অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

प्रोस्टेटचा त्रास – बी. पी. एच.

प्रोस्टेटचा त्रास – बी. पी. एच.

प्रोस्टेट नावाची ग्रंथी फक्त पुरुषांच्या शरीरात आढळते. त्या ग्रंथीचा आकार वयोमानानुसार वाढत जातो त्यामुळे लघवी करण्यास त्रास होतो. हा त्रास साधारणतः ६० वर्षानंतर म्हणजेच जास्त वयाच्या पुरुषांना होतो.

भारत आणि सर्व जगातच आयुर्मान वाढल्यामुळे बी.पी.एच.चा त्रास असलेल्या रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे.

प्रोस्टेट ग्रंथी कुठे असते? तिचे काम काय आहे?

सुपारीच्या आकाराची प्रोस्टेट ग्रंथी पुरुषांमध्ये मूत्राशयाच्या ( bladder neck) खालच्या भागात असते व मुत्रनालीकेच्या ( Urethra) सुरुवातीच्या भागात चारीबाजुनी वेढलेली असते. अर्थातच मुत्रशयातील मुत्रनालिकेचा सुरुवातीचा भाग प्रोस्टेटमधून जातो.

वीर्य घेऊन जाणाऱ्या नलिका प्रोस्टेटमधून जाऊन मुत्रनलीकेच्या  दोन्ही बाजूला उघडतात, म्हणून प्रोस्टेट ग्रंथी पुरुषांमध्ये प्रजनन तंत्राचा मुख्य भाग आहेत.

बी.पी.एच.- बिनाइन प्रोस्टेटीक हायपरट्रॉफी म्हणजे काय?

बिनाइन प्रोस्टेटीक हायपरट्रॉफी अर्थात वयाबरोबर वाढवणारा प्रोस्टेटचा आकार. या वाढणाऱ्या आकारामुळे होणार्या त्रासाला बी.पी.एच असे म्हटले जाते.

  • या बी.पी.एच.च्या  त्रासात संसर्ग , कॅन्सर किंवा इतर कारणाने होणारया प्रोस्टेटच्या त्रासाचा समावेश नाही.

बी.पी.एच.ची लक्षणे

  • बी.पीएच. मुळे पुरुषांना होणारा त्रास खालीलप्रमाणे आहे.
  • रात्री वारंवार लघवीला जावे लागणे.
  • लघवीची धार पातळ व थीम्या गतीने पडणे.
  • लघवी होताना सुरुवातीला वेळ लागणे.
  • लघवी थांबून थांबून होणे.
  • लघवी थेंब थेंब होणे.
  • लघवी पूर्ण न होणे आणि पूर्ण झाल्याचे समाधान न मिळणे.

बी.पी.एच.मुळे होणाऱ्या गंभीर समस्या

  1. लघवी अचानक थांबणे व कँथेटरच्या मदतीनेच लघवी होणे.
  2. लघवी पूर्ण न झाल्यामुळे मूत्राशय कधीही रिकामे होत नाही.त्यामुळे लघवीत जंतुसंसर्ग होऊ शकतो आणि संसर्गावर नियंत्रण करताना डॉक्टरांना कठीण जाऊ शकते.
  3. मुत्रमार्गाचा अडथळा वाढल्यामुळे मूत्राशयात जास्त प्रमाणात लघवी साठते. त्यामुळे किडनीतून मुत्राशयात लघवी यायच्या मार्गात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे मुत्रवाहिनी व किडनी सुजतात.असे त्रास वाढले तर किडणी फेल्युअरसारखी गंभीर समस्या उद्भवू शकते.
  4. मूत्राशयात सतत लघवी गोळा झाल्यामुळे मुतखडा होण्याची शक्यता असते.

प्रत्येक पुरुषाला ५० ते ६० वयानंतर प्रोस्टेट वाढण्याचा त्रास होतो का?

नाही, असे नसते. प्रोस्टेट ग्रंथीचा आकार वाढल्यावरसुद्धा अनेक वयस्कर पुरुषांमध्ये बी.पी.एच ची लक्षणे दिसत नाहीत. ज्या पुरुषांना बी.पी.एच.ची मुळेकिरकोळ त्रास होतो त्यांना उपचारांची गरज भास नाही.सामान्यतः ६० वर्षावरील ५%टक्के पुरुषांमध्येच बी.पी.एच साठी उपचारांची आवश्यकता भासते.

बी.पी.एच.चे निदान

१) रोगाची लक्षणे

रोग्याने सांगितलेल्या आपल्या त्रासामध्ये बी.पी.एच.ची लक्षणे असतील ,तर प्रोस्टेटची तपासणी सर्जनकडून करून घ्यावी

२) प्रोस्टेटची तपासणी

सर्जन अथवा युरोलॉजीस्ट मलमार्गात बोट घालून प्रोस्टेटची तपासणी करतात (DRE-Digital Rectal Examination) बी.पी.एच मध्ये प्रोस्टेटचा आकार वाढतो व बोटाने केलेल्या तपासणीत प्रोस्टेटचा आकार वाढतो व बोटाने केलेल्या तपासणीत प्रोस्टेट गुळगुळीत ,व राब्रासारखी लवचिक लागते.

३) सोनोग्राफीने तपासणी

बी.पी.एच.मध्ये हि तपासणी अत्यंत उपयुक्त आहे. बी.पी.एच मुळे प्रोस्टेटच्या आकारात वाढ होणे ,लघवी केल्यावरही मुत्राश्यात लघवी राहणे ,मूत्राशयात मूतखडे होणे अथवा मुत्रवाहिनी आणि किडनीला सूज येणे अशा बदलांची माहिती सोनोग्राफिमुळे कळते.

१) प्रयोगशाळेतील तपासणी

ह्या तपासणीने बी.पी.एच. चे निदान होऊ शकत नाही,परंतु बी.पी.एच. मुळे होणाऱ्या त्रासांचे निदान करण्यात त्याची मदत होऊ शकते. लघवीची तपासणी , लघवीतील जंतुसंसर्गाच्या निदानाकरता आणि रक्तातील क्रिअँटीनीनची तपासणी किडनीच्या कार्यक्षमतेविषयी माहिती देऊ शकते. प्रोस्टेटचा त्रास हा प्रोस्टेटच्या कॅन्सरमुळे आहे का, हे रक्ताच्या पीएसए या विशिष्ट तपासणीद्वारे (PSA Prostate Specific Antigen) निश्चित केले जाते.

२) इतर तपासण्या

बी.पी.एच.ची लक्षणे असलेल्या प्रत्येक रोग्याला बी.पी.एच.चा त्रास होत नाही योरोफ्लोमेट्री( Urollowmetry), सिस्टोस्कोपी आणि युरेथ्रोग्राम सारख्या विशिष्ट तपासण्या करून घ्यावा लागतात.

बी.पी.एच.चा त्रास असणाऱ्या रोग्याला प्रोस्टेटच्या कॅन्सरचा त्रास होऊ शकतो का?

होय, परंतु भारतात बी.पी.एच. चा त्रास असणारया रोग्यांपैकी फारच कमी जणांना प्रोस्टेटच्या कॅन्सरचा त्रास असतो.

प्रोस्टेटचा कॅन्सरचे निदान

१) प्रोस्टेटची बोटाद्वारा तपासणी

या तपासणीत प्रोस्टेट बोटाला कडक दगडासारखी लागली किंवा गाठीसारखा वेगळी लागली तर हे कॅन्सरचे लक्षण असू शकते.

२) रक्तातील पी.एस.ए.ची तपासणी

रक्तातील या विशिष्ट तपासणीत पी. एस. ए जास्त प्रमाणात आढळल्यास हे कॅन्सरचे लक्षण असू शकते.

३) प्रोस्टेटची बायोप्सी

विशेष प्रकारच्या सोनोग्राफी प्रोबच्या मदतीने, मलमार्गात सुई घालून प्रोस्टेटची बायोप्सी केली जाते. याच्या हीस्टोपँथॉलॉजिकल तपासणीत प्रोस्टेटच्या कॅन्सरची पूर्ण खात्री केली जाऊ शकते.

बी.पी .एच. वरील उपचार

बी.पी.एच.च्या उपचारांचे दोन प्रकार आहेत.

१) औषधांद्वारे उपचार

२) औषधांशिवाय इतर विशिष्ट उपचार

औषधांद्वारे उपचार

  • जेव्हा बी.पी.एच. मुळे लघवीला जास्त होत नसेल आणि कोणतीही गंभीर समस्या नसेल तर अशा बऱ्याचश्या रोग्यांचा उपचार औषध घेऊन सहज व परिणामकारकरित्या केला जाऊ शकतो.
  • अशा प्रकारच्या औषधांमध्ये अल्फा ब्लॉकर्स( प्राझोसीन,टेराझोसीन डॉक्साझोसीन ,टेम्युलोसिन इ.) किंवा फिनास्टेराईड व ड्युरेस्टेराइड इ. औषधाचा समावेश असतो.औषधोपचारांमुळे मूत्रमार्गातला अडथळा कमी होऊ लागतो आणि कुठल्याही त्रासाशिवाय लघवी होऊ लागते.
BPH च्या कुठल्या रोग्यांना विशिष्ट उपचारांची गरज भासते

ज्या रोग्यांना योग्य औषधे देऊनही संतोषजनक फायदा होत नाही. त्यांना विशिष्ट उपचारांची गरज भासते. खाली दिलेल्या अनेक त्रासांमध्ये दुर्बीण, ऑपरेशन किंवा इतर विशिष्ट पद्धतीच्या उपचारांची गरज भासते.

  • प्रयत्न करूनही लघवी न होणे किंवा कँथेटरच्या मदतीनेच लघवी होणे.
  • लघवीत वारंवार संसर्ग होणे व लघवीतून रक्त जाने.
  • लघवी केल्यानंतरही मूत्राशयात अधिक प्रमाणात लघवी राहणे .
  • मूत्राशयात जास्त प्रमाणात लघवी साठल्याने किडनी आणि मुत्रवाहिनी फुगणे.
  • लघवी साठल्यामुळे मुतखडा होणे.

औषधांशिवाय इतर विशेष उपचार

औषधोपचारांचा चांगला फायदा न झाल्यामुळे उपचारांचे अन्य पर्याय पुढीलप्रमाणे

अ) दुर्बिणीद्वारे उपचार ( TURP Trans Urethral Resection of Prostate)

बिपीएचच्या उपचारांसाठी हि साधी , परिणामकारक आणि सर्वाधिक प्रचलित पद्धत आहे. औषधोपचारांचा विशेष फायदा न होणाऱ्या  बिपीएचच्या अधिकांश ( ९०% हून अधिक )रोग्यांची प्रोस्टेट ग्रंथी सध्या या पद्धतीने काढली जाते.

  • या पद्धतीत ऑपरेशन करण्याची ( चिरफाड व टाके घालण्याची)कोणतीही आवश्यकता नसते.
  • हा उपचार सामान्यपणेरोग्याला बेशुद्ध न करता,मणक्यात इंजेक्शन( Spinal Anesthesia) देऊन कमरेच्या खालचा भाग बधीर करून केला जातो.
  • या उपचारात मुत्रनलिकेतून दुर्बीण घालून प्रोस्टेट ग्रंथीचा अडथळा निर्माण करणारा भाग काढला जातो.
  • हि प्रक्रिया दुर्बीण अथवा व्हीडिओ इन्डोस्कोपीद्वारा , सतत पाहून केली जाते ज्यामुळे प्रोस्टेटचा अडथळा निर्माण करणारा भाग योग्य प्रमाणातच काढला जातो आणि या दरम्यान होणारया राक्तस्त्रावावर योग्य नियंत्रण ठेवता येते. या शस्त्रक्रियेनंतर रोग्याला साधारणपणे ३ ते ४ दिवस रुग्नालयात राहावे लागते.

ब) शस्त्रक्रियेद्वारे उपचार (Open Surgery)

जेव्हा प्रोस्टेट ग्रंथीचा वाढ अधिक झाली असेल तसेच त्याचबरोबर मुत्राशयातल्या मुतखड्याची शस्त्रक्रिया करणे गरजेचे असेल,तेव्हा दुर्बिणीच्या मदतीने परिणामकारक उपचार होऊ शकत नाहीत,असे जर युरोलॉजीस्टचे मत झाले, तर अशा रोग्यांच्या बाबतीत शस्त्रक्रियेचा वापर केला जातो. या शस्त्रक्रियेत सामान्यपणे जांघेचा भाग आणि मूत्राशयाला चीर पाडून प्रोस्टेटची गाठ बाहेर काढली जाते.

क) उपचाराच्या अन्य पद्धती

वरील उपचारात कमी प्रचलित असणाऱ्या पद्धती पुढीलप्रमाणे

१)दुर्बिणीच्या मदतीने प्रोस्टेटवर चीर घेऊन मुत्रमार्गातील अडथळा कमी करणे(TUIP- Transurethral Incision of Prostate)

२)लेझरद्वारे उपचार (ransurethral  Laser Prostatectomy)

३)औष्णीक ( Thermal Ablation)  पद्धतीद्वारे उपचार

४)मुत्रमार्गात विशेष नळी ( Urethral Stenting) द्वारे उपचार

 

स्त्रोत - Kidney Education Foundation

 

 

 

 

 

अंतिम सुधारित : 7/1/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate