेगवेगळ्या भागात होणाऱ्या संसर्गाच्या परिणामांची लक्षणे हि वेगवेगळी असतात.

संसर्गाच्या प्रमाणानुसार हि लक्षणे कमी-अधिक प्रमाणात दिसून येतात.

बहुतेक रोग्यांत दिसणारी लक्षणे

  • लघवी करताना जळजळ होणे व दुखणे.
  • वारंवार लघवी लागणे आणि थेंब-थेंब लघवी होणे.

मुत्राशयातील संसर्गाची लक्षणे

  • पोटाच्या खालच्या बाजूला दुखणे.
  • लाल रंगाची लघवी होणे.

किडनीच्या संसर्गाची लक्षणे

  • थंडी  वाजून ताप येणे.
  • कंबर दुखणे आणि अशक्तपणा जाणवणे.
  • जर योग्य उपचार केले नाहीत तर हा संसर्ग जीवघेणा ठरू शकतो.

मुत्रमार्गात वारंवार संसर्ग होण्याची कारणे कोणती?

मुत्रमार्गात वारंवार संसर्ग होण्याची आणि योग्य उपचारानंतरही संसर्ग नियंत्रणात न येण्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.

१) स्त्रियांची मुत्रनलिका लहान असल्याने मुत्राशयात लवकर संसर्ग होऊ शकतो.

२) मधुमेहात रक्त आणि लघवीत साखर (ग्लुकोज) चे प्रमाण जास्त होणे.

३) अनेक प्रौढ पुरुषांच्यात प्रोटेस्ट ग्रंथी वाढल्यामुळे आणि प्रौढ महिलात मुत्रनलिका आक्रसल्यामुळे लघवी करायला त्रास होतो आणि मूत्राशय पूर्ण रिकामे होत नाही.

४) मूत्रमार्गात मुतखड्याचा त्रास.

५) मुत्रमार्गात अडथळा : मुत्रनलिका आक्रसली असेल (Stricture Urethra) किंवा किडणी आणि मुत्रवाहिनीच्या मधील भाग आक्रसला (Pelvi Urenteric Junction Obstruction) असेल.

६) इतर कारणे : मुत्राशयाचे काम सामान्यपणे सुरी राहण्यात आलेल्या त्रुटी (Neurogenic Bladder), जन्मतःच मुत्रमार्गाला नुकसान होणे, ज्यामुळे लघवी मुत्राशयातून मुत्रवाहिनीत उलटी परत जाणे ( Vesico Ureteric Reflux), मुत्रमार्गावर क्षयरोगाचा (T.B.) परिणाम.

मुत्रमार्गात वारंवार संसर्ग झाल्यास किडनीचे काही नुकसान होऊ शकते का?

सामान्यपणे लहान वयानंतर मूत्रमार्गात वारंवार संसर्ग होऊनही किडनीचे नुकसान होत नाही. परंतु मूत्रमार्गात खडा ,अडथळा किंवा क्षयाची लागण झाली असेल तर मुत्रमार्गातल्या संसर्गामुळे किडणी खराब होण्याची भीती असते.मुलांच्यात होणाऱ्या मुत्रमार्गाच्या संसर्गावर योग्यवेळी उपचार केले  नाहीत , तर किडनीचे  पुन्हा भरून न येणारे नुकसान होऊ शकते. त्यामुळे मुत्रमार्गसंसर्गाची समस्या इतर वयांपेक्षा मुलांच्यात जास्त गंभीर असते.

मूत्रमार्ग संसर्गाचे निदान

  • लघवीची सर्वसामान्य तपासणी

मायक्रोस्कोपद्वारा केल्या जाणाऱ्या लघवीच्या तपासणीत ‘पु’आढळून येणे हे मुत्रमार्ग संसर्गाचे लक्षण आहे.

  • लघवीची कल्चर आणि सेन्सिटीव्हीटीची तपासणी

लघवीच्या कल्चर आणि सेन्सिटीव्हीटीची तपासणी संसर्गाला जबाबदार असणाऱ्या विषाणूंचा प्रकार आणि त्यावरील उपचारासाठी परिणामकारक औषधांबद्दल पूर्ण माहिती देते.

  • इतर तपासण्या

रक्ताच्या तपासणीत रक्तातील पांढऱ्या पेशींचे अधिक प्रमाण संसर्गाचे गांभीर्य दर्शविते.

मूत्रमार्गात वारंवार संसर्ग होण्याच्या कारणांचे निदान  कशा प्रकारे केले जाते?

लघवीत वारंवार पु होणे आणि संसर्गावरील उपचार लागू न पडल्यामागची कारणे जाणून घेण्यासाठी पुढील तपासण्या केल्या जातात.

१) पोटाचा एक्सरे आणि सोनोग्राफी

२) इंट्राव्हीनस पायलोग्राफी (IVP)

३) मिच्युरेटिंग सीस्टोयुरेथ्रोग्राम( MCU)

४) लघवीत क्षयरोग्याच्या जिवाणूंविषयीची तपासणी .( Urinary AFB )

५) युरॉलॉजीस्ट विशेष प्रकारच्या दुर्बिणीतून मुत्रनलिका आणि मुत्रशयाच्या आतील भागाची तपासणी.(Cystoscopy).

६) स्त्रीरोगतज्ञांद्वारे तपासणी आणि निदान

मुत्रमार्गाच्या संसर्गावरील उपचार

१) जास्त पाणी पिणे

लघवीत संसर्ग झालेल्या रोग्यांना जास्त प्रमाणात पाणी पिण्याचा विशेष सल्ला दिला जातो. किद्नीत संसर्ग झाल्यामुळे काही रोग्यांना खूप उलट्या होतात.त्यांना रुग्णालयात भरती करून ग्लुकोज चढवण्याची गरज हि भासते.

२) औषधाद्वारे उपचार

मूत्राशय संसर्गाचा त्रास होणारया रोग्यांवर सामान्यतः कोट्राइमेक्सेझॉल ,सिफेलोस्पोरीन आणि क्विनालोन्स गटातील औषधांद्वारे उपचार केले जातात. हि औषधे सामान्यतः ७ दिवसांसाठी दिली जातात. ज्या रोग्यात किडनीचा संसर्ग खूप गंभीर (अँक्युट पायलोनेफ्रायटीस ) त्यांना सुरुवातीला इंजेक्शनद्वारा अँटीबायोटीक्स दिली जातात.

साधारणपणे सिफेलोस्पोरीन्स, क्विनोलोन्स ,अँमिनोग्लायकोस्लाईडस गटांच्या इंजेक्शनद्वारे हे उपचार केले जातात.लघवीच्या कल्चर रिपोर्टच्या मदतीने अधिक परिणामकारक औषधे आणि इंजेक्शनांची निवड केली जाते. तब्येत सुधारली तरीदेखील हे उपचार १४ दिवसांपर्यंत केले जातात.

उपचारानंतर केलेल्या लघवीच्या तपासणीत उपचारांचा किती फायदा झाला याबद्दलची माहिती मिळते.औषधोपचार पूर्ण झाल्यानंतर लघवीत ‘पु’ न अढळणे संसर्गावरील नियंत्रण दर्शिविते.

३) मुत्रमार्गाचा संसर्गाच्या कारनांवरील उपचार

आवश्यक तपासण्यांच्या मदतीने मुत्रमार्गातल्या कुठल्या समस्येमुळे वारंवार संसर्ग होत आहे किंवा उपचारांचा फायदा का होत नाही याचे निदान करता येते.हे निदान लक्षात घेऊन औषधांत आवश्यक ते बदल आणि काही रोग्यांचे ऑपरेशनही केले जाते.

मुत्रमार्गाचा क्षयरोग

क्षयरोग (टी.बी.)चा विविध अवयवांवर परिणाम होतो.त्यात किडनीवर परिणाम होणार्या रोग्यांची संख्या ४ ते ८ टक्के असते. मुत्रमार्गात वारंवार संसर्ग होण्याचे एक कारण मुत्रमार्गाचा क्षयरोग हि असू शकते.

मुत्रमार्गातील क्षयाची लक्षणे

  • हा रोग सामान्यपणे २५ ते ४० वयादरम्याण आणि महिलांच्या तुलनेत पुरुषांच्यात जास्त दिसून येतो.
  • २० ते ३० टक्के रोग्यांच्यात ह्या रोगाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. मात्र अन्य त्रासांबाबत केलेल्या तपासणीत अकस्मात ह्या रोगाचे निदान होते.
  • लघवीच्या वेळी जळजळ होणे , वारंवार लागावी होणे आणि सामान्य उपचारांचा फायदा न होणे
  • लाल लघवी होणे
  • केवळ १० ते २० टक्के रोग्यांमध्ये संध्याकाळी ताप येणे, थकायला होणे,वजन कमी होणे,भूक न लागणे वगैरे क्षयाची लक्षणे दिसून येतात.
  • मुत्रमार्गाच्या क्षयाच्या गंभीर परीणामांमुळे अधिक संसर्ग होणे, मुतखडा होणे, रक्तदाब वाढणे आणि मूत्रमार्गातील अडथळयामुळे किडणी फुगून खराब होणे वगैरे त्रास होऊ शकतात.

मुत्रमार्ग क्षयाचे निदान

१) लघवीची तपासणी

अ) हि सगळ्यात महत्वपूर्ण तपासणी आहे.लघवीत पु आणि रक्तकण दिसणे आणि लघवी अँसीडीक होणे

ब) विशेष प्रकारच्या सविस्तर चाचणी केल्यानंतर लघवीत क्षयाचे जीवाणू (Urinary AFB)दिसून येणे

क) लघवीच्या कल्चरच्या तपासणीत कोणतेही जीवाणू न दिसणे.(Negative Urine Culture)

2) सोनोग्राफी

सुरवातीला या तपासणीतून कोणतीही माहिती मिळत नाही.अनेकवेळा क्षयाच्या प्रतिकूल परिणामांमुळे किडणी फुगलेली किंवा आकुंचित झालेली दिसून येते.

३) आय.व्ही.पी

अत्यंत उपयुक्त असणाऱ्या ह्या चाचणीत मुत्रवाहिनी आकुंचित झालेली दिसते. तसेच किडनीच्या आकारात झालेले परिवर्तन (फुगलेली /आक्रसलेली) किंवा मूत्राशय आक्रसणे ह्यांसारखे त्रास दिसून येतात.

४) इतर तपासण्या

अनेक रोग्यांत मुत्रनलिका आणि मूत्राशयाची दुर्बिणीद्वारे तपासणी (सिस्टोस्कोपी )आणि बायोप्सिची  खूप मदत मिळते.

मुत्रमार्ग क्षयावरील उपचार

१) औषधे

मुत्रमार्ग क्षयावर फुफुसाच्या क्षयरोगासाठी दिली जाणारी औषधेच दिली जातात. सुरुवातीच्या दोन महिन्यात चार प्रकारची आणि त्यानंतर तीन प्रकारची औषधे दिली जातात.

२) इतर उपचार

मुत्रमार्गाच्या क्षयामुळे जर मुत्रमार्गात अडथळा आला , तर त्यावर दुर्बीण अथवा ऑपरेशनद्वारा उपचार केले जातात. एखाद्या रोग्याची किडणी पूर्णपणे निकामी झाली असेल , तर अशी किडणी ऑपरेशनद्वारा काढून टाकली जाते.

 

स्त्रोत - Kidney Education Foundation

अंतिम सुधारित : 9/27/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate